অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

उच्च प्राथमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा

उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५वी स्तर) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी स्तर) करीता अटी व शातीं निश्चित करणेबाबत....

महाराष्ट्र शासन

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शासन निर्णय क्रमांक :- एफईडी-४०१४/६४३/प्र.क्र.४/एसडी-५

मंत्रालय विस्तार भवन, मुंबई.

दिनांक :-१५ नोव्हेंबर, २०१६

१) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक एससीएच-२००९/(९०/०९)/ केंपुयो, दिनांक २२.०७.२०१०.

२) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक एफईडी-४०१४/६४३/प्र.क्र.४/एसडी ५, दिनांक २९.०६.२०१५, १०.११.२०१५ व शासन शुद्धीपत्रक समक्रमांक दिनांक ०२/०७/२०१५ व दिनांक १५/०२/२०१६.

३) आयुक्त,महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,पुणे यांचे पत्र क्र.मरापप/शिष्यवृत्ती/२०१६/३५१४, दिनांक १६/०५/२०१६ व क्र.मरापप/शिष्यवृत्ती/२०१६/६२३१, दि.३०/९/२०१६ ४) शिक्षण संचालक यांचे पत्र क्र.शिष्य/१५-१६/इ. १० व १२ वी/शु.माफी/२२१ , दिनांक १७/३/२०१६ व क्र.शिष्यवृत्ती-२२५/२०१६-१७/४८४१, दि.२४/८/२०१६

प्रस्‍तावना

प्राथमिक व माध्यमिक शाळांतील गुणवान विद्यार्थ्‍यांना प्रोत्साहन देण्यासाठी खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती देण्याची योजना सन १९५४-५५ पासून कार्यान्वित आहे. सदर शिष्यवृत्ती योजनेत केंद्र शासनाच्या बालकांचा मोफत सक्तीच्या शिक्षण अधिकार या कायद्यामधील तरतूदी लक्षात घेवून संदर्भाधीन अनुक्रमांक २ मधील दिनांक २९/०६/२०१५ च्या शासन निर्णयान्वये राज्यात कार्यान्वित असलेल्या शिष्यवृत्तीचा स्तर इयत्ता ४ थी ऐवजी इयत्ता ५ वी व इयत्ता ७ वी ऐवजी इयत्ता ८ वी असा करण्यात आला आहे.

त्यानुसार या शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन सन २०१६-१७ पासून इयत्ता ५ वी व ८ वी मध्ये नियमितपणे करण्यात येणार आहे. सदर परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,पुणे यांच्यामार्फत घेण्याकरिता संदर्भ क्रमांक १ मधील दिनांक २२/०७/२०१० च्या शासन निर्णयात नमूद केलेल्या अटी व शतींत सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी स्तर) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी स्तर) करीता अटी व शातीं पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात येत आहेत :-

१) शासनमान्य (शासकीय/अनुदानित/विनाअनुदानित/कायम विनाआनुदानित/

स्वयंअर्थसहाय्यित) शाळांमधील विद्यार्थी सदर शिष्यवृत्ती परीक्षा देण्यास पात्र राहतील.

२) आय.सी.एस.ई. व सी.बी.एस.ई.अभ्यासक्रम राबविणा-या शाळांमधील विद्यार्थ्‍यांना सदर शिष्यवृत्ती परीक्षेस प्रविष्ठ होण्यासाठी शासन खालील अटींच्या अधीन राहून मान्यता देत आहे:-

अ) सदर परीक्षेला बसणा-या विद्यार्थ्‍यां साठी या शासन निर्णयान्वये सुधारित केल्यानुसार वयाची अट राहील.

ब) सदर विद्यार्थ्‍यांकडून शिष्यवृत्ती परीक्षेस या शासन निर्णयान्वये सुधारित विहीत शुल्क आकारण्यात येईल.

क)  सदर विद्यार्थ्‍यांची स्‍वतंत्र गुणवत्ता यादी तयार केली जाईल.

ड) सदर विद्यार्थी गुणवत्ता यादीत आल्यास पहिल्या ५० विद्यार्थ्‍यांना प्रमाणपत्र दिले जाईल व गुणानुक्रम कळविण्यात येईल. मात्र त्यांना शिष्यवृत्तीची रोख रक्कम दिली जाणार नाही.

इ) उर्वरित सर्व विद्यार्थ्यांना गुणपत्रके देण्यात येतील.

३) शिष्यवृत्ती परीक्षेसाठी पात्रता:-

१) विदयार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा म्हणजेच पालकांचे महाराष्ट्रात किमान १५ वर्षे वास्तव्य असावे.

२) विदयार्थी शासनमान्य शासकीय/अनुदानित/विनाअनुदानित/कायम विनाअनुदानित/ स्वयंअर्थसहाय्यित शाळेत इयत्ता ५ वी किंवा इयत्ता ८ वीत शिकत असावा.

४) शिष्यवृत्ती परीक्षेसाठी वयोमर्यादा:-

विदयार्थ्‍यांचे वय १ जून रोजी खाली दर्शविलेल्या तक्त्यातील वयापेक्षा जास्त नसावे.

प्रवर्ग दि.१ जून रोजी कमाल वयोमर्यादा

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा  (इयता ५ वी) पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा  (इयता ८ वी)

सर्व प्रवर्ग ११ वर्षे १४ वर्षे

दिव्यांग १५ वर्षे १८ वर्षे

५) सदर शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थी उत्तीर्ण किंवा अनुत्‍तीर्ण घोषित करण्यात येणार नसून शिष्यवृत्तीस पात्र किंवा अपात्र असे घोषित करण्यात येईल. शिष्यवृत्तीस पात्रतेसाठी प्रत्येक पेपरमध्ये किमान ४० % गुण प्राप्त करणे आवश्यक राहील. प्रत्येक पेपरमध्ये ४० % पेक्षा कमी गुण प्राप्त करणारे

६) सदर शिष्यवृत्ती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांनी दरवर्षी घेतल्या गेलेल्या परिक्षेच्या आधारे दिली जाईल.

७) परीक्षेची तारीख व वार

क) शिष्यवृत्ती परीक्षा दरवर्षी महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषद जाहीर करेल त्यानुसार साधारणतः फेब्रुवारी महिन्याच्या दुस-या/तिस-या रविवारी घेण्यात येईल.

ख) शिष्यवृत्ती परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने निश्चित केलेल्या केंद्रावर घेतली जाइल.

अर्ज

सदर परीक्षेसाठीचे अर्जा हे विद्यार्थी शिकत असलेल्या शासन मान्यताप्राप्त शाळेच्या मुख्याध्यापकांमार्फत ऑनलाईन पद्धतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने ठरविलेल्या वेळापत्रकानुसार सादर करावेत (Website: http://www.mscepune.in)

9) परीक्षा शुल्कः

बिगरमागासवर्गीय विद्यार्थ्‍यांसाठी

प्रवेश शुल्क रु.२०/-

परीक्षा शुल्क रु.६०/-

एकूण 80/-

अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती,भटक्या जाती-विमुक्त जमातीच्या मागासवर्गीय विद्यार्थ्‍यांसाठी

प्रवेश शुल्क रु.२०/- परीक्षा शुल्क रु.००/- एकूण र5.२O/- याशिवाय प्रत्येक सहभागी शाळेला प्रतिवर्षी रु.२००/- नोंदणी शुल्क परीक्षा परिषदेकडे जमा करावे लागेल. १०) परीक्षेचे माध्यम:-

मराठी/हिंदी/गुजराती/उर्दू/इंग्रजी/सिंधी/तेलगू/कन्नड असे असेल. इयत्ता ५वी व इयत्ता ८ वी च्या सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्‍यांकरिता गणित व बुद्धमत्ता चाचणी या विषयांचा इंग्रजी माध्यमाकरिता जो पेपर असेल तोच पेपर उपलब्ध करुन दिला येईल.

परीक्षेचा अभ्यासक्रम व परीक्षेचे स्वरुप

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांनी तयार केलेल्या इ.१ ली ते इ.५वी च्या अभ्यासक्रमावर आधारित पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी स्तर) व इ.१ ली ते इ.८ वी च्या अभ्यासक्रमावर आधारित पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी स्तर) घेण्यात येईल.

पूर्वीप्रमाणेच सर्व प्रश्न वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी असतील.

प्रश्नांची काठिण्य पातळी :-

१) कठीण प्रश्न ३०%

२) मध्यम स्वरुपाचे प्रश्न ४०%

3) सोपे प्रश्‍न 2০%

प्रश्नपत्रिकेचे स्वरुप :-

प्रत्येक पेपरसाठी बहुसंच (A.B.C.D.) प्रश्नसंच देण्यात येतील.

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी स्तर) साठी उत्तरांच्या ४ पर्यायांपैकी एकच पर्याय अचूक असेल, परंतु पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी स्तर) साठीच्या प्रत्येक पेपरमध्ये कमाल २०% प्रश्नांच्या बाबतीत उत्तरांच्या ४ पर्यायांपैकी दोन पर्याय अचूक असतील. ते दोन्ही पर्याय नोंदविणे बंधनकारक असेल.

१२) पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती

परीक्षा (इयत्ता ८ वी) पुढीलप्रमाणे असेल:-

पेपर विषय प्रश्न संख्‍या गुण वेळ

1 प्रथम भाषा 25 50 १ तास

३० मिनिटे

गणित 50 100

एकूण 75 150

2 तृतीय भाषा 25 50 १ तास

३० मिनिटे

बुध्दिमत्ता चाचणी 50 100

एकूण 75 150

१३) शिष्यवृत्ती प्रदानाच्या अटी:-

१) शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्‍याने लगेचच्या वर्षी मान्यता प्राप्त उच्च प्राथमिक (इयत्ता ६ वी) / माध्यमिक (इयत्ता ९ वी) शाळेत प्रवेश घेतला पाहिजे. जे शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी शाळेत प्रवेश घेणार नाहीत अशा विद्यार्थ्‍यांची शिष्यवृत्ती रदद करण्‍यात येईल.

२) पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी)पास झाल्यानंतरच्या वर्षांपासून ३ वर्ष व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी)पास झाल्यानंतरच्या वर्षांपासून २ वर्ष शिष्यवृत्ती चालू राहील. त्यासाठी शिष्यवृत्तीधारकाला नियमित उपस्थिती, चांगले वर्तन व समाधानकारक प्रगती या अटींची पूर्तता करावी लागेल.यापैकी एकाही अटीची पूर्तता होत नसल्यास पात्र विद्यार्थ्‍यांस शिष्यवृत्ती मिळणार नाही.

३) विद्यार्थ्‍यां ने शाळा बदल केल्यास, विद्यार्थ्‍यां ने/पालकाने शिष्यवृत्तीसाठी नवीन

मुख्याध्यापकांमार्फत संबधित जिल्हयाच्या शिक्षणाधिकारी(माध्यमिक)/ शिक्षण निरीक्षक मुंबई (प/द/उ) यांच्याकडे प्रस्ताव सादर करावा.

४) शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), पुणे यांच्या परवानगी शिवाय कोणीही

शिष्यवृत्तीचे वितरण

शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्‍यांच्‍या  बँक खात्यात जमा करण्यात येत असल्याने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने शिष्यवृत्ती परीक्षेस बसणा-या विद्यार्थ्‍यांच्‍या  अर्जासोबत त्यांच्या बँक खात्याची माहिती (बँकेचे नाव, खाते क्रमांक व |FSC कोड इ.) व आधार क्रमांकाची माहिती घ्यावी. सदर माहितीसह विद्यार्थ्‍यां च्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल शिक्षण संचालक, (माध्यमिक व उच्च माध्यमिक) पुणे यांना पाठवावा. शासनाकडून अनुदान उपलब्धतेनुसार शिष्यवृत्तीचे वितरण करण्याची जबाबदारी शिक्षण संचालक, (माध्यमिक व उच्च माध्यमिक) पुणे यांचेवर राहील.

