অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सौरभ पाटणकर उत्कृष्ट युवा संशोधक

सौरभ पाटणकर उत्कृष्ट युवा संशोधक

बदलापूरमधील सौरभ पाटणकर या पीएचडीच्या विद्यार्थ्याने रसायन शास्त्रात मोलाचे संशोधन केले आहे. गॅमा व्हॅलेरो लॅक्टोन या इंधनाची निर्मिती जी एरव्ही ज्यादा खर्चात होते, ती याने अत्यंत कमी खर्चात करण्याचे संशोधन केले आहे. हे संशोधन यापूर्वी कोणीच केले नसून सौरभने याचे पेटंटही स्वतःच्या नावे मिळवले आहे. त्याच्या या संशोधनासाठी त्याला ग्रीन केमिस्ट्री फाऊंडेशनतर्फे उत्कृष्ट संशोधकाचा पुरस्कारही मिळाला आहे. सौरभ वर कौतुकाचा वर्षाव होत आहे. पुढील शिक्षणासाठी तो केनडा येथे रवाना झाला आहे.

बदलापूर पूर्वेला राहणाऱ्या सौरभ पाटणकरने आपले शालेय शिक्षण कात्रप विद्यालय यथे केले. अकरावी व बारावी उल्हास नगर येथील सीएचएम महाविद्यालयात आणि पदवीचे शिक्षण डोंबिवली येथील जोंधळे तांत्रिक महाविद्यालयातून पूर्ण केले. पीएचडीमध्ये संशोधन करताना सौरभने भविष्यातील जैव इंधनाला पर्याय ठरणाऱ्या गॅमा व्हॅलेरो लॅक्टोन या इंधनाच्या निर्मितीवर संशोधन करत चांगली कामगिरी केली आहे. या इंधनाच्या निर्मितीसाठी सध्या किमान १५० डॉलर प्रति बॅरल खर्च येत असल्याने त्याची किंमत न परवडणारी आहे. मात्र, मुंबईतील इन्स्टिट्यूट ऑफ केमिस्ट्रीमध्ये पीएचडी दरम्यान यावर संशोधन करण्यास सुरूवात केली. यावेळी त्याने सदर प्रक्रिया ही एकाच रिअ‍ॅक्टरमध्ये केली व यासाठी गवत, जंगलातील लाकडी काटक्या आदी निसर्गातले टाकाऊ पदार्थ, लॅवोनिक अ‍ॅसिड यांचा वापर करत पाण्यात त्यांची अभिक्रिया करत या इंधनाची निर्मिती केली. त्यामुळे या इंधनाची किंमत ५० डॉलर प्रति बॅरल इतकी खाली येऊ शकणार आहे. त्यामुळे महागडे रासायनिक पदार्थ वापरण्याऐवजी वरील पदार्थांचा वापर करण्याचे कार्य सध्या एकट्या सौरभने केले असून या निर्मितीचे बौद्धिक संपदा हक्कही त्याने नुकतेच त्याच्या नावे राखून घेतले आहेत.

अत्यंत महागड्या इंधनाची निर्मिती स्वस्तात केल्याने भविष्यात या मोठ्या प्रमाणात या इंधनाची निर्मिती होत प्रत्येकालाच हे इंधन स्वस्तात मिळणार आहे. तसे, पेट्रोल, डीझेल याला हे इंधन पर्याय असल्याने या संशोधनाला अधिक महत्त्व निर्माण झाले आहे. या संशोधनासाठी ग्रीन केमिस्ट्री फाऊंडेशनतर्फे मुंबईतील जे.डब्ल्यू. मेरीयट हॉटेलमध्ये भारतातील उत्कृष्ट युवा संशोधक म्हणून इंडस्ट्रीयल ग्रीन केमिस्ट्री वर्ल्ड २०१५ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. युएसए मधील वोर्नर बेब्कोक फौंडेशन चे डॉ. जॉन वोर्नर व अमेरिकन केमिकल सोसायटीचे डॉ. डेव्हिड कॉन्स्टेबल यांचे हस्ते हा अत्यंत मनाचा पुरस्कार सौरभला प्रदान करण्यात आला. अमेरीकन केमिकल जर्नल या मासिकात त्याचा प्रबंध देखील प्रकाशित झाला आहे. याकामी इन्स्टिट्यूट ऑफ केमिस्ट्रीमधील त्याचे प्राध्यापक गणपती यादव यांची त्याला मदत झाली आहे. तसेच, त्याला पुढील संशोधनासाठी ब्रिटीश कोलंबिया विद्यापीठाची शिष्यवृत्ती मिळाली असून तो सध्या त्यासाठी नुकताच कॅनडाला रवाना झाला आहे. यावेळी सौरभने या कामी वडीलांचा पाठिंबा वेळोवेळी मिळाल्याने व आईच्या आशिर्वादाने हे संशोधन करता आल्याची भावना व्यक्त केली.

लेखक: गिरीश त्रिवेदी, ज्येष्ठ पत्रकार, अंबरनाथ

मो.- 9850157088

माहिती स्रोत: महान्यूज

अंतिम सुधारित : 8/15/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate