অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

राष्‍ट्रीय अंधत्‍व नियंत्रण कार्यक्रम

ऐतिहासिक पार्श्वंभुमी

राज्‍यात १९७२-७३ मध्‍ये खुप-या (ट्राकोमा) नियंत्रण कार्यक्रम सुरु करण्‍यात आला, त्‍यानंतर १९७६-७७ मध्‍ये या कार्यक्रमाचे राष्‍ट्रीय अंधत्‍व नियंत्रण कार्यक्रम मध्‍ये रुपांतर करण्‍यात आले. राष्‍ट्रीय अंधत्‍व नियंञण कार्यक्रम १०० टक्‍के केंद्र पुरस्‍कृत योजना असुन सन १९७६ पासुन सुरु करण्‍यात आली. त्‍या वर्षात अंधत्‍वाचे प्रमाण १.४ टक्‍के होते, ११ व्‍या पंचवार्षिक योजनेच्‍या शेवटी (२०१२) अंधत्वाचे प्रमाण ०.८ टक्‍के आणण्‍याचे उदिष्टे असुन २०२० पर्यंत हे प्रमाण ०.३ पर्यंत आणावयाचे उदिष्टे आहे

उदिदष्‍टे

  • अंध व्‍यक्‍ती शोधुन काढणे आणि उपचार माध्‍यमातुन अंधत्‍वाचा अनुशेष कमी करणे
  • प्रत्‍येक जिल्‍हायात सर्व समावेशक नेत्र सेवा सुविधा विकसित करणे
  • नेत्र विषयक सेवा पुरविणा-या साधनांची गुणवत्‍ता व मनुष्‍यबळ विकसीत करणे
  • अंधत्‍व नियंञण कार्यक्रमांतर्गत स्‍वयंसेवी संस्‍था / खाजगी व्‍यावसायीक यांना सहभागी करणे
  • नेत्र सेवा कार्यक्रमांबाबत जागरुकता वाढविणे

प्रमुख ध्‍येय

  • सेवा वितरणाचे बळकटीकरण
  • नेत्र विषयक सेवांसाठी मनुष्‍यबळ विकसीत करणे
  • सामुहीक जनजागृती आणि बाहयसंपर्क उपक्रमांना प्रोत्‍साहन देणे.
  • संस्‍थाची क्षमता वाढविणे

उपक्रम

कार्यक्रमाचे दिशानिर्देशन हे मुख्‍यत्‍वे अंधाचे सर्वेक्षण करणे, मोतिबिंदु शस्त्रक्रिया करणे व शालेय विदयार्थ्‍यांची तपासणी करुन दृष्‍टीदोष आढळलेल्‍या विदयार्थ्‍यांना चष्‍मा पुरवठा करणे या करीता केलेले आहे. तसेच ११ व्‍या पंचवार्षिक योजनेमध्‍ये डायबेटीक रेटीनोपॅथी, काचबिंदु व्‍यवस्‍थापन, बुब्‍बुळ प्रत्‍यारोपण, व्हिट्रोरेटायनल सर्जरी व बालपणातील अंधत्‍व यांचा आर्थिक मदतीसाठी समावेश करण्‍यात आला.

आर्थिक तरतुद

राष्‍ट्रीय अंधत्‍व नियंञण कार्यक्रम १०० टक्‍के केंद्र पुरस्‍कृत कार्यक्रम आहे.

सेवा

  • मोतिबिंदु शस्त्रक्रियामध्येष मुख्‍यतः कृत्रीम भिंगरोपण (IOL) शस्त्रक्रिया ९५ टक्‍के पेक्षा जास्‍त करणे.
  • मोतिबिंदु शस्त्रक्रिया व्‍यतिरिक्‍त अशासकिय स्‍वयंसेवी संस्‍थाना इतर डोळयांचे आजारांवर उपचारासाठी आर्थिक सहायता देण्‍यात येते.
  • दृष्टिदोष शोधण्‍यासाठी शालेय विदयार्थ्‍यांची नेञ तपासणी करण्‍यात येते व दृष्‍टीदोष आढळलेल्‍या गरीब विदयार्थ्‍यांना मोफत चष्‍मा पुरव‍ठा केला जातो.
  • बुब्‍ब्‍ुाळ प्रत्‍यारोपणासाठी मृत्‍यु पश्चात दान केलेल्‍या डोळयांचे संकलन करणे
  • सार्वजनीक क्षेञातील नेत्र विषयक सेवांची क्षमता वाढविण्‍यासाठी रुग्‍णांलयांना मदत प्रदान करणे
  • ग्रामीण लोकसंख्‍येसाठी नेत्र सेवा केंद्र बळकटीकरण व विस्‍तृतीकरणासाठी स्‍वयंसेवी संस्‍थाना विना आवर्ती मदत प्रदान करणे.
  • जिल्‍हा रुग्‍णालयात नेत्र शस्त्रक्रियागृह आणि नेत्रकक्षाचे बांधकाम करणे
  • नेत्र सेवा कार्यक्रमात कार्यरत कर्मचा-यांच्‍या बळकटीकरणासाठी प्रशिक्षण उपक्रमांचे आयो‍जन करणे
  • प्रादेशिक नेत्र सेवा संस्‍था, वैदयकिय महाविदयालय, जिल्‍हा , उपजिल्‍हा रुग्‍णालय, प्राथमिक आरोग्‍य केंद्र / व्हिजन सेंटर्स यांना पुरवठा केलेल्‍या डोळयांसंबधी उपकरणाचे देखभाल करणे
  • मोतिबिंदु शस्त्रक्रियासाठी अशासकिय स्‍वयंसेवी संस्‍थाना प्रती शस्‍ञक्रिया रु१०००/- प्रमाणे अनुदान देण्‍यात येते व शासकीय जिल्हा रुग्णालयाना मोतिबिंदु शस्त्रक्रियासाठी आवश्यक औषधी व साहित्य सामग्री करिता रु .४५०/- प्रमाणे सहाय्यक अनुदान देण्‍यात येते. इतर नेत्र आजारावरील उपचार व शस्त्रक्रिया करिता अशासकिय स्‍वयंसेवी संस्‍थाना खालीलप्रमाणे अनुदान देण्यात येते,
    • १) मधुमेह रेटीनोपॅथी- १५००/-,
    • २)काचबिंदु उपचार / व्‍यवस्‍थापन-१५००/-,
    • ३) बुब्‍बुळ प्रत्‍यारोपण-५०००/-,
    • ४) व्हिट्रोरेटायनल सर्जरी-५०००/-
    • ५)बालपणातील अंधत्‍व उपचार व व्‍यवस्‍थापक करीता रु.१५००/-अनुदान देण्‍यात येते.
  • नेत्रदान कार्यक्रमांतर्गत कार्यरत अशा सक्रिय स्वञयंसेवी संस्थातना प्रती नेत्र बुब्‍बुळ रु .१०००/- प्रमाणे संकलन व साठा यासाठी नोंदणीकृत नेत्रपेढीला दिले जाते व त्‍यापैकी रु.५००/- प्रती नेत्र बुब्‍बुळ याप्रमाणे नोंदणीकृत नेञ संकलन केंद्राना नेत्र संकलन करण्‍यासाठी नेत्रपेढीमार्फत दिले जातात.
  • १२ व्या पंचवार्षिक योजनेमध्ये Presbypoia ने ग्रस्त वयस्क (वय वर्षे ४५ किंवा त्यापेक्षा जास्त )व्यक्तींना मोफत जवळचे चस्मे पुरवठा करण्याच्या नवीन उपक्रम चालू करण्यात आला आहे.सदर मध्ये दारिद्र्य रेषेखालील व्यक्तींना प्राधान्य देण्यात येणार आहे.

योजना /कार्यक्रमाची खास वैशीष्ठे

मोतीबिंदू शस्त्रक्रिया मध्ये ९९% शस्त्रक्रिया या आय .ओ. यल (IOL) शस्त्रक्रिया होतात

सेवा केंद्रे

  • राज्‍यामधील शासकिय मोतिबिंदु शस्त्रक्रिया केंद्र (जिल्‍हानिहाय)
  • वैदयकिय महाविदयालये
  • राज्‍यातील नेत्र पेढयासहीत नेत्रदान केंद्र
  • मोतिबिंदु शस्त्रक्रिया करणा-या अशासकिय स्‍वयंसेवी संस्‍था

अशासकिय स्‍वयंसेवी संस्‍थाची भुमिका

  • मोतिबिंदु शस्त्रक्रिया करणे
  • बुब्‍बुळ प्रत्‍यारोपण (कॅरोटोप्‍लास्‍टी) शस्त्रक्रिया करणे
  • इतर नेञ आजारावरील शस्त्रक्रिया व उपचार करणे

योजना

सर्व राज्यात कार्यक्रम यशस्वी पणे राबविणेकरिता केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचंनांनुसार राज्य आरोग्य सोसायटी महाराष्ट्र (अंधत्व विभाग ) व जिल्हा आरोग्य सोसायटीची ब्रहन्मुंबई महानगरपालीकेसहित सर्व जिल्हयामध्ये स्थापना करणेत आलेली आहे.

 

स्त्रोत : सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन

 

अंतिम सुधारित : 7/17/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate