सातारा जिल्ह्यातील मोफत नेत्र तपासणी शिबिराचा 609 रुग्णांना लाभ एशियन पेण्ट्स, वनराई आणि एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालयाचा संयुक्त उपक्रम एशियन पेण्ट्स, वनराई आणि एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने भोळी, केसुर्डी, धनगरवाडी आणि पिसाळवाडी (ता. खंडाळा, जि. सातारा) या गावांमध्ये मोफत नेत्र तपासणी शिबिर नुकतेच पार पडले. या शिबिराअंतर्गत चारही गावांतील एकूण 609 रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली. यामध्ये भोळी गावातील 250, केसुर्डी गावातील 143, धनगरवाडी परिसरातील 85 आणि पिसाळवाडी परिसरातील 131 रुग्णांचा समावेश होता. एच. व्ही. देसाई रुग्णालयातील नेत्रतज्ज्ञ कर्नल डॉ. व्ही. पी. आंदूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे 4 ते 5 तज्ज्ञ डॉक्टरांचा समूह या चारही गावांतील शिबिरांसाठी कार्यरत होता.
भोळी, केसुर्डी, धनगरवाडी आणि पिसाळवाडी या गावांमध्ये ‘एशियन पेण्ट्स’च्या सहकार्याने ‘वनराई’च्या माध्यमातून विविध विकास प्रकल्प राबविले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून या नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराअंतर्गत नेत्र तपासणीबरोबरच रुग्णांना चष्मे व आवश्यक त्या औषधांचे वाटप करण्यात आले, तसेच डोळ्यांची काळजी कशी घ्यावयाची याबाबतचे मार्गदर्शनही करण्यात आले. याशिवाय ज्या रुग्णांच्या नेत्रशस्त्रक्रिया करणे आवश्यक होते, अशांच्या नेत्रशस्त्रक्रियाही करण्यात आल्या.
एशियन पेण्ट्सच्या मानव संसाधन विभागाचे वरिष्ठ अधिकारी वैभव दीक्षित व विक्रम शिंदे यांनी शिबिराच्या आयोजनासाठी पुढाकार घेतला होता. तसेच राजेंद्रकुमार पाटील यांनी शिबिराच्या दरम्यान भेट देऊन शिबिराची पाहणी केली. वनराईचे अध्यक्ष रवींद्र धारिया आणि वित्त विभाग प्रमुख सुधीर मेकल यांच्या मागदर्शनाखाली व प्रकल्प संचालक प्रकाश जगताप आणि एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालयाचे नेत्रतज्ज्ञ डॉ. व्ही. पी. आंदूरकर यांच्या सुचनेनुसार शिबिर पार पडले. वनराईचे प्रकल्प अधिकारी सतीश आकडे, मुकुंद शिंदे, ज्ञानेश्वर सरडे, वनराई कार्यकर्ते अशोक पिंपळे, स्वामी खोपडे, सचिन जावीर यांनी शिबिर यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले, तसेच चारही गावांतील ग्रामपंचायतींचे विविध पदाधिकारी व ग्रामस्थांचा या शिबिरात प्रत्यक्ष सहभाग राहिला.
स्त्रोत : वनराई
अंतिम सुधारित : 3/9/2020
मेंदूतील तिसऱ्या मस्तिष्क विवराच्या छतावर किंचित प...
रुग्णाच्या रोगाचे निदान करणे आणि त्यावर वैद्यकीय व...
ग्रामीण रुग्णालयाला सामुदायिक आरोग्य केंद्र असेही ...
सन २०११ च्यात जनगणनेनुसार भारताची लोकसंख्येुच्याळ ...