অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

हाडांचा कर्करोग

हाडांचा कर्करोग

हाडांचा कर्करोग बहुधा हातापायांच्या लांब हाडांमध्ये सुरू होतो. यात अनेक प्रकार आहेत. पण सर्व प्रकारांत समान घटक म्हणजे हाडावर अचानक होणारी वाढ. हा वाढलेला भाग सहसा दुखत नाही. हाताने दाबून पाहिल्यावर हा भाग हाडासारखाच कठीण लागतो. हाडांचा कर्करोग बहुतेक शाळकरी वयात येतो. हा आजार घातक असतो. योग्य वेळी निदान झाल्यास काही प्रकारांत औषधोपचाराचा उपयोग होतो. पण आजार मूळ जागेपासून इतरत्र पसरला असेल तर उपचारांचा फायदा होत नाही. हाडावर अचानक (काही दिवसात) येणारी टणक सूज किंवा गाठ ही या दृष्टीने धोक्याची खूण समजावी. अशावेळी  ताबडतोब तज्ज्ञाकडे पाठवणे आवश्यक आहे.

 

लेखक : डॉ. श्याम अष्टेकर

(MBBS, MD community Medicine)

संदर्भ : आरोग्यविद्या

अंतिम सुधारित : 3/28/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate