অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

शिशु आणि शाळेला जाण्या आधीच्या वयातील लहान मुलांसाठी पोषक नाश्ता

प्रस्तावना

अनेक परिवारांमध्ये हे एक सर्व साधारण प्रथा आहे की आपण लहान मुलांना धान्य आणि चणा डाळ किंवा डाळींचे, तेलबियांचे लाडू, इ. नाश्ता देतो. काही वेळेस आपण गावातल्या बाजारात मिळणारे साधे स्वस्त बिस्किट नाश्त्यासाठी देतो.

करतर, हैद्राबादच्या जवळच्या गावांमध्ये केले गेलेल्या एका सर्वेक्षण मध्ये हे दिसून आले आहे की शिशुच्या चार महिल्यांपासूनच नाश्त्यासाठी बिस्किट देतात. ह्याने हे दिसून येते की असे नाश्ते देण्यात आल्या मुळे आपल्याला एक पर्याय मिळतो की आपण मुलांचे पोषक आहार घेणे वाढवू शकता.

ह्या स्वस्त बिस्किटांचे मुख्य घटक म्हणजे कोंडा आणि तृण धान्य आहे. तीळ आणि गुळाचे लाडू किंवा भाजलेल्या चणाडाळ आणि गुळाचे लाडू यांच्या मध्ये फार कमी प्रमाणात डाळ किंवा तेलबिया असतात. अशा प्रकारच्या नाश्त्यांमध्ये पोषक आहारात कमतरता असते विशेषकरून प्रथिनची कमतरता आहे. जर योग्य प्रमानात तीळ किंवा शेंगदाणे सारखे तेलबीजवापरण्यात आले की चेक्की आणि तिळाचे लाडू सुद्धा अतोरिक्त आहाराच्या स्वरूपात देऊ शकता.

जेव्हा बिस्किट सारखे नाश्ता मुलांना आवडते, नॅशनल इन्स्टिटूट ऑफ न्यूट्रिशन ने स्थानिक बाजारात मिळण्या-या वस्तूंपासून पौष्टिक‍ बिस्किट तयार करण्याच्या पद्धती तयार केलेल्या आहेत. त्याच दरात, ह्या पद्धतीने तयार केलेली बिस्किट बाजारात मिळणा-या बिस्कीटांपेक्षा तीन ते चार पटीने जास्त प्रथिन पुरवतात. त्याच बरोबर ही बिस्किट तयार करण्याची पद्धत फार सोपी आहे. गावात असलेल्या सहायक समिती, महिला मंडळ किंवा गावातले दुकानदार सुद्धा सीमांतिक फायदा ठेऊन ही बिस्किट तयार करू शकतात. अशा प्रकारे, जास्त खर्च न करता गावातल्या लहान मुलांना पौष्टिक‍ नाश्ता पुरवू शकता.

पौष्टिक‍ बिस्किट तयार करण्याची पद्धती पुढे दिलेली आहे.

बिस्किट तयार करण्याची सामान्य पद्धती

  • मुख्य सामग्री बारीक करून मिसळून घ्या.
  • बेकिंग पावडर आणि मीठ घालून चांगले मिसळून घ्या.
  • थोडे तेल किंवा लोणी घालून एक घट्ट कणीक तयार करून घ्या. (शेंगदाण्याच्या बिस्किट मध्ये वरून तेल किंवा लोणी घालण्याची गरज नाही.)
  • चपातीसारखे लाटून घ्या.
  • झाकण किंवा कोणत्याही धारदार वस्तूने पसंती प्रमाणे आकार कापून घ्या.
  • ही बिस्किट ट्रे वर ठेऊन गरम वाळूवर ठेऊन डेकचीत (भट्टीत) शेकून घ्या. (डेकचीत ठेवतान हे लक्षात ठेवा की त्याला झाकून झाकणावर गरम कोळसे ठेवा जेणे करून चारी बाजूने एकसारखे शेकले जाईल).
  • बिस्किट सोनेरी- तपकिरी रंगचे झाल्यावर काढून घ्या. हे सुमारे २० मिनिटे घेईल.

खाली दिलेले सामग्रीचे प्रमाण एका बालकासाठी एका दिवसात देण्यास दिले आहे. जास्त प्रमाणात मुलांना खाऊ घालण्यास त्या प्रमाणे सामग्रीचे प्रमाण वाढवून घ्या.

बिस्किट करण्याची पद्धती

शेंगदाण्याचे बिस्किट

 

साहित्य

भाजलेले शेंगदाणे

२५ ग्राम

भाजलेले गव्हाचे पीठ

२५ ग्राम

साखर

२० ग्राम

बेकिंग पावडर

एक चिमूट भर

मीठ

एक चिमूट भर

चणा डाळ- तिळाचे बिस्किट

 

साहित्य

चणा डाळीचे पीठ (बेसन)

१० ग्राम

मैदा

१५ ग्राम

तीळ

१५ ग्राम

साखर

२० ग्राम

वनस्पती

८ ग्राम

बेकिंग पावडर

एक चिमूट भर

मीठ

एक चिमूट भर

चणा डाळीचे बिस्किट

 

साहित्य

चणा डाळीचे पीठ (बेसन)

२५ ग्राम

गव्हाचे पीठ

२५ ग्राम

साखर

२० ग्राम

वनस्पती

५ ग्राम

बेकिंग पावडर

एक चिमूट भर

मीठ

एक चिमूट भर

चवळीचे बिस्किट

 

साहित्य

चवळीचे पीठ (तूस काढलेले)

२५ ग्राम

मैदा

२५ ग्राम

साखर

२० ग्राम

वनस्पती

५ ग्राम

बेकिंग पावडर

एक चिमूट भर

मीठ

एक चिमूट भर

कुळीथाचे बिस्किट

 

साहित्य

कुळीथाचे पीठ (तूस काढलेले)

२५ ग्राम

मैदा

२५ ग्राम

साखर

२० ग्राम

वनस्पती

५ ग्राम

बेकिंग पावडर

एक चिमूट भर

मीठ

एक चिमूट भर

स्त्रोत : परिशिष्ट: नॅशनल इन्स्टिटूट ऑफ न्यूट्रिशन
इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च
हैदराबाद – ५००००७

अंतिम सुधारित : 7/28/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate