कर्करोग हा एकच आजार नसून विविध रोगांचे मिश्रण आहे. कर्करोगाचे १०० पेक्षाही जास्त प्रकार आहेत. साधारणतः ज्या अवयवास अथवा ज्या प्रकारच्या पेशींना हा रोग होतो त्यांचेच नाव कर्करोगाला दिले जाते.
कर्करोगाबद्दल भरपूर संशोधन झाले असले तरी कर्करोगाची कारणे पुरेशी कळलेली नाहीत.
कर्करोगाचे रोगनिदान लवकर होणे आवश्यक आहे. मात्र मुद्दाम विशेष प्रयत्न केले तरच हे शक्य असते.
कर्करोगाचे स्थानिक आक्रमण चालू असतानाच कर्कपेशी रसवाहिन्यांवाटे व रक्तावाटे पसरत असतात.
कर्करोगाचे निदान प्राथमिक अवस्थेत झाले तर उपचार जास्त यशस्वी होतात.
कर्करोग म्हणजेच कॅन्सर. कर्क म्हणजे खेकडा. कर्करोगाचे आजार खेकडयाप्रमाणे चिवट, धरले तर सहसा न सोडणारे असतात.
न्यूट्रोपीनिया म्हणजे रक्तातील पांढर्या पेशींचे प्रमाण कमी होणे. संसर्गाशी लढण्याचे काम मुख्यतः ह्याच पेशी करतात. केमोथेरेपी घेतल्यानंतर न्यूट्रोपीनिया आढळतो.
क्ताभिसरणातून योग्य त्या जागी कर्ककोशिका पोहोचताच तेथील केशवाहिन्यांच्या भित्तींना चिकटून राहिल्यानंतर त्या भित्तीतून आजूबाजूच्या ऊतकांत शिरतात व तेथे वृद्धिंगत होण्यासारखी परिस्थिती मिळताच प्रक्षेपजन्य अर्बुद तयार होते.
ल्युकेमिया, अर्थात रक्ताचा किंवा अस्थिमज्जेचा कर्करोग असतो आणि रक्तपेशींची, विशेषतः पांढ-या पेशींची असामान्य वाढ हे त्याची विशेषता असते.
स्तनाचा कर्करोग हा महिलांमधे सामान्यपणे होणारा कर्करोग आहे, आणि महिलांचे मृत्यु होण्याचे ते एक सर्वसामान्य कारण आहे.