गुणवत्ताधारक विदयार्थ्‍यांचा गौरव

पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये स्पृहणीय यश संपादन करुन राज्यस्तरीय गुणवत्ता यादीमध्ये स्थान मिळविणा-या विद्यार्थ्‍यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी त्यांचा सत्कार समारंभ संबंधित जिल्हयाच्या मा.पालकमंत्री महोदय यांचे हस्ते दरवर्षी विद्यार्थ्‍यां ची संख्या विचारात घेऊन दि.१५ ऑगस्ट रोजी ध्वजारोहणानंतर अथवा त्याच दिवशी स्वतंत्रपणे कार्यक्रम आयोजित करुन करण्यात यावा. आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांनी प्रत्येक वर्षी या परिक्षांच्या राज्यस्तरीय गुणवत्ता यादीमधील विद्यार्थ्‍यांना देण्यासाठी गुणवत्ता प्रमाणपत्र तयार करुन ती संबंधित जिल्हयांच्या शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांचेकडे विहीत कालावधीत उपलब्ध करुन द्यावीत. सदर सत्कार समारंभाची सर्व व्यवस्था शिक्षणाधिकारी, प्राथमिक यांनी करावी.

१६) "ग्रामीण" या शिष्यवृत्ती प्रकाराबाबत विश्लेषण:-

पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी राज्यातील ग्रामपंचायतीच्या

नियंत्रणाखाली सर्व गावे/वस्ती (लोकसंख्या विचारात न घेता) तसेच नगरपरिषद, नगरपालिका व

महानगरपालिका परिक्षेत्रात ग्रामपंचायत क्षेत्र अस्तित्वात असल्यास सर्व गावांमधील शाळांमध्ये शिकणा-या ‍ विद्यार्थ्‍यांची गणना ग्रामीण भागात करण्‍यात यावी.

तसेच शासन निर्णय दि. 2 एप्रिल 1954 अन्‍वये 3rd No Scholar can hold, at the same time, any other Government Scholarship or a Scholarship from an endowment fund Vested in

GOVernment Without the permission of the director of education  असे नमुद करण्‍यात आले आहे.  या शासन निर्णयान्वये सदरची अट कायम ठेवण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेताक २०१६१११६१६२४१४४७२१ असा आहे. हा आदेश

डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

Neha Nandkumar  Humraskar

School Education And Sports. Department,

(नेहा नंहुमरसकर)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा

उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५वी स्तर) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी स्तर) करीता अटी व शातीं निश्चित करणेबाबत....महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक :- एफईडी-४०१४/६४३/प्र.क्र.४/एसडी-५ मंत्रालय विस्तार भवन, मुंबई. दिनांक :-१५ नोव्हेंबर, २०१६ 
वाचा :- १) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक एससीएच-२००९/(९०/०९)/ केंपुयो, दिनांक २२.०७.२०१०. २) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक एफईडी-४०१४/६४३/प्र.क्र.४/एसडी ५, दिनांक २९.०६.२०१५, १०.११.२०१५ व शासन शुद्धीपत्रक समक्रमांक दिनांक ०२/०७/२०१५ व दिनांक १५/०२/२०१६. ३) आयुक्त,महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,पुणे यांचे पत्र क्र.मरापप/शिष्यवृत्ती/२०१६/३५१४, दिनांक १६/०५/२०१६ व क्र.मरापप/शिष्यवृत्ती/२०१६/६२३१, दि.३०/९/२०१६ ४) शिक्षण संचालक यांचे पत्र क्र.शिष्य/१५-१६/इ. १० व १२ वी/शु.माफी/२२१ , दिनांक १७/३/२०१६ व क्र.शिष्यवृत्ती-२२५/२०१६-१७/४८४१, दि.२४/८/२०१६
प्रस्‍तावना :-प्राथमिक व माध्यमिक शाळांतील गुणवान विद्यार्थ्‍यांना प्रोत्साहन देण्यासाठी खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती देण्याची योजना सन १९५४-५५ पासून कार्यान्वित आहे. सदर शिष्यवृत्ती योजनेत केंद्र शासनाच्या बालकांचा मोफत सक्तीच्या शिक्षण अधिकार या कायद्यामधील तरतूदी लक्षात घेवून संदर्भाधीन अनुक्रमांक २ मधील दिनांक २९/०६/२०१५ च्या शासन निर्णयान्वये राज्यात कार्यान्वित असलेल्या शिष्यवृत्तीचा स्तर इयत्ता ४ थी ऐवजी इयत्ता ५ वी व इयत्ता ७ वी ऐवजी इयत्ता ८ वी असा करण्यात आला आहे.त्यानुसार या शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन सन २०१६-१७ पासून इयत्ता ५ वी व ८ वी मध्ये नियमितपणे करण्यात येणार आहे. सदर परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,पुणे यांच्यामार्फत घेण्याकरिता संदर्भ क्रमांक १ मधील दिनांक २२/०७/२०१० च्या शासन निर्णयात नमूद केलेल्या अटी व शतींत सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णयः :-पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी स्तर) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी स्तर) करीता अटी व शातीं पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात येत आहेत :-१) शासनमान्य (शासकीय/अनुदानित/विनाअनुदानित/कायम विनाआनुदानित/स्वयंअर्थसहाय्यित) शाळांमधील विद्यार्थी सदर शिष्यवृत्ती परीक्षा देण्यास पात्र राहतील.२) आय.सी.एस.ई. व सी.बी.एस.ई.अभ्यासक्रम राबविणा-या शाळांमधील विद्यार्थ्‍यांना सदर शिष्यवृत्ती परीक्षेस प्रविष्ठ होण्यासाठी शासन खालील अटींच्या अधीन राहून मान्यता देत आहे:-अ) सदर परीक्षेला बसणा-या विद्यार्थ्‍यां साठी या शासन निर्णयान्वये सुधारित केल्यानुसार वयाची अट राहील.ब) सदर विद्यार्थ्‍यांकडून शिष्यवृत्ती परीक्षेस या शासन निर्णयान्वये सुधारित विहीत शुल्क आकारण्यात येईल.क)  सदर विद्यार्थ्‍यांची स्‍वतंत्र गुणवत्ता यादी तयार केली जाईल. ड) सदर विद्यार्थी गुणवत्ता यादीत आल्यास पहिल्या ५० विद्यार्थ्‍यांना प्रमाणपत्र दिले जाईल व गुणानुक्रम कळविण्यात येईल. मात्र त्यांना शिष्यवृत्तीची रोख रक्कम दिली जाणार नाही.इ) उर्वरित सर्व विद्यार्थ्यांना गुणपत्रके देण्यात येतील.
३) शिष्यवृत्ती परीक्षेसाठी पात्रता:-
१) विदयार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा म्हणजेच पालकांचे महाराष्ट्रात किमान १५ वर्षे वास्तव्य असावे.२) विदयार्थी शासनमान्य शासकीय/अनुदानित/विनाअनुदानित/कायम विनाअनुदानित/ स्वयंअर्थसहाय्यित शाळेत इयत्ता ५ वी किंवा इयत्ता ८ वीत शिकत असावा.

४) शिष्यवृत्ती परीक्षेसाठी वयोमर्यादा:- 
विदयार्थ्‍यांचे वय १ जून रोजी खाली दर्शविलेल्या तक्त्यातील वयापेक्षा जास्त नसावे.
प्रवर्ग दि.१ जून रोजी कमाल वयोमर्यादा पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा  (इयता ५ वी) पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा  (इयता ८ वी)सर्व प्रवर्ग ११ वर्षे १४ वर्षेदिव्यांग १५ वर्षे १८ वर्षे
५) सदर शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थी उत्तीर्ण किंवा अनुत्‍तीर्ण घोषित करण्यात येणार नसून शिष्यवृत्तीस पात्र किंवा अपात्र असे घोषित करण्यात येईल. शिष्यवृत्तीस पात्रतेसाठी प्रत्येक पेपरमध्ये किमान ४० % गुण प्राप्त करणे आवश्यक राहील. प्रत्येक पेपरमध्ये ४० % पेक्षा कमी गुण प्राप्त करणारे६) सदर शिष्यवृत्ती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांनी दरवर्षी घेतल्या गेलेल्या परिक्षेच्या आधारे दिली जाईल.७) परीक्षेची तारीख व वार क) शिष्यवृत्ती परीक्षा दरवर्षी महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषद जाहीर करेल त्यानुसार साधारणतः फेब्रुवारी महिन्याच्या दुस-या/तिस-या रविवारी घेण्यात येईल. ख) शिष्यवृत्ती परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने निश्चित केलेल्या केंद्रावर घेतली जाइल.

