हाड हा मुळात कठीण आणि मजबूत पदार्थ आहे. उतारवयात,काही आजारात, आणि चुन्याच्या अभावामुळे मात्र हाड नाजूक आणि ठिसूळ होऊन एवढया तेवढया कारणाने मोडते.
अस्थिविरळता म्हणजे हाडांमधील घनता कमी होऊन ती विरळ आणि दुबळी होणे.
शारीरिक कार्यांदरम्यान किंवा अनावश्यक ताणल्यामुळं, अतिवापर केल्यानं सामान्यतः गुडघेदुखी उत्पन्न होते. अतिलठ्ठपणामुळं गुडघ्याची समस्या वाढण्याचा धोका अधिक असतो.
त्वचेला व इतर अवयवांना ज्याप्रमाणे जंतुदोष होतो त्याचप्रमाणे हाडे व सांधे यांनाही जंतुदोष होऊ शकतो.
मानदुखीचा आजार भारतात खूप आढळतो. मानदुखी ही मुख्यत: मानेतील मणक्यांचा आजार आहे.
1-2 वर्ष वयाच्या मुलांना जीवनसत्त्व 'ड' कमी पडले तर मुडदूस हा विकार होतो.
संधि म्हणजे सांधा आणि वात म्हणजे दुखणे. यालाच संधिवात म्हणतात. ही एक चयापचयाशी निगडीत समस्या आसून रक्तातील युरीक आम्लाच्या अतिशय उच्च पातळीशी संबंधित आहे.
संधिवाताभ संधिशोथ म्हणजेच -हुमॅटॉईड आर्थ्रायटीस ही संधींची एक दाहकारक स्थिती असून तिचा प्रारंभ हा सामान्यतः संथ होतो.
संधिशोथ म्हणजे संधींचा दाह. सांध्यातील वेदना, कडकपणा आणि सूज (असतील किंवा नसतील) निर्माण करणा-या संधिरोगांच्या समूहाचा उल्लेख या नांवाने होतो.
सर्व्हायकल स्पाँडीलायटिसची लक्षणे म्हणजे मानेच्या भागात मणक्याच्या हाडांची असाधारण वाढ .
सांधेदुखी व सांधेसूज यांत फरक असतो. सांधे सुजलेले असतील तरच सांधेसूज म्हणता येईल.
हाडांचा कर्करोग बहुधा हातापायांच्या लांब हाडांमध्ये सुरू होतो. यात अनेक प्रकार आहेत.