অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सूचना आणि दळणवळण तांत्रिकी

सूचना आणि दळणवळण तांत्रिकी

सूचना आणि दळणवळण तांत्रिकी (ICT @ Schools) "शाळांमध्ये सूचना आणि दळणवळण तांत्रिकी [आयसीटी]’’ ही केन्द्र प्रायोजित योजना डिसेंबर २००४ मध्ये माध्यमिक पातळीच्या विद्यार्थ्यांसाठी आयसीटी कौशल्य आणि आयसीटी सहाय्य प्राप्त प्रक्रिया शिकण्याच्या संधींचा विकास करण्यासाठी सुरू करण्यात आली. ही योजना विद्यार्थ्यांमधील विभिन्न सामाजिक-आर्थिक आणि अन्य भौगोलिक प्रतिबंधात्मक विभाजनाला सांधणारे एक महत्वपूर्ण उत्प्रेरक आहे.

ह्या योजनेच्या अंतर्गत राज्यांना/संघ राज्य क्षेत्रांना संगणक प्रयोगशाळांच्या स्थापनेकरीता एक स्थायी आधारावर सहाय्य प्रदान करण्यात येते. केन्द्रीय विद्यालये आणि नवोदय विद्यालयांमध्ये तांत्रिकी प्रदर्शनकर्ता (टेक्नोलॉजी डेमॉन्स्ट्रेटर्स) ची भूमिका पार पाडण्यासाठी आणि शेजारच्या शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये आयसीटी कौशल्याच्या प्रचारात नेतृत्व करण्यासाठी ‘स्मार्ट’ स्कूल्सची स्थापना करण्याचे ह्या योजनेचे उद्दिष्ठ आहे. सध्या ही योजना सरकारी आणि सरकारी सहाय्य प्राप्त माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये कार्यान्वित करण्यात येत आहे. संगणक आणि इतर सामग्री, शैक्षणिक सॉफ्टवेयर, शिक्षकांचे प्रशिक्षण आणि इंटरनेट कनेक्टिविटी इत्यादिच्या खरेदीकरीता सहाय्य उपलब्ध करविण्यात येते.

शालेय शिक्षण व साक्षरता विभागाच्या सचिवांच्या नेतृत्वाखाली (सेक्रेटरी ऑफ द डिपार्टमेंट ऑफ स्कूल एज्युकेशन एण्ड लिट्रसी) प्रकल्प निरीक्षण व मूल्यांकन गट (पीएम एण्ड ईजी) द्वारे अनुमोदित करण्यात आलेल्या राज्यांना आणि इतर संस्थांना आर्थिक मदत करण्यात येते. परिचय सूचना आणि दळणवळण तांत्रिकीला(आयसीटी) सामाजिक परिवर्तन आणि राष्ट्रीय प्रगतीच्या एका महत्वपूर्ण सार्वभौमिक उत्प्रेरकाच्या स्वरूपात स्वीकारण्यात आले आहे. तथापि, आयसीटी तत्परता आणि उपयोग यांचे भाषांतर उत्पादकतांच्या पातळीतील असमानतांमध्ये होऊ शकते आणि म्हणूनच देशाच्या आर्थिक विकास दरास प्रभावित करू शकते. देशांच्या सामाजिक आणि आर्थिक प्रगतीसाठी आयसीटीला समजून घेणे आणि त्याचे महत्व जाणून घेण्याचे प्रयास करणे अत्यंत महत्वपूर्ण आहे.

भारतामध्ये आयसीटी उपयोगात प्रचंड भौगोलिक आणि लोकसांख्यिक असमानता दिसून येतात. भारतात विश्वातील सर्वांत मोठे आयसीटी बल आहे. बंगलोर आणि गुड़गांव यांसारख्या जागी उच्च मध्यम वर्गांमध्ये तांत्रिकी गटांत गहन आयसीटी उपयोग आढळतो. या गोष्टीचा दूसरा पक्ष असा आहे की देशभरांतील पुष्कळशा भागांत अजून टेलीफोन कनेक्टिव्हिटीसुध्दा नाही. या सूचना तांत्रिकी आणि सॉफ्टवेयर विकासाकरीता राष्ट्रीय कार्यबल (आयटी टास्क फोर्स)पंतप्रधानांद्वारे जुलै १९९८ मध्ये गठन करण्यात आलेल्या सूचना तांत्रिकी आणि सॉफ्टवेयर विकासाकरीता राष्ट्रीय कार्यबल (आयटी टास्क फोर्स) – मध्ये शाळांसहित शिक्षण क्षेत्रांमध्ये आयटीच्या परिचयावर विशिष्ट शिफारशी करण्यात आल्या आहेत. संबंधित अनुच्छेद खाली पुनरूत्पादित करण्यात आले आहेत: आकर्षक आर्थिक पॅकेजच्या अंतर्गत संगणक खरेदी करण्याची इच्छा असणारे अनुक्रमे विद्यार्थी, शिक्षक किंवा शाळा यांना सक्षम करण्यासाठी विद्यार्थी संगणक (संगणक) योजना, शिक्षक संगणक (संगणक) योजना आणि स्कूल संगणक योजना आहेत.

ह्या योजनांना पुढाकारांचा एक समुह पाठिंबा देईल ज्यामध्ये संगणकाची किंमत कमी करणे, बँकेकडून हप्त्यांवर कर्ज, आयटी कंपन्या आणि इतर व्यवसाय गृहांच्या द्वारे संगणक दान, एनआरआय संगठनांच्याद्वारे मोठ्या संख्येत संगणक दान, विशाल प्रमाणात व्यवहार मूल्य आयात, मल्टी लेटरल फंडिंग, इत्यादिंचा समावेश आहे. संगणक आणि इंटरनेट शाळा, पॉलिटेक्निक महाविद्यालये आणि देशातील सार्वजनिक इस्पितळांमध्ये वर्ष २००३ पर्यंत सहज सुलभ करण्यात येईल. स्मार्ट स्कूलची संकल्पना, जेथे फक्त सूचना तांत्रिकीवरच भर देण्यात येत नाही, तर आगामी सहस्राब्दधींमध्ये अत्यंत महत्वपूर्ण ठरतील अशी कौशल्ये आणि मूल्यांचे चाचणी स्वरूपातील प्रदर्शनसुध्दा प्रत्येक राज्यांत सुरू करण्यात येईल.

ह्याची उद्दिष्ठ्ये खालीलप्रमाणे आहेत: उद्दिष्ठ्ये ग्रामीण क्षेत्रांमध्ये विशेषत: उच्च माध्यमिक आणि सेकेंडरी सरकारी शाळांमध्ये आयसीटीच्या उपयोगितेस प्रोत्साहन देण्यासाठी एका सक्षम पर्यावरणाची स्थापना करणे. अशा प्रकारच्या सक्षम पर्यावरणाच्या महत्वपूर्ण घटकांमध्ये उपकरणांपर्यंत व्यापक पोच, इंटरनेटची कनेक्टिव्हिटी आणि आयसीटी साक्षरतेस प्रोत्साहन देणे. खाजगी क्षेत्रे आणि एसआयईटीज् द्वारे सामग्री गुणवत्तेची उपलब्धता ऑनलाइन आणि उपकरणांच्या माध्यमाने सुनिश्चित करणे. सद्य अभ्यासक्रमाचे शिक्षण शैलीचे संवर्धन करण्यासाठी आयसीटी साधनांचा वापर.

विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण आणि लाभकारी रोजगारासाठी डिजिटल विश्वाकरीता आवश्यक कौशल्ये मिळविण्यात सक्षम करण्यासाठी. आयसीटी साधनांच्या माध्यमाने विशेष आवश्यकता असलेल्या मुलांना शिक्षणाचे प्रभावी पर्यावरण पुरविणे स्वयं-शिक्षणाचा विकास करून महत्वपूर्ण विचारसरणी आणि विश्लेषणात्मक कौशल्यास प्रोत्साहन देणे. ह्यामुळे वर्गाच्या पर्यावरणाचे परिवर्तन शिक्षक-केन्द्रित शिक्षणापासून विद्यार्थी-केंद्रित शिक्षणात होईल. श्रव्य-दृश्य माध्यम आणि उपग्रह आधारित उपकरणांच्या रोजगारासह दूरस्थ शिक्षणात आयसीटी साधनांच्या उपयोगास प्रोत्साहन देण्यासाठी.

स्त्रोत : पोर्टल कंटेंट टीम

अंतिम सुधारित : 2/27/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate