অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

राज्यशास्त्र

राज्यशास्त्र

  • भारताचे परराष्ट्रीय धोरण
  • स्वतंत्र भारताच्या परराष्ट्रीय धोरणाची स्थूल जडणघडण स्वातंत्र्यपूर्व काळातच झाली.

  • अंकित राष्ट्रे
  • एखाद्या बलिष्ठ राष्ट्राकडून ज्या राष्ट्राचे परराष्ट्रीय धोरण व अंतर्गत शासनपद्धती ठरविली जाते, अशा राष्ट्रांना ‘अंकित राष्ट्रे’ म्हणतात.

  • अटलांटिक सनद
  • अमेरिकेचे अध्यक्ष रूझवेल्ट व ब्रिटिश पंतप्रधान चर्चिल यांनी दुसऱ्‍या महायुद्धाच्या काळात अटलांटिक महासागरात न्यू फाउंडलंडजवळ एका बोटीवर विचार विनिमय करून दि. १४ ऑगस्ट १९४१ रोजी केलेल्या संयुक्त घोषणेस ‘अटलांटिक सनद’ म्हणतात.

  • अणुऊर्जा-मंडळे
  • अणुऊर्जेचे उत्पादन, संशोधन आणि तिचे विविधोद्देशी उपयोजन इ. कार्यासाठी निरनिराळ्या देशांत स्थायी स्वरूपाची मंडळे स्थापन करण्यात आली आहेत.

  • अणुऊर्जाविषयक धोरण
  • दुसऱ्‍या महायुद्धाच्या अखेरीस, ६ ऑगस्ट १९४५ ला अमेरिकेने अणुबाँबचा पहिला प्रयोग हिरोशिमावर केला व जपानला शरणागती पतकरावयास लावली.

  • अधिकारदान
  • एका व्यक्तीचे किंवा नागरिकाचे अधिकार दुसऱ्या व्यक्तीस अगर संस्थेस दिले जाणाऱ्या क्रियेस अधिकारदान (डेलिगेशन) म्हणतात.

  • अधिकारी तंत्र
  • कोणत्याही राज्याचा दैनंदिन कारभार पाहण्यासाठी वा प्रशासनासाठी जी एक कायम स्वरूपाची सेवकांची यंत्रणा असते तिला ‘अधिकारीतंत्र’ किंवा ‘नोकरशाही’ म्हणतात.

  • अधिराज्यत्व
  • अधिराज्यत्व ह्या संज्ञेने मध्ययुगात राजा, वरिष्ठ सरंजामी सरदार व कनिष्ठ सरदार ह्यांच्यामधील संबंध दर्शविले जात.

  • अध्यक्ष
  • ही संज्ञा अनेक अर्थांनी वापरली जाते. कोणत्याही सभेचे संचलन करण्यासाठी निवडलेल्या अगर नेमलेल्या व्यक्तीस अध्यक्ष म्हणण्यात येते.

  • अनुशीलन समिती
  • अरविंद घोषांच्या अध्यक्षतेखाली ‘युगांतर समिती’ हा स्वतंत्र गट तयार करण्यात आला.

  • अरब लीग
  • सूदान, सिरिया, ट्युनिशिया, येमेन व संयुक्त अरब अमीर राज्ये

  • अराज्यवाद
  • एक राजकीय विचारप्रणाली. ह्या मतानुसार समाजधारणेस कोणत्याही प्रकारच्या राज्ययंत्रणेची आवश्यकता नाही.

  • अलगतावाद
  • विदेशनीतीचे एक सूत्र. एका राष्ट्राने अन्य राष्ट्राशी कोणत्याही प्रकारे बंधनकारक असा तह अगर करार न करता स्वतंत्रपणे आपल्या हितसंबंधांचे रक्षण करण्याचे धोरण स्वीकारणे, ह्यास ‘अलगतावाद’ म्हणतात.

  • अलिप्तता
  • अनेक प्रकारच्या परराष्ट्रीय धोरणांपैकी अलिप्तता हे एक धोरण आहे. आंतरराष्ट्रीय राजकीय गटांपासून व लष्करी संघटनांपासून अलग राहणे म्हणजे अलिप्तता होय.

  • अल्पसंख्य समाज
  • एक वंश, एक भाषा, एक धर्म अगर सामाजिक वा सांस्कृतिक विषमता .

  • अवचित सत्तांतरण
  • ही शब्दावली पश्चिमी राजकारणात रूढ असलेल्या 'कू देता' या फ्रेंच संज्ञेचे भाषांतर होय.

  • अशोकचक्र
  • भारताच्या राष्ट्रचिन्हावर व राष्ट्रध्वजावर असलेले चक्र. हे सारनाथ येथील उत्खननात सापडले.

  • असहकारिता
  • कोणाही व्यक्तीच्या, समाजाच्या अगर सत्तेच्या कार्याशी नीती अगर न्याय ह्या दृष्टीने सहकार्य करणे अयोग्य आहे

  • अ‍ॅन्झूस करार
  • तीन देशांनी आपल्या रक्षणासाठी केलेला लष्करी करार.

  • आंतरराष्ट्रीय करार व तह
  • आंतरराष्ट्रीय तह म्हणजे दोन अगर अधिक सार्वभौम राष्ट्रांमध्ये झालेला करार आंतरराष्ट्रीय संबंध नियमित होण्याच्या द्दष्टीने त्याला फार महत्त्वाचे स्थान आहे.

  • आंतरराष्ट्रीय संघटना
  • भिन्न भिन्न राष्ट्रांतील शासकीय यंत्रणांनी अगर खाजगी व्यक्तींनी एकत्र येऊन काही विशिष्ट हेतू साध्य करण्यासाठी स्थापन केलेली स्थायी स्वरूपाची यंत्रणा.

  • आंतरराष्ट्रीय संबंध
  • दोन सार्वभौम राष्ट्रांमध्ये राजकीय, आर्थिक, औद्योगिक, सामाजिक, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांत येणाऱ्या सलोख्याच्या, तटस्थतेच्या किंवा संघर्षाच्या संबंधाना व्यापक अर्थाने ‘आंतरराष्ट्रीय संबंध’ असे म्हणतात.

  • आंतरराष्ट्रीयत्ववाद
  • जगातील भिन्न भिन्न राष्ट्रांमध्ये सलोख्याचे, सहकाराचे व परस्परसामंजस्याचे संबंध राहावेत, लहानमोठे संघर्ष व युद्धे बंद व्हावीत

  • आफ्रो-आशियाई परिषद
  • इंडोनेशियातील बांडुंग येथे दि. १८ ते २४ एप्रिल १९५५ दरम्यान भरलेली आफ्रिका आणि आशिया खंडांतील स्वतंत्र राष्ट्रांची पहिली औपचारिक परिषद.

  • आफ्रो-आशियाईगट
  • दुसऱ्या महायुद्धानंतर झालेल्या आफ्रिका आणि आशियातील राष्ट्रांचा गट.

  • इंटरनॅशनल संज्ञा
  • आंतरराष्ट्रीय सभासदत्व असलेल्या अनेक संस्थांना आणि संघटनांना ‘इंटरनॅशनल’ ही संज्ञा लावली जाते. पण राजकीय दृष्ट्या ही संज्ञा अशा आंतरराष्ट्रीय संघटनांशी संलग्न झालेली आहे,

  • इंडियन नॅशनल काँग्रेस
  • भारतातील एक विद्यमान राजकीय पक्ष. स्थापना दिनांक २८ डिसेंबर १८८५. आधुनिक भारताच्या घडणीत, सगळ्यात अधिक कामगिरी कॉंग्रेसने केली आहे.

  • एकपक्ष पद्धति
  • ज्या राज्यपद्धतीमध्ये एकाच राजकीय पक्षाचे अस्तित्व असून किंवा एकाच राजकीय पक्षाच्या हाती विरोधी पक्षांचे नियंत्रण करण्याइतकी प्रचंड शक्ती असेल.

  • कँटोनमेंट
  • कँटोनमेंट हा एक स्थानिक स्वराज्य संस्थेचाच प्रकार आहे. पण त्याच्याशी लष्कराचा संबंध येत असल्याने त्याबद्दलचे नियम व तरतुदी काही बाबतीत फार वेगळ्या आहेत.

  • कम्युनिस्ट जाहीरनामा
  • कार्ल मार्क्स आणि फ्रीड्रिख एंगेल्स या दोघांनी १८४८ मध्ये कम्युनिस्ट पक्षाचा जाहीरनामा (मॅनिफेस्टो ऑफ द कम्युनिस्ट पार्टी) प्रसिद्ध केला.

    © C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
    English to Hindi Transliterate