अर्ज:-सदर परीक्षेसाठीचे अर्जा हे विद्यार्थी शिकत असलेल्या शासन मान्यताप्राप्त शाळेच्या मुख्याध्यापकांमार्फत ऑनलाईन पद्धतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने ठरविलेल्या वेळापत्रकानुसार सादर करावेत (Website: http://www.mscepune.in) 9) परीक्षा शुल्कःबिगरमागासवर्गीय विद्यार्थ्‍यांसाठी प्रवेश शुल्क रु.२०/- परीक्षा शुल्क रु.६०/- एकूण 80/- अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती,भटक्या जाती-विमुक्त जमातीच्या मागासवर्गीय विद्यार्थ्‍यांसाठी  प्रवेश शुल्क रु.२०/- परीक्षा शुल्क रु.००/- एकूण र5.२O/- याशिवाय प्रत्येक सहभागी शाळेला प्रतिवर्षी रु.२००/- नोंदणी शुल्क परीक्षा परिषदेकडे जमा करावे लागेल. १०) परीक्षेचे माध्यम:-मराठी/हिंदी/गुजराती/उर्दू/इंग्रजी/सिंधी/तेलगू/कन्नड असे असेल. इयत्ता ५वी व इयत्ता ८ वी च्या सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्‍यांकरिता गणित व बुद्धमत्ता चाचणी या विषयांचा इंग्रजी माध्यमाकरिता जो पेपर असेल तोच पेपर उपलब्ध करुन दिला येईल.११) परीक्षेचा अभ्यासक्रम व परीक्षेचे स्वरुप :- महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांनी तयार केलेल्या इ.१ ली ते इ.५वी च्या अभ्यासक्रमावर आधारित पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी स्तर) व इ.१ ली ते इ.८ वी च्या अभ्यासक्रमावर आधारित पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी स्तर) घेण्यात येईल.
पूर्वीप्रमाणेच सर्व प्रश्न वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी असतील. प्रश्नांची काठिण्य पातळी :- १) कठीण प्रश्न ३०% २) मध्यम स्वरुपाचे प्रश्न ४०% 3) सोपे प्रश्‍न 2০% प्रश्नपत्रिकेचे स्वरुप :- प्रत्येक पेपरसाठी बहुसंच (A.B.C.D.) प्रश्नसंच देण्यात येतील. पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी स्तर) साठी उत्तरांच्या ४ पर्यायांपैकी एकच पर्याय अचूक असेल, परंतु पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी स्तर) साठीच्या प्रत्येक पेपरमध्ये कमाल २०% प्रश्नांच्या बाबतीत उत्तरांच्या ४ पर्यायांपैकी दोन पर्याय अचूक असतील. ते दोन्ही पर्याय नोंदविणे बंधनकारक असेल.
१२) पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्तीपरीक्षा (इयत्ता ८ वी) पुढीलप्रमाणे असेल:- पेपर विषय प्रश्न संख्‍या गुण वेळ1 प्रथम भाषा 25 50 १ तास ३० मिनिटे गणित 50 100 एकूण 75 150 2 तृतीय भाषा 25 50 १ तास ३० मिनिटे बुध्दिमत्ता चाचणी 50 100 एकूण 75 150

१३) शिष्यवृत्ती प्रदानाच्या अटी:-१) शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्‍याने लगेचच्या वर्षी मान्यता प्राप्त उच्च प्राथमिक (इयत्ता ६ वी) / माध्यमिक (इयत्ता ९ वी) शाळेत प्रवेश घेतला पाहिजे. जे शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी शाळेत प्रवेश घेणार नाहीत अशा विद्यार्थ्‍यांची शिष्यवृत्ती रदद करण्‍यात येईल.  २) पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी)पास झाल्यानंतरच्या वर्षांपासून ३ वर्ष व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी)पास झाल्यानंतरच्या वर्षांपासून २ वर्ष शिष्यवृत्ती चालू राहील. त्यासाठी शिष्यवृत्तीधारकाला नियमित उपस्थिती, चांगले वर्तन व समाधानकारक प्रगती या अटींची पूर्तता करावी लागेल.यापैकी एकाही अटीची पूर्तता होत नसल्यास पात्र विद्यार्थ्‍यांस शिष्यवृत्ती मिळणार नाही.३) विद्यार्थ्‍यां ने शाळा बदल केल्यास, विद्यार्थ्‍यां ने/पालकाने शिष्यवृत्तीसाठी नवीनमुख्याध्यापकांमार्फत संबधित जिल्हयाच्या शिक्षणाधिकारी(माध्यमिक)/ शिक्षण निरीक्षक मुंबई (प/द/उ) यांच्याकडे प्रस्ताव सादर करावा.४) शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), पुणे यांच्या परवानगी शिवाय कोणीही१४) शिष्यवृत्तीचे वितरण :-शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्‍यांच्‍या  बँक खात्यात जमा करण्यात येत असल्याने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने शिष्यवृत्ती परीक्षेस बसणा-या विद्यार्थ्‍यांच्‍या  अर्जासोबत त्यांच्या बँक खात्याची माहिती (बँकेचे नाव, खाते क्रमांक व |FSC कोड इ.) व आधार क्रमांकाची माहिती घ्यावी. सदर माहितीसह विद्यार्थ्‍यां च्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल शिक्षण संचालक, (माध्यमिक व उच्च माध्यमिक) पुणे यांना पाठवावा. शासनाकडून अनुदान उपलब्धतेनुसार शिष्यवृत्तीचे वितरण करण्याची जबाबदारी शिक्षण संचालक, (माध्यमिक व उच्च माध्यमिक) पुणे यांचेवर राहील.
१५) गुणवत्ताधारक विदयार्थ्‍यांचा गौरव:- 
पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये स्पृहणीय यश संपादन करुन राज्यस्तरीय गुणवत्ता यादीमध्ये स्थान मिळविणा-या विद्यार्थ्‍यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी त्यांचा सत्कार समारंभ संबंधित जिल्हयाच्या मा.पालकमंत्री महोदय यांचे हस्ते दरवर्षी विद्यार्थ्‍यां ची संख्या विचारात घेऊन दि.१५ ऑगस्ट रोजी ध्वजारोहणानंतर अथवा त्याच दिवशी स्वतंत्रपणे कार्यक्रम आयोजित करुन करण्यात यावा. आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांनी प्रत्येक वर्षी या परिक्षांच्या राज्यस्तरीय गुणवत्ता यादीमधील विद्यार्थ्‍यांना देण्यासाठी गुणवत्ता प्रमाणपत्र तयार करुन ती संबंधित जिल्हयांच्या शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांचेकडे विहीत कालावधीत उपलब्ध करुन द्यावीत. सदर सत्कार समारंभाची सर्व व्यवस्था शिक्षणाधिकारी, प्राथमिक यांनी करावी.१६) "ग्रामीण" या शिष्यवृत्ती प्रकाराबाबत विश्लेषण:- 
पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी राज्यातील ग्रामपंचायतीच्यानियंत्रणाखाली सर्व गावे/वस्ती (लोकसंख्या विचारात न घेता) तसेच नगरपरिषद, नगरपालिका वमहानगरपालिका परिक्षेत्रात ग्रामपंचायत क्षेत्र अस्तित्वात असल्यास सर्व गावांमधील शाळांमध्ये शिकणा-या ‍ विद्यार्थ्‍यांची गणना ग्रामीण भागात करण्‍यात यावी.  
तसेच शासन निर्णय दि. 2 एप्रिल 1954 अन्‍वये 3rd No Scholar can hold, at the same time, any other Government Scholarship or a Scholarship from an endowment fund Vested inGOVernment Without the permission of the director of education  असे नमुद करण्‍यात आले आहे.  या शासन निर्णयान्वये सदरची अट कायम ठेवण्यात येत आहे.
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेताक २०१६१११६१६२४१४४७२१ असा आहे. हा आदेशडिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
Neha Nandkumar  Humraskar School Education And Sports. Department,(नेहा नंहुमरसकर)कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

अंतिम सुधारित : 8/9/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate