महाराष्ट्र राज्य शासनामार्फत वेगवेगळ्या विभागामार्फत वेगवेगळ्या योजना, उपक्रम राबविले जातात. या योजनेचा फायदा विद्यार्थी, महिला याबरोबरच सर्वसामान्य जनता यांना होत असतो. अल्पसंख्याक विकास विभागामार्फत अल्पसंख्याक समुहाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काही योजना राबविण्यात येत आहेत. आज आपण अल्पसंख्याक उमेदवारासाठी मौलाना आझाद मोफत शिकवणी व संबद्ध योजना याविषयीची माहिती.
राज्यातील अल्पसंख्याक लोकसमूहातील उमेदवारांना शासकीय/निमशासकीय सेवेत रोजगारांच्या पुरेशा संधी उपलब्ध करून देण्यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोग/महाराष्ट्र लोकसेवा आयोग/बँकिग सेवा इत्यादी स्पर्धा परीक्षांसाठी प्रशिक्षण तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमामधील प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सामाईक प्रवेश परीक्षांच्या पूर्वतयारीसाठी प्रशिक्षण. इयत्ता 10 वी 12 अनुत्तीर्ण अल्पसंख्याक उमेदवारांसाठी विशेष शिकवणी वर्ग सुरू करण्यासाठी दि. 25 मार्च 2013 च्या शासन निर्णयान्वये मौलाना आझाद मोफत शिकवणी व संबद्ध योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.
या योजनेंतर्गत राज्यातील मुंबई, ठाणे, अमरावती, औरंगाबाद, नागपूर, पुणे व नाशिक या शहरांमध्ये प्रशिक्षण केंद्रांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी नामांकित खाजगी संस्थांकडून अर्ज मागविण्यात आले असून सध्या निवडीची प्रक्रिया प्रगतीपथावर आहे. तसेच इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. प्रशिक्षणाबाबतची तपशीलवार माहिती जसे प्रशिक्षणाचा प्रकार, उमेदवारांची संख्या, प्रशिक्षणांचा कालावधी व प्रत्येक उमेदवाराला फीच्या स्वरूपात द्यावयाची अधिकतम रक्कम इत्यादी खालीलप्रमाणे आहे.
भौतिक उद्दिष्ट:4000 विद्यार्थी
योजनेची अंमलबजावणी करणारी यंत्रणा: अल्पसंख्याक विकास विभाग
अ.क्र. |
प्रशिक्षणाचा प्रकार |
उमेदवाराची संख्या |
प्रशिक्षणाचा कालावधी |
प्रति उमेदवारासाठी द्यावयाची फीची अधिकतम रक्कम |
1 |
केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी प्रशिक्षण |
250 |
10 महिने |
रू. 25,000/- |
2 |
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राजपत्रित अधिकारी या पदांकरीता घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी प्रशिक्षण. |
250 |
10 महिने |
रू. 20,000/- |
3 |
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत अराजपत्रित अधिकारी या पदांसाठी घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी प्रशिक्षण. |
500 |
10 महिने |
रू. 15,000/- |
4 |
बँकिंग सेवेतील परीक्षांकरीता प्रशिक्षण. |
400 |
6 महिने |
रू. 8,000/- |
5 |
सामाईक प्रवेश परीक्षा |
600 |
2 वर्ष |
रू. 40,000 |
(अ) |
अभियांत्रिकी |
200 |
1 वर्ष / |
रू. 20,000/- |
|
|
|
2 वर्ष |
(रू. 40,000/- 2 वर्षांकरीता) |
(ब) |
वैद्यकीय आणि तत्सम शाखा |
200 |
1 वर्ष / |
रू. 20,000/- |
|
|
|
2 वर्ष |
(रू. 40,000/-2 वर्षांकरीता) |
(क) |
सनदी लेखापाल, व्यवस्थापन, विधी इत्यादी |
200 |
1 वर्ष / |
रू. 20,000/- |
|
|
|
2 वर्ष |
(रू. 40,000/-2 वर्षांकरीता) |
6 |
इयत्ता 10 वी नापास विद्यार्थ्यांसाठी विशेष शिकवणी वर्ग |
1000 |
10 महिने |
रू. 4,000/- |
7 |
इयत्ता 12 वी नापास विद्यार्थ्यांसाठी विशेष शिकवणी वर्ग |
1000 |
10 महिने |
रू. 4,000/- |
-वर्षा फडके, वरिष्ठ सहायक संचालक.
माहिती स्रोत: महान्युज
अंतिम सुधारित : 1/30/2020