रक्त सगळीकडे पोहोचायचे तर रक्तप्रवाहामध्ये काही दाब असणे आवश्यक आहे.
जन्मजात हृदयदोष हे जन्माच्या वेळीच्या हृदयातील दोषांमुळे होतात.
या विभागामध्ये हृदयाला आवश्यक इतके मेद आणि कोलेस्ट्रॉल याची मात्रा किती असावी याची माहिती दिली आहे.
हा आजार खूप विचित्र आहे. यात एका विशिष्ट जिवाणूंमुळे घशाला सूज येते.
‘हार्ट फेल्युअर’ चा सरळ अर्थ म्हणजे तुमचे हृदय जितक्या चांगल्या प्रकारे करायला पाहिजे तसे रक्त पंप करू शकत नाही.
मानवाचे हृदय कसे आहे, त्याचे कार्य कसे चालते यासंबधीची माहिती यामध्ये दिली आहे.
हृदयाला रक्तपुरवठा करणा-या रक्तवाहिन्यांत चरबीचे थर जमतात. यामुळे रक्तप्रवाहात अडथळे निर्माण होतात.
हृदयाला प्राणवायूयूक्त रक्तपुरवठा करणाऱ्या शुध्द रक्तवाहिन्यांना हृदयधमन्या असे म्हणतात. अशा धमन्यांमध्ये अडथळे येऊ लागले तर हृदयाला रक्त मिळत नाही . ह्यालाच हृदयविकार म्हणतात.
छातीचे प्रत्येक दुखणे हे काही हृदयाचे नसते. छातीत दुखण्याची अनेक कारणे आहेत.
झडपांच्या आजाराचे व बिघाडाचे सांधेहृदयताप हे सर्वात प्रमुख कारण आहे.
हृदयावरणातील उत्प्रवाह म्हणजे हृदयावरण पोकळीमध्ये वाजवीपेक्षा जास्त प्रमाणात द्रव साठणे.
ह्रदयरोग हे मरणाचे एक मुख्य कारण असू शकते. पण, आपण आजच एका आरोग्यपूर्ण जीवनशैलीचा अंगीकार करून भविष्यातील ह्रदयसंबंधी समस्यांना टाळू शकतो.
ह्रयूमॅटिक हृदयविकार एक असा रोग आहे जो, घशात स्ट्रेप्टोकोकल बॅक्टेरियाच्या संक्रमणामुळे सुरु होतो व हृदयाच्या झडपा (पडद्यासारख्या झडपा ज्यामुळे रक्ताचा उलटा प्रवाह रोखला जातो.) निकामी होतात.