काळा आजार हा एक संसर्गजन्य आजार आहे. या विभागात काळा आजार म्हणजे काय? तो कशामुळे होतो आणि त्याची काय लक्षणे असतात याची माहिती दिली आहे.
चिकनगुनिया (यालाच चिकनगुनिया विषाणू रोग किंवा चिकनगुनिया ताप असे म्हणतात) हा एक अकार्यक्षम बनवणारा, परंतु जीवघेणा नसलेला, विषाणूजन्य रोग आहे जो संक्रामक डासांच्या चाव्याव्दारे पसरतो. तो डेंग्यू तापासारखाच दिसतो.
डुकरांमध्ये जपानी मेंदूज्वराचे विषाणू मोठया प्रमाणात असतात. क्युलेक्स या डासांच्या मादीद्वारे या विषाणूंचा प्रसार होतो. हे डास डुकरांना चावतात. डुकरांना मात्र या विषाणूपासून काहीही अपाय होत नाही.
डेंग्यू हा एक विषाणूजन्य रोग आहे आणि तो एडीस इजिप्ती डासाच्या संक्रमणात्मक चाव्याव्दारे तो प्रसारित केला जातो.
मलेरिया / हिवताप हा डास चावल्यामुळे होणारा रोग किंवा आजार आहे. डासांचे अनेक प्रकार आहेत. आनिफिलास डासांच्या माद्यांमार्फत या जंतूचा प्रसार होतो. हे डास बहुधा स्वच्छ पाण्यात वाढतात.
पावसाळ्यात नेहमी डेंग्यूच्या साथीविषयी व त्यातून ओढावणाऱ्या मृत्यूविषयीच्या बातम्या आपल्या कानावर पडतात. डेंग्यूशी लढा देताना योग्य उपचार, पुरेशी विश्रांती आणि सकस आहार याच गोष्टी महत्वाच्या ठरतात.
स्वाईन फ्लूची लक्षणे ही सर्व साधारण फ्लूसारखीच असतात. यात थंडी, ताप १०० अंश पेक्षा जास्त सर्दी, खोकला, घसादुखी, अंगदुखी, पोटदुखी, मळमळ, उलटी, जुलाब व कधी कधी पोटदुखी इत्यादी लक्षणांचा समावेश असतो.
लिम्फॅटीर फायलेरीयासिस (एलएफ). यालाच हत्तीरोग या सामान्य नांवाने ओळखले जाते. हा एक शरीर विद्रूप करणारा, अकार्यक्षम करणारा रोग असून सामान्यतः तो लहानपणात होतो.
हिवताप हा परजीवी रोग आहे आणि तो अनाफीलीस नांवाच्या डासाच्या संक्रमणात्मक चाव्यातून तो पसरतो.
रक्तात हिवताप जंतू आहेत की नाही याची सत्वर तपासणी करण्यासाठी आता किट उपलब्ध आहेत.
हिवतापावर उपचार करताना दोन उद्देश असतात. (अ) थंडीताप, इत्यादी त्रास थांबवणे, (ब) रक्तातील नर-मादी रुपातल्या जंतूंचा समूळ नाश (रोगप्रसार होऊ नये म्हणून) व यकृतातील जंतूंचा नाश.
कधीकधी एखाद्या मर्यादित लोकवस्तीपुरता सार्वत्रिक क्लोरोक्वीनचा वापर केला जातो.