चहापत्तीत चोथा भरपूर असतो. त्यात हवा अडकून बसलेली असते, ती उष्णतेने बाहेर येते. तसेच चहापत्तीला टोके असतात. टोकांमुळे बुडबुडे बनण्याला वाव मिळतो. उकळी जास्त फुटलेली दिसते. हाच प्रयोग भुस्सा वापरून करून पहा.उकळीला चमच्याची मदत.साहित्य – छोटे पातेले, पाणी, शेगडी, लांब दांडीचा चमचा.कृती – एक छोटे पातेले घ्या. त्याच्या आतल्या भागात कोठेही पोचा आलेला नको, पातेले करपलेले नको, घाण अडकलेले नको. त्यात पाऊण पातेले पाणी भरा. शेगडीवर उकळायला ठेवा. उकळी फुटल्यावर धग कमी करा. उकळीचे बुडबुडे कमी झाले की एक लांब दांडीचा चमचा घेऊन तो पाण्याच्या बुडाशी टेकवून तळाला खरवडा. खरवडलेल्या जागी पाणी उकळते.एखादा द्रव उत्कलनांकाइतका तापला तरी बुडबुडा तयार होण्यासाठी टोकदार जागा लागते.कोमट पाणी लागेल उकळायला.
साहित्य – सिरींज किंवा पिचकारी, पातेले, पाणी, शेगडी.
कृती – एका पातेल्यात पाणी घ्या. शेगडीवर गरम करा. पाणी उकळू देऊ नका. इंजेक्शनची सिरींज किंवा पिचकारी घ्या. सिरींजची सुई काढून बाजूला ठेवा. सिरींज किंवा पिचकारीचे टोक गरम पाण्यात ठेवून दट्ट्या मागे ओढा. थोडे पाणी आत जाऊ द्या. सिरींज किंवा पिचकारी पाण्याच्या बाहेर काढा. टोकावर बोट ठेवून दट्ट्या मागे ओढा. आतले पाणी कोमट असतानाच उकळलेले दिसेल.दट्ट्या मागे ओढताना आतल्या कोमट पाण्यावरचा दाब कमी होतो. दाब कमी की उत्कलनांक कमी होतो म्हणून कोमट पाणीही उकळते.न तापवताच बुडबुडे.
साहित्य – छोटे पातेले, पाणी, लांब दांडीचा चमचा, झाकण. कृती – एक पातेले घ्या. नळाच्या पाण्याने पूर्ण भरा. पाण्यात एक लांब दांडीचा चमचा ठेवा. धक्का लागणार नाही अशा ठिकाणी हे सारे झाकून ठेवा. काही तासाभराने उघडून पहा. पातेल्याच्या कडेला तसेच चमच्यावर बुडबुडे आलेले दिसतील. नळाचे पाणी क्लोरीन वायूने शुद्ध केलेले असते. पाण्यात विरघळलेला वायू टोकाची जागा मिळताच बुडबुड्याच्या स्वरूपात बाहेर पडतो.साहित्य – तुम्ही स्वत:, मोठ्या आकाराचा कागद, कात्री, टोकदार पेन्सिल कृती – एक मोठ्या आकाराचा कागद घ्या. त्याच्या एका बाजूला तुमचा डावा पाय पूर्णपणे टेकवा. टोकदार पेन्सिलीने त्या पायाची बाह्यरेषा काढा. बाह्यरेषेने तयार झालेली ही बाह्याकृती कात्रीने कापून घ्या. अशाच प्रकारे उजव्या पायाची बाह्याकृती कापून घ्या. या दोन्ही बाह्याकृती एकमेकांवर ठेवून त्याच्यांत काही फरक पडलेला दिसतो का ते बघा. तुम्हाला दोन तळपायातले अंतर लक्षात येईल.
एक तळपाय दुसर्या तळपायापेक्षा मोठा असल्याचे आढळते. अनेकांच्या तळपायांचे बाह्याकार घेऊन तपासा. डावखुर्यांचा डावा तळपाय मोठा असतो का ?
साहित्य – किडा, छोटी पिशवी, कुंकू, पाणी, छोटी ताटली, पांढरा कागद. कृती – एक संथ चालणारा किडा शोधा. तो हलकेच एका छोट्या पिशवीत ठेवा. एका छोट्या ताटलीत कुंकू आणि पाणी घालून गंध तयार करा. एक पांढरा कागद सपाट जमिनीवर पसरा. छोट्या पिशवीतून हलक्या हाताने किडा उचलून त्याचे पाय गंधात बुडवा. मग किडा पांढर्या कागदाच्या मध्यावर ठेवा. त्याला त्याच्या मर्जीने हलू द्या. किड्याच्या पायांच्या क्रमाचे निरीक्षण करा. दोन पायात पडलेल्या अंतराचे निरीक्षण करा. किड्याला तीन उजवे आणि तीन डावे पाय असतात. त्यांचा क्रम सांगण्यापेक्षा तपासून पहाण्यात शोध लागल्याचे समाधान मिळेल.
साहित्य – तुम्ही स्वत:, पेला, पाणी, बर्फ, ताटली, तांदूळ, रुमाल. कृती – एका ताटलीत तांदूळ पसरून ठेवा. बोटाच्या चिमटीने तांदूळाचा एक एक दाणा उचलून घेण्याचा सराव करा. एका पेल्यात थोडे बर्फाचे तुकडे घाला. पेला पाण्याने भरा. या बर्फाच्या पाण्यात बोटे बुडवून गार होऊ द्या. त्यानंतर हात बाहेर काढून बोटे रुमालाने कोरडी करा. आता बोटांच्या चिमटीने तांदूळाचा एक एक दाणा उचलता येतो का पहा. बोटे गार पडल्यावर मेंदूचे संदेश त्यांच्यापर्यंत नीट पोचत नाहीत
स्त्रोत : मराठी विज्ञान परिषद, पुणे
अंतिम सुधारित : 10/7/2020
चांगले उत्पन्न मिळवून देणारे पीक’ म्हणून ज्वारीचे ...
आजकाल प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने महिल...
सभोवताली सहज उपलब्ध असणाऱ्या वस्तू पुन्हा वापरून, ...
अमेरिकेतील आर्कान्सास विद्यापीठामध्ये शाश्वत स्ट्र...