অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

नखे कापणे व दात घासणे

नखे कापणे व दात घासणे

नखे कापणे

वेळोवेळी नखे कापणे हे मुख्यतः पचनसंस्थेच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे. वाढलेल्या नखांच्या खोबणीत मळजंतांची अंडीमातीइत्यादी पदार्थ साठतात. यातून स्वतःला व इतरांना संसर्ग होत राहतो. दर 2-3 आठवडयांनी हातापायाची नखे काढावीत. लहान मुलांना नखे काढायची सवय लावावी.

दात घासणे

दातांच्या फटीत अन्नकण अडकून व दातांवर अन्नाचा सूक्ष्म थर जमून जंतूंची वाढ होते. त्यामुळे दात लवकर किडतात. जंतूंमुळेतोंडाला दुर्गंधी येते आणि हिरडया सुजतात. हे टाळण्यासाठी प्रत्येक जेवणानंतर खळखळून चूळ भरावी. याचबरोबर दातहिरडया चोळून धुणे आवश्यक असते. सकाळी उठल्यावर व रात्री झोपताना दात साफ करणे आवश्यक आहे. दात घासण्यासाठी फक्त ब्रश किंवा दातवण काडी (चावून धागे मोकळे झालेली) पुरते. टूथपेस्टची उपयुक्तता मर्यादित आहे. पेस्ट नसल्यास नुसता ब्रश पुरतो. गोड चवीच्या टूथपेस्टपेक्षा कडूतुरट,तिखटखारट चवीची मंजने दातावरचे चिकट आवरण सहज काढतात. यासाठी साधी राख किंवा कोळशाची पूडही चालते. दातांच्या फटी साफ करण्यासाठी मात्र ब्रश किंवा दातवण लागते. बाभूळकडूनिंब यांच्या काडया दातवणासाठी सर्रास वापरल्या जातात. ही चांगली पध्दत आहे. मिश्रीने मात्र दातावर किटण चढते. आरोग्याच्या दृष्टीने मिश्रीचा वापर चुकीचा आहे. ब्रश वापरण्याची पध्दत महत्त्वाची आहे. ब्रश आडवा न चालवता'खाली-वरफिरवला पाहिजे म्हणजे फटी स्वच्छ होतील.

हिरडया बोटाने चोळणेही दात घासण्याइतकेच महत्त्वाचे आहे. हिरडया चोळण्याने तिथला रक्तप्रवाह सुधारतो


लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)

संदर्भ : आरोग्याविद्या

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate