অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

लहान मुलांसाठी सर्वोत्तम आहार

पहिले सहा महिने बाळाला आईच्या दुधाशिवाय दुसरे काहीही देऊ नये. आईचे दुध हे बाळासाठी सर्वात शुद्ध, उत्तम व अमुल्य अन्न होय.

आईला भरपूर दुध येत नसल्यास काय करावे

  • पहिले अन्न व पाणी घेऊन तिने बाळाला आपले स्तन चोखावयास देणे. असे केल्यास कित्येक वेळा दुध पुन्हा चालू होते.
  • तेवढे करून दुध पूर्ण बंद झाले असेल, तर बाळाला बाहेरचे दुध चालु ठेवावे. यात गाय किंवा बकरीचे दुध सर्वात उत्तम.
  • बाटलीने दुध पाजणे हे बाळाच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे. बरेच वेळा अस्वच्छते मुळे उलटया, जुलाब होऊन बाळाच्या शरीरातील पाणी कमी होते. त्यामुळे बाळाचा मृत्यू देखील होवू शकतो.
  • बाळासाठी दुध विकत घेणे परवडत नसेल तर तांदूळ, नाचणी, मका, पोहे इ. मध्ये वेगवेगळ्या डाळी व तूप घालून शिजवून भरडीसारखी करून पाजावे.
  • बाळाला नुसती भाताची पेज देवून उपयोग नाही तर त्याबरोबर दाल व इतर कडधान्यासारखा जास्त प्रथिनयुक्त आहार दयावा. नुसत्या भातावर वाढलेली मुले अशक्त राहण्याचा संभव असतो.

विशेष सूचना

लहान मुलांच्या आहाराच्या बाबतीत ६ महिने ते १ वर्षाचा काळ अतिशय महत्त्वाचा असतो. याचे कारण म्हणजे कोणतेही पूर्व चिन्हे ण दिसत अगदी साध्या सुध्या सर्दीसारख्या आजाराच्या निमित्ताने सुद्धा कुपोषण होते.

 

स्त्रोत : पोषण आणि आहार : माहिती व शिक्षण मार्गदर्शक पुस्तिका, वॉटरशेड ऑगनायझेशन ट्रस्ट

अंतिम सुधारित : 8/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate