অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

रुग्णालयीन सेवा

प्रस्तावना

राज्यात आरोग्य सेवा संचालनालयमार्फत प्रतिबंधात्मक व उपचारात्मक सेवा उपकेंद्रे, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपविभाग रुग्णालये, जिल्हा रुग्णालये, स्त्री रुग्णालये व सामान्य रुग्णालये मार्फत पुरविण्यात येतात. या केंद्रामध्ये आरोग्य सुविधा व उपचार पद्धती नवीन उपचारदवारे देण्यात येतात रुग्णालय यांचे काळानुरूप श्रेंनीवर्धन करून त्यांच्या ईमारती मध्ये आवश्यक बदल करण्यात येतात जेणेकरून रुग्णांना योग्य व त्वरित उपचाराच्या सुविधा प्राप्त होतात. जिल्हा रुग्णालये उपजिल्हा रुग्णालये व ग्रामीण रुग्णालये येथे रुग्णांना संदर्भ सेवा उपलब्ध करून दिले जातात. या रुग्णालयांचे राज्यस्तरावरून नियंत्रण केले जाते. याचे अत्यंत प्रभावशाली परिणाम समोर आले आहेत.

उददेश

रुग्णांना द्वितीय संदर्भा सेवा देण्यासाठी प्रथम व द्वितीय संदर्भ सेवा रुग्णालयांचे स्थापना करणे.

कार्यपद्धती

जिल्हा रुग्णालये, उप जिल्हा रुग्णालये, स्त्री रुग्णालये व सामान्य रुग्णालये यांची स्थापना करणे व मान्यता प्राप्त निकषानुसार मनुष्यबळ साधनसामुग्री व अनुदान वितरण करणे.

आरोग्य सुविधा

जळीत कक्ष

भाजेलल्या रुग्णांना वेळत उपचार देण्यासाठी खास जळीत कक्षाची स्थापना रुग्णालये मध्ये करणात आली आहे.

ट्रामा यूनिट

अपघाती मृत्यू कमी करण्यासाठी विभाग कक्ष उपलब्ध असून अपघात ग्रस्तांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात एकूण ६८ रुग्णालयात ट्रामा केयर यूनिट मंजूर करण्यात आलेली आहेत त्यापैकी २५ ट्रामा केयर यूनिट सध्या कार्यरत आहे.

अतिदक्षता कक्ष ICU

गंभीर रुग्णांना उपचार करण्याकरिता ६ खाटांचा अतिदक्षता कक्ष १८ अतिरिक्त कर्मचारी वर्गासह कार्यान्वित करण्यात आला आहे त्या करिता आवशक यंत्र सामुग्री उपलब्ध करून देण्यात आली आहे.

विशेष नवजात अर्भक काळजी कक्ष

कमी वजनात तथा अपूर्ण दिवसात जन्मलेले बालकांचा निगा अतिदक्षता कक्षात ठेऊन केल्यास मृत्यूचे प्रमाण बर्‍याच अंशी कमी शक्य असते यास्तव राजयातील सर्व जिल्हा रुग्णालया मध्ये व स्त्री रुग्णालया मध्ये नवजात बालकांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या कक्षासाठी १० अतिरिक्त कर्मचारी वर्ग तसेच अवशक यंत्र सामुग्री पुरवटा करणात आला आहे. सी. टी. स्कॅन राज्यात जिल्हा रुग्णालया मध्ये उपचारा करिता दाखल होणार्‍या रुग्णां मधील जखमी रुग्णांना डोक्याला मार लागलेले रुग्ण मोठया प्रमाणात असतात अशा रुग्णांना तातडीने

सी टी स्कॅन

चाचणी करून त्यांच्यावर वेळेत उपचार केल्यास जास्तीत जास्त व रुग्णांचे प्राण वाचविणे शक्य असते यास्तव सर्व जिल्हा रुग्णालये (वाशिम, पुणे वगळता ) व सामान्य रुग्णालये (मालेगाव वगळता) येथे ही सुविधा उपलब्ध आहे.

मोबाइल मेडिकल यूनिट

दुर्गम भागात त्वरीत आरोग्य सेवा पुरवण्या करिता मोबाइल मेडिकल यूनिट स्थापना करणात आली आहे. वरील सुविधा बरोबर सुरक्षा रुग्णवाहिका आहार स्वच्छता इत्यादि सेवा या रुग्णालयात उपलब्ध आहेत.

मनोविकृती कक्ष

राज्यात २३ जिल्हा रुग्णालये प्रत्यकी १० खतांचा मनोविकृती कक्ष सुरू करण्यात आलेला आहे.

सोनोग्राफी सुविधा

पोटातील रोगांचे अचूक निदान करण्यासाठी सर्व जिल्हा रुग्णालये, ७ स्त्री रुग्णालये, 3 सामान्य रुग्णालये येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे.

अनुदान

राज्यात रुग्णांसाठी औषधे व साधनसामुग्री साठा निकष पुढील प्रमाणे निश्चित करणात आले आहे

रूग्णांच्या खाटांची वर्गवारीमंजूर अनुदान रुपये
५० – १०० खाटांचे रुग्णालये रु. ६०००/- प्रतिखाट प्रती वर्ष
१०१ – २०० खाटांचे रुग्णालये रु. ११०००/- प्रतिखाट प्रती वर्ष
२०१ व त्या वरील खाटांचे रुग्णालये रु.२२०००/- प्रतिखाट प्रती वर्ष
३० खाटांचे ग्रामीण रुग्णालये रु. ६००००/- प्रति आदिवशी क्षेत्र ग्रामीण रुग्णालये
रु. ४०००००/- प्रति आदिवशी क्षेत्र ग्रामीण रुग्णालये

रुग्णालयातील उपलब्ध सुविधा

अ) जिल्हा रुग्णालये, सामान्य रुग्णालये व स्त्री रुग्णालये खालील सुविधा उपलब्ध आहेत.

  1. बाह्यरुग्ण विभाग
  2. आंतरुग्ण विभाग
  3. माता व बाल संगोपन विभाग
  4. तात्काळ उपचार कक्ष
  5. प्रयोगशाळा
  6. प्रसुतीग्रुह
  7. शस्त्रक्रिया ग्रुह
  8. शवविच्छेदन विभाग
  9. वाहन सुविधा (रुग्णवाहिका)
  10. नवजात अर्भक काळजी कोपरा
  11. क्ष-किरण
  12. न्याय वैद्यकीय प्रकरणे
  13. नेत्र तपासणी
  14. कुटूंब कल्याण शस्त्रक्रिया
  15. लसीकरण व कुटूंब कल्याण सुविधाबाबत समुपदेशन व निरोध वाटप
  16. राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रामंतर्गत आरोग्य सुविधा
  17. मोठ्या व छोट्या शस्त्रक्रिया
  18. एकात्मिक समुपदेशन व उपचार केंद्र, पालकांकडुन मुलांकडे संक्रमण प्रतिबंध उपचार केंद्र
  19. रक्तपेढी व रक्त घटक विघटन केंद्र
  20. फिजीओथेरेपी
  21. अतिदक्षता विभाग
  22. आहार विभाग
  23. दंत विभाग
  24. मनोविकृती विभाग
  25. जळीत विभाग
  26. विशेष नवजात अर्भक काळजी कक्ष
  27. शुश्रूषा केंद्र
  28. ट्रौमा केअर युनिट

ब) उपजिल्हा रुग्णालये (१०० खाटा) येथे खालील सुविधा उपल्ब्ध आहेत.

  1. बाह्यरुग्ण विभाग
  2. आंतरुग्ण विभाग
  3. माता व बाल संगोपन विभाग
  4. तात्काळ उपचार कक्ष
  5. प्रयोगशाळा
  6. प्रसुतीग्रुह
  7. शस्त्रक्रिया ग्रुह
  8. शवविच्छेदन विभाग
  9. वाहन सुविधा (रुग्णवाहिका)
  10. नवजात अर्भक काळजी कोपरा
  11. क्ष-किरण
  12. न्याय वैद्यकीय प्रकरणे
  13. नेत्र तपासणी
  14. कुटूंब कल्याण शस्त्रक्रिया
  15. लसीकरण व कुटूंब कल्याण सुविधाबाबत समुपदेशन व निरोध वाटप
  16. राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांतर्गत आरोग्य सुविधा
  17. मोठ्या व छोट्या शस्त्रक्रिया
  18. एकात्मिक समुपदेशन व उपचार केंद्र, पालकांकडुन मुलांकडे संक्रमण प्रतिबंध उपचार केंद्र
  19. रक्तपेढी
  20. फिजीओथेरेपी
  21. अतिदक्षता विभाग
  22. आहार विभाग
  23. मनोविकृती विभाग
  24. नेत्र शस्त्रक्रिय

क) उपजिल्हा रुग्णालये (५० खाटा) येथे खालील सुविधा उपलब्ध आहेत.

  1. बाह्यरुग्ण विभाग
  2. आंतरुग्ण विभाग
  3. माता व बाल संगोपन विभाग
  4. तात्काळ उपचार कक्ष
  5. प्रयोगशाळा
  6. प्रसुतीग्रुह
  7. शस्त्रक्रिया ग्रुह
  8. शवविच्छेदन विभाग
  9. वाहन सुविधा (रुग्णवाहिका)
  10. नवजात अर्भक काळजी कोपरा
  11. क्ष-किरण
  12. न्याय वैद्यकीय प्रकरणे
  13. नेत्र तपासणी
  14. कुटूंब कल्याण शस्त्रक्रिया
  15. लसीकरण व कुटूंब कल्याण सुविधाबाबत समुपदेशन व निरोध वाटप
  16. राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रामंतर्गत आरोग्य सुविधा
  17. मोठ्या व छोट्या शस्त्रक्रिया
  18. एकात्मिक समुपदेशन व उपचार केंद्र, पालकांकडुन मुलांकडे संक्रमण प्रतिबंध उपचार केंद्र
  19. रक्त पुरवठा केंद्र

ड) ग्रामीण रुग्णालये येथे खालील सुविधा उपल्ब्ध आहेत.

  1. बाह्यरुग्ण विभाग
  2. आंतरुग्ण विभाग
  3. माता व बाल संगोपन विभाग
  4. तात्काळ उपचार कक्ष
  5. प्रयोगशाळा
  6. प्रसुतीग्रुह
  7. शस्त्रक्रिया ग्रुह
  8. शवविच्छेदन विभाग
  9. वाहन सुविधा (रुग्णवाहिका)
  10. नवजात अर्भक काळजी कोपरा
  11. क्ष-किरण
  12. न्याय वैद्यकीय प्रकरणे
  13. नेत्र तपासणी
  14. कुटूंब कल्याण शस्त्रक्रिया
  15. लसीकरण व कुटूंब कल्याण सुविधाबाबत समुपदेशन व निरोध वाटप
  16. राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रामंतर्गत आरोग्य सुविधा
  17. मोठ्या व छोट्या शस्त्रक्रिया
  18. रक्त पुरवठा केंद्र

कार्य्रक्रमाचे वैशिष्ट्य

राज्यातील गरीब व गरजु रुग्णांना आपल्या गावात आरोग्य सुविधा मिळवण्यासाठी दुय्यम आरोग्य सेवा सर्व ठीकाणी उपलब्ध करुन देणे.

सेवा केंद्र

रुग्‍णालयांची यादी
जिल्‍हा रुग्‍णालये
अ.क्र रुग्‍णालयाचे नांव खाटा
1 जिल्‍हा रुग्‍णालय ठाणे 418
2 जिल्‍हा रुग्‍णालय अलिबाग 282
3 जिल्‍हा रुग्‍णालय रत्‍नागिरी 282
4 जिल्‍हा रुग्‍णालय नाशिक 623
5 जिल्‍हा रुग्‍णालय जळगांव 382
6 जिल्‍हा रुग्‍णालय अहमदनगर 282
7 जिल्‍हा रुग्‍णालय नंदुरबार 200
8 जिल्‍हा रुग्‍णालय पुणे 382
9 जिल्‍हा रुग्‍णालय सातारा 282
10 जिल्‍हा रुग्‍णालय सिंधुदुर्ग 200
11 जिल्‍हा रुग्‍णालय परभणी 401
12 जिल्‍हा रुग्‍णालय जालना 266
13 जिल्‍हा रुग्‍णालय हिंगोली 200
14 जिल्‍हा रुग्‍णालय बीड 382
15 जिल्‍हा रुग्‍णालय उस्‍मानाबाद 266
16 जिल्‍हा रुग्‍णालय अमरावती 439
17 जिल्‍हा रुग्‍णालय बुलढाणा 382
18 जिल्‍हा रुग्‍णालय वाशिम 200
19 जिल्‍हा रुग्‍णालय गोंदिया 200
20 जिल्‍हा रुग्‍णालय भंडारा 482
21 जिल्‍हा रुग्‍णालय वर्धा 282
22 जिल्‍हा रुग्‍णालय चंद्रपुर 382
23 जिल्‍हा रुग्‍णालय गडचिरोली 282

सामान्‍य रुग्‍णालये
अ.क्र रुग्‍णालयाचे नांव खाटा
1 सामान्‍य रुग्‍णालय उल्‍हासनगर 202
2 सामान्‍य रुग्‍णालय मालेगांव 252
3 सामान्‍य रुग्‍णालय खामगांव 200
4 सामान्‍य रुग्‍णालय मालेगांव 60

संदर्भ सेवा रुग्‍णालय
अ.क्र रुग्‍णालयाचे नांव खाटा
1 विभागीय संदर्भ सेवा नाशिक 100
2 विभागीय संदर्भ सेवा अमरावती 100


इतर रुग्‍णालय खाटा
1 अस्थिव्‍यंग रुग्‍णालय परभणी 60
रुग्‍णालयांची यादी

स्त्री रुग्‍णालये
अ.क्र रुग्‍णालयाचे नांव खाटा
1 स्त्री रुग्‍णालय नागुपर 351
2 स्त्री रुग्‍णालय अकोला 316
3 स्त्री रुग्‍णालय अमरावती 216
4 स्त्री रुग्‍णालय गोंदिया 216
5 स्त्री रुग्‍णालय जालना 76
6 स्त्री रुग्‍णालय परभणी 76
7 स्त्री रुग्‍णालय नेकनुर बीड 76
8 स्त्री रुग्‍णालय उल्‍हासनगर 66
9 स्त्री रुग्‍णालय लातुर 116
10 स्त्री रुग्‍णालय उस्‍मानाबाद 76
11 स्त्री रुग्‍णालय नांदेड 116
उपजिल्‍हा रुग्‍णालये 100 खाटा
अ.क्र रुग्‍णालयाचे नांव खाटा
1 उपजिल्‍हा रुग्‍णालय शहापुर जि.ठाणे 100
2 उपजिल्‍हा रुग्‍णालय जव्‍हार जि. ठाणे 100
3 उपजिल्‍हा रुग्‍णालय भिंवडी जि. ठाणे 100
4 उपजिल्‍हा रुग्‍णालय माणगांव जि. रायगड 100
5 उपजिल्‍हा रुग्‍णालय कळबंणी जि. रत्‍नागिरी 100
6 उपजिल्‍हा रुग्‍णालय कळवण जि.नाशिक 100
7 उपजिल्‍हा रुग्‍णालय चोपडा जि. जळगांव 100
8 उपजिल्‍हा रुग्‍णालय शिरपुर जि. धुळे 100
9 उपजिल्‍हा रुग्‍णालय कराड जि. सातारा 100
10 उपजिल्‍हा रुग्‍णालय मंचर जि. पुणे 100
11 उपजिल्‍हा रुग्‍णालय पंढरपुर जि. सोलापुर 100
12 उपजिल्‍हा रुग्‍णालय गडहिंगलज जि. कोल्हापूर 100
13 उपजिल्‍हा रुग्‍णालय सावतवाडी जि. सिधुर्दुर्ग 100
14 उपजिल्‍हा रुग्‍णालय कणकवली जि. सिधुर्दुर्ग 100
15 उपजिल्‍हा रुग्‍णालय वैजापुर जि. औरंगाबाद 100
16 उपजिल्‍हा रुग्‍णालय उदगीर जि. लातुर 100
17 उपजिल्‍हा रुग्‍णालय उमरगा जि. उस्‍मानाबाद 100
18 उपजिल्‍हा रुग्‍णालय तुळजापुर जि. उस्‍मानाबाद 100
19 उपजिल्‍हा रुग्‍णालय परळी जि. बीड 100
20 उपजिल्‍हा रुग्‍णालय मुखेड जि. नांदेड 100
21 उपजिल्‍हा रुग्‍णालय मुर्तीजापुर जि. अकोला 100
22 उपजिल्‍हा रुग्‍णालय अचलपुर जि. अमरावती 100
23 उपजिल्‍हा रुग्‍णालय शेगांव जि. बलुढाणा 100
24 उपजिल्‍हा रुग्‍णालय हिंगणघाट जि.वर्धा 100
उपजिल्‍हा रुग्‍णालये ५० खाटा
अ.क्र रुग्‍णालयाचे नांव खाटा
1 उपजिल्‍हा रुग्‍णालय कासा जि. ठाणे 50
2 उपजिल्‍हा रुग्‍णालय पेण जि. रायगड 50
3 उपजिल्‍हा रुग्‍णालय कर्जत जि. रायगड 50
4 उपजिल्‍हा रुग्‍णालय दापोली जि. रत्‍नागिरी 50
5 उपजिल्‍हा रुग्‍णालय कामठे चिपळुण जि. रत्‍नागिरी 50
6 उपजिल्‍हा रुग्‍णालय चांदवड जि. नाशिक 50
7 उपजिल्‍हा रुग्‍णालय निफाड जि. नाशिक 50
8 उपजिल्‍हा रुग्‍णालय मनमाड जि. नाशिक 50
9 उपजिल्‍हा रुग्‍णालय जामनेर जि. जळगांव 50
10 उपजिल्‍हा रुग्‍णालय मुक्‍ताईनगर जि. जळगांव 50
11 उपजिल्‍हा रुग्‍णालय कर्जत जि. अहमदनगर 50
12 उपजिल्‍हा रुग्‍णालय पाथर्डी जि. अहमदनगर 50
13 उपजिल्‍हा रुग्‍णालय दोडाईचा जि. धुळे 50
14 उपजिल्‍हा रुग्‍णालय तळोदा जि. नंदुरबार 50
15 उपजिल्‍हा रुग्‍णालय नवापुर जि. नंदुरबार 50
16 उपजिल्‍हा रुग्‍णालय इंदापुर जि. पुणे 50
17 उपजिल्‍हा रुग्‍णालय भोर जि. पुणे 50
18 उपजिल्‍हा रुग्‍णालय दौंड जि. पुणे 50
19 उपजिल्‍हा रुग्‍णालय फलटण जि. सातारा 50
20 उपजिल्‍हा रुग्‍णालय करमाळा जि. सोलापुर 50
21 उपजिल्‍हा रुग्‍णालय अकलुज जि. सोलापुर 50
22 उपजिल्‍हा रुग्‍णालय कोडोली जि. कोल्‍हापुर 50
23 उपजिल्‍हा रुग्‍णालय गांधीनगर जि. कोल्‍हापुर 50
24 उपजिल्‍हा रुग्‍णालय सेवा रुग्‍णालय जि. कोल्‍हापुर 50
25 उपजिल्‍हा रुग्‍णालय शिरोडा जि. सिधुदुर्ग 50
26 उपजिल्‍हा रुग्‍णालय इस्‍लामपुर जि. सांगली 50
27 उपजिल्‍हा रुग्‍णालय कवठेमहाकाळ जि. सांगली 50
28 उपजिल्‍हा रुग्‍णालय सिल्‍लोड जि. औरंगाबाद 50
29 उपजिल्‍हा रुग्‍णालय गंगापुर जि.औरंगाबाद 50
30 उपजिल्‍हा रुग्‍णालय अंबड जि. जालना 50
31 उपजिल्‍हा रुग्‍णालय सेलु जि. परभणी 50
32 उपजिल्‍हा रुग्‍णालय गंगाखेड जि. परभणी 50
33 उपजिल्‍हा रुग्‍णालय वसमत जि. हिंगोली 50
34 उपजिल्‍हा रुग्‍णालय निलंगा जि. लातुर 50
35 उपजिल्‍हा रुग्‍णालय परांडा जि. उस्‍मानाबाद 50
36 उपजिल्‍हा रुग्‍णालय गेवराई जि. बीड 50
37 उपजिल्‍हा रुग्‍णालय देगलुर जि. नांदेड 50
38 उपजिल्‍हा रुग्‍णालय हादगांव जि. नांदेड 50
39 उपजिल्‍हा रुग्‍णालय गोकुंदा जि. नांदेड 50
40 उपजिल्‍हा रुग्‍णालय धारणी जि.अमरावती 50
41 उपजिल्‍हा रुग्‍णालय दर्यापुर जि.अमरावती 50
42 उपजिल्‍हा रुग्‍णालय मोर्शी जि.अमरावती 50
43 उपजिल्‍हा रुग्‍णालय मलकापुर जि.बलुढाणा 50
44 उपजिल्‍हा रुग्‍णालय दारव्‍हा जि. यवतमाळ 50
45 उपजिल्‍हा रुग्‍णालय पांढरकवडा जि. यवतमाळ 50
46 उपजिल्‍हा रुग्‍णालय पुसद जि. यवतमाळ 50
47 उपजिल्‍हा रुग्‍णालय रामटेक जि.नागपुर 50
48 उपजिल्‍हा रुग्‍णालय कामठी जि.नागपुर 50
49 उपजिल्‍हा रुग्‍णालय आर्वी जि. वर्धा 50
50 उपजिल्‍हा रुग्‍णालय साकोली जि. भंडारा 50
51 उपजिल्‍हा रुग्‍णालय तिरोडा जि. गोदिया 50
52 उपजिल्‍हा रुग्‍णालय मुल जि.चंद्रपुर 50
53 उपजिल्‍हा रुग्‍णालय वरोरा जि.चंद्रपुर 50
54 उपजिल्‍हा रुग्‍णालय कुरखेडा जि. गडचिरोली 50
55 उपजिल्‍हा रुग्‍णालय अहेरी जि. गडचिरोली 50
56 उपजिल्‍हा रुग्‍णालय अरमोरी जि. गडचिरोली 50

निमशासकीय व खाजगी संस्थांची भूमिका

  • शासनाने ठरविलेले उद्दिष्ट पूर्तीसाठी खाजगी संस्थाबरोबर भागीदारी करणे अत्यंत उपयुक्त आहे.
  • जीवनदायी योजने अंतर्गत 'दारिद्र्य रेषेखालील' कुटुंबांना आरोग्य सेवा पुरविण्यासाठी खाजगी रुग्णालयांना "पब्लिक प्रायवेट पार्टनर्शिप" माध्यमातून सहभागी करून घेण्यात आले आहे.
  • राज्य सरकारी कर्मचार्‍यांना उपचारात्मक सेवा देण्यासाठी "पब्लिक प्रायवेट पार्टनर्शिप" चे `माध्यमातून खाजगी रुग्णालयांना सहभागी करून घेण्यात आले आहे.
  • खाजगी रुग्णालयाच्या मदतीने तातडीच्या वैद्यकीय सेवा व रेडीओग्राफी (सी.टी स्कॅन, एम. आर. आय, क्ष किरण) अंतर्भूत करण्याची प्रक्रिया चालू आहे.
  • खाजगी रुग्णालयांना 'जननी सुरक्षा योजने' अंतर्गत सहभागी करण्यात आले आहे.
  • जननी शिशु सुरक्षा कार्यक्रमांतर्गत सेवा देण्यासाठी खाजगी रुग्णवाहिका भाडे तत्वावर घेण्यात आल्या आहेत.
  • आय.पी.एच.एस. अंतर्गत खाजगी विशेषज्ञ व तांत्रिक कर्मचारी यांना करारपद्धतीवर नेमणूक देण्यात आली असून, या माध्यमातून रिक्त असलेल्या पदांची तुट भरून काढण्यात आली आहे.
  • स्वच्छता, सुरक्षा, रुग्णवाहिका, आहार, लौंडरी या सेवा खाजगी कंत्राट दारांच्या माध्यमातून पुरविण्यात येतात.

मुख्य कामगिरीचा आढावा

  • मुख्य अभियंता औरंगाबाद यांच्या मदतीने ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये ५० खाटा व १०० खाटा, जिल्हा रुग्णालये यांच्या मुख्य इमारत व निवासस्थानाच्या बांधकामाचे कृती आराखडे मंजूर करण्यात आले आहेत. यामुळे सर्व रुग्णालयांना मुख्य इमारत व निवासस्थानासाठी मुबलक जागा उपलब्ध होईल.
  • अद्याप पर्यन्त एकूण ६८ ट्रामाकेअर यूनिटला मंजूरी मिळाली असून दिनांक १७/०१/२०१३ च्या शासननिर्णयानुसार ४२ नवीन ट्रामाकेअर यूनिटला मंजूरी मिळाली आहे.
  • राज्यातील ३४ मोठ्या रुग्णालयांमध्ये नवजात अर्भक काळजी कक्षाची स्थापना करण्यात आली असून बांधकाम, मनुष्यबळ व उपकरणांचा पुरवठा इत्यादी बाबी अंतिम टप्यात आहेत.
  • थालेसेमिया, हिमोफेलीया व सिकल सेल अनेमियाच्या रुग्णांसाठी ४ जिल्ह्यांमध्ये डे केअर सेंटरची स्थापना करण्यात आली आहे.
  • काही निवडक रुग्णालयांमध्ये दैनंदिन कामकाजाचे संगणकीकरण ई-हॉस्पिटल या प्रकल्पा अंतर्गत करण्यात येणार आहे. त्यानंतर सर्व रुग्णालयात ही प्रणाली राबविण्यात येईल.
  • रुग्णालयांमध्ये अपंग प्रमाणपत्राचे वितरण करण्यासाठी संगणक प्रणाली कार्यान्वित करण्यात आले असून या प्रणाली द्वारे प्रमाणपत्राचे वितरण करण्यात येत आहे.
  • प्रोस्थेटिक व अर्थोटिक वर्कशॉपची स्थापना ३ जिल्ह्यांमध्ये करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
  • राजीव गांधी जीवनदायी योजना अंतर्गत १२ रुग्णालयांमध्ये सलग्निकरण करण्यात आले आहे.
  • राष्ट्रीय कर्णबधीरता प्रतिबंध व नियंत्रण कार्यक्रमतांर्गत १६ जिल्हयांची निवड करण्यात आली असून त्यामध्ये पडताळणी शिबिरे, केंद्र शासनाच्या निर्देशंकानुसार मनुष्यबळ भरती, उपकरणे पुरवठा निदानात्‍मक तपासण्‍या व कानाच्‍या आजारांवर उपचार तसेच पुर्नवसन कार्यक्रमांतर्गत कर्ण यंत्राचा पुरवठा इत्‍यादी बाबीचा समावेश आहे.
  • राज्‍यात स्‍त्री रुग्‍णालयाची स्‍थापना करुन सध्‍या कार्यरत आहेत.
    1. ४७ ग्रामीण रुग्‍णालयाची स्‍थापना.
    2. ३४ ग्रामीण रुग्‍णालयांचे ५० खाटांच्‍या उपजिल्‍हा रुग्‍णालयात श्रेणीवर्धन
    3. ५ ग्रामीण रुग्‍णालयाचे १०० खाटांच्‍या रुग्‍णालयात श्रेणीवर्धन
    4. १ ग्रामीण रुग्‍णालयांचे २०० खाटांच्‍या रुग्‍णालयात श्रेणीवर्धन
    5. ५० खाटांच १० उपजिल्‍हा रुग्‍णालयांचे १०० खाटांच्‍या उपजिल्‍हा रुग्‍णालयात श्रेणीवर्धन
    6. १०० खाटांच्‍या ३ उपजिल्‍हा रुग्‍णालयांचे २०० खाटांच्‍या रुग्‍णालयामध्‍ये श्रेणीवर्धन
    7. १०० खाटांच्‍या १ उपजिल्‍हा रुग्‍णालयाचे ३०० खाटांच्‍या रुग्‍णालयामध्‍ये श्रेणीवर्धन
    8. ५० खाटांच्या १ नविन उपजिल्हा रुग्णालय आणि १०० खाटांचे दोन नवीन उपजिल्हा रुग्णालयांची स्थापना
    9. १५ नवीन स्त्री रुग्णालयांची स्थापना
    10. २० खाटांच्या ४२ ट्रामा केअर यूनिटची स्थापना
    11. कार्यान्वित असलेल्या २ स्त्री रुग्‍णालयाचे श्रेणीवर्धन
    12. सरकारी वैद्यकीय महाविद्यालये असलेल्या १० जिल्ह्यांमध्ये जिल्हा रुग्‍णालयाची स्‍थापना.
    13. केंद्र शासनाच्या आर्थिक मदतीद्वारे ३ ट्रामा केअर यूनिटचे श्रेणीवर्धन (उपकरणे पुरवठा, मनुष्यबळ व बांधकाम द्वारा)
    14. कृती आराखाडयानुसार शासकीय वैद्यकीय अधिकार्‍यांना सर्व सुविधायुक्त निवासस्थाने
    15. आईकोनिक स्कीमचे माध्यमातून निवडक रुग्णालयांचे श्रेणीवर्धन
    16. जिल्हा रुग्णालयांमध्ये १० अतिरिक्त विशेष सेवा विभागांची स्थापना
    17. विशेष संदर्भ सेवा पुरविण्यासाठी विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयाची नाशिक व अमरावती येथे स्थापना करण्यात आली आहे.

ठसा (व्याप्ती)

  • अर्भक मृत्युदरात घट
  • माता मृत्युदरात घट
  • कुपोषित बालकांना पोषण पुनर्वसन केंद्रा मार्फत आहाराची सुविधा
  • जळीत रुग्णांसाठी विशेषज्ञ उपाचार सुविधा
  • ट्रौमा यूनिटच्या माध्यमातून अपघातग्रस्त रुग्णांना सेवा व अपंगत्व येऊ नये यासाठी अर्थोपेडीक व फिजिओथेरपिस्ट यांच्यामार्फत सोई सुविधा
  • अपंगत्व प्रमाणपत्राचे नियमित वितरण
  • अत्यवस्थ रुग्णांना अपघात कक्षामार्फत तात्काळ उपाचार
  • अत्यवस्थ रुग्णांना शस्त्रक्रिया व उपाचार
  • अतिदक्षता विभागामार्फत अत्यवस्थ रुग्णांना व कमी वजनाच्या नवजात बालकांना उपाचार

 

स्त्रोत : सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन

अंतिम सुधारित : 6/2/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate