অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मेंदू विकार आणि मानसशास्‍त्र

मेंदू विकार तज्ञ आणि मानसशास्‍त्राच्‍या संशोधनानुसार कमी शैक्षणिक पातळीमुळे मेंदूचे वार्धक्य लवकर येते. सामान्यपणे अशा व्यक्तींच्या मेंदूची कार्यक्षमता फारशी वापरली जात नाही. तर उच्च शिक्षणामुळे मेंदूचे वार्धक्य काही मर्यादेत तरी दूर रहाते. कारण उच्चशिक्षित व्यक्तींच्या मेंदूतील मज्जापेशी व त्यांच्यातील 'जोड' मजबूत असतात. त्यामुळे त्यांच्यातील वार्धक्याची प्रक्रिया लांबते.

आपल्या मेंदूचे कार्य मृत्यूपर्यंत अव्याहतपणे म्हणजे आपण अगदी झोपेत असताना देखील सुरुच असते. मेंदूव्‍दारे विचार करणे, आपल्‍या हालचालींचे नियंत्रण करणे इतकेच नव्हे तर पचन व श्वसन इ. शारीरिक क्रियादेखील पार पाडल्या जातात.

आपल्या स्मृतीला इतर अवयवांप्रमाणे भौतिक अस्तित्व नसते. मेंदूतील आठवण्याच्या प्रक्रियेला स्मृती असे म्हटले जाते. विचार करणे ही प्रक्रियादेखील मेंदूतील मज्जापेशींद्वारेच घडते पण ती नुसत्या आठवण्याच्या प्रक्रियेपेक्षा जास्‍त जटील किंवा गुंतागुंतीची असू शकते.

स्मृती

स्मृती ही आपल्या मेंदूतील विशिष्ट भागातच साठवली जात असावी असा समज होता. पण मेंदूविकार तज्ज्ञ (न्यूरॉलॉजिस्ट) तसेच संज्ञानात्मक मानसशास्त्रीय (कॉग्रिटिव्ह सायकॉलॉजी) संशोधनानुसार हा समज काही खरा नाही असे आता लक्षात आलेले आहे. स्मृती साठवण्याच्या प्रक्रियेत मेंदूचे सर्वच भाग सक्रीय असतात असे लक्षात आलेले आहे. मेंदूच्या एका भागाला इजा झाली तरी स्मृतीचा थोडा अनुभव इतर भागातही शिल्लक राहिलेला असतो.

स्‍मृती ही मेंदूतील मज्‍जापेशींच्‍या प्रणालींच्‍या अनेक गटांद्वारे बनलेली असते. त्यातील प्रत्येक प्रणाली स्मृतीची निर्मिती, साठवण व पुन्हा आठवणे असे विविध कार्य करते. मेंदू जेव्हा माहितीवर प्रक्रिया करतो तेव्हा या सगळ्या प्रणाल्या मिळून एक विचार निर्माण करतात.

स्मृती निर्मितीच्या प्रक्रियेत सर्वात प्रथम आपल्या ज्ञानेंद्रियांच्या (नाक, कान, जीभ, डोळे, त्वचा) द्वारे आपल्या मेंदूला ज्या संवेदनांचे आकलन होते, ती अल्पकालीक म्हणजे काही मिलीसेकंद (एक मिली सेकंद म्हणजे एक सेकंदाचा हजारावा भाग) टिकणारी स्मृती असते.

त्यापेक्षा जास्त काळ टिकणारी स्मृती म्हणजे लघुकालीक स्मृती असते ती वीस ते तीस सेकंद टिकणारी असते. लघुकालिक स्मृती छोट्या तुकड्यात विभागून लक्षात लघुकालीक स्मृती महत्वाची असेल तर तिची दीर्घकालीक काँटॅक्स या भागांची मदत होते. दीर्घकालीक स्मृती आयुष्यभर टिकू शकते. दीर्घकालीक स्मृतीच्या निर्मितीसाठी काही तास, दिवस, महिने, वर्ष देखील लागू शकतात. मेंदूत दीर्घकालीक स्मृती साठविण्यासाठी अफाट क्षमता असते. एखाद्या संगणकाप्रमाणे मानवाच्या मेंदूची स्मृती क्षमता (स्टोरेज स्पेस) संपली असे कधीच घडत नाही!

दीर्घकालीक स्मृती

दीर्घकालीक स्मृतीचे उद्घोषित स्मृती व उद्घोषित नसणारी म्हणजे सूचक स्मृती असे दोन प्रमुख प्रकार असतात.

उद्घोषित स्मृतीचे घटनास्मृती, शब्दार्थाची स्मृती, भविष्यकालीन घटनासंदर्भातली संभाव्य स्मृती, भूतकालीन स्‍मृती व्‍यक्‍तीच्‍या संदर्भातली स्‍मृती असे प्रकार असतात. दीर्घकालीक स्मृती ही मुद्दाम आठवावी लागते. तसेच ती विसरलीही जाऊ शकते.

उद़घोषित नसणारी (Non declarative) म्‍हणजे सूचक स्मृती मात्र विसरली जात नाही. कारण एकदा सरावाने आत्मसात केलेली कला किंवा कौशल्य काही वर्षांनीसुद्धा शर्टाची बटणे लावणे इ. गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी फारसा विचार करावा लागत नाही.

आपल्या दीर्घकालीक स्मृतीला (long term memory) ‘मज्जातंतूंनी अनेक मज्जापेशींशी (भागांशी) जोडलेले गुंतागुंतीचे जाळे असे म्‍हणता येईल उदाहरणार्थ मोटर सायकल चालवायची स्मृती असली तरी त्यात मेंदूतील अनेक क्षेत्रे भाग घेतात. ती कशी चालवायची म्हणजे सुरू कशी करायची, गियर कसा टाकायचा, ब्रेक कसा लावायचा या प्रक्रियेची स्मृती एका मज्जापेशी गटाकडून येते. मोटर सायकल दुसरीकडे कुठल्या मार्गाने न्यायची ह्याची स्मृती वेगळ्या मज्जापेशी गटाकडून येते. तर सुरक्षा नियमांची स्मृती तसेच एखादा भरधाव ट्रक फारच जवळून गेला तर जी भीतीची जाणीव होते त्या जाणिवेची स्मृती इ. स्मृती मेंदूतील भिन्न मज्जापेशीगटांकडून येतात. हे वेगवेगळे बौद्धक अनुभव असल्याची किंवा ते मेंदूतील भिन्न भागांकडून येत असल्याची आपल्याला जाणीवही होत नसते. मोटर सायकल चालवितानाच्या दृष्य, ध्वनी, शब्द, भावना इ. विषयक स्मृतीचा भाग पुन:पुन्हा वापरला जातो. दरवेळेस मोटर सायकल चालवताना जुनी स्मृती पुन्हा सक्रीय होते. त्यात नव्या अनुभवांची भरही पडते.

आपला मेंदू हा कवटीत सुमारे सव्वा लीटर पाणी मावेल इतक्या लहानशा जागेत मावतो. त्याचे वजन सरासरी अवघे  दिड किलोग्रॅम इतके असते. इतक्‍याक्ष्‍या मेंदूत सरासरी शंभर अब्ज मज्जापेशी (न्यूरॉन्स) असतात तसेच त्यांना आधार व संरक्षण देणा-या संख्येने तितक्याच ग्लायल पेशी (Glial cells) असतात. मज्जापेशी म्हणजेच चेतापेशी हा आपल्या मज्‍जासंस्‍थेचा तसेच मेंदूचा मुलभूत घटक असतो. मज्‍जापेशी विदयुत रासायनिक संदेशाचे आदान प्रदान करतात.

मेंदूतून पाठीच्या कण्यात जाणारा मज्जारज्जू देखील मज्जापेशींनी बनलेला असतो. मज्जारज्जूतून बाहेर पडून घटकांचा आपल्‍या शरीरभर पसरले्ल्‍या मज्‍जातंतूंच्‍या जाळयाव्‍दारे शारीरिक क्रियांचे मेंदूव्‍दारे नियंत्रण होते.

मज्‍जापेशींचे शरीरातल्‍या इतर काही प्रकारच्‍या पेशींप्रमाणे विभाजन होवून त्‍यांची संख्‍या वाढत नाही. जन्‍मतः मेंदूत असणा-या मज्‍जापेशी आयुष्‍यभर सामान्‍यतः तितक्‍याच राहातात. वार्धक्‍य, प्राणवायूचा अभाव, रक्‍तप्रवाहातील अडथळा रक्‍त वाहीनी फूटणे, अपघाती इजा यामुळे मज्‍जापेशी अकार्यक्षम किंवा मृत होवून व्‍यक्‍तीत अशक्‍तपणा, बोलणे बंद होणे, अर्धांगवाहू असे विकार होवू शकतात. वयाच्‍या तिस-या वर्षापर्यंत त्‍यांच्‍या आकाराची 80 टक्‍के वाढ पूर्ण होते. जन्‍मतः अनुवंशिक घटकांच्‍या मेंदूच्या विकासात वाटा असला तरी जीन्स (Genes) द्वारे होणारे लहानपणीचे मेंदूच्या रचनेतले बदल अंतिम नसतात. लहान वयात पर्यावरणातील घटकाच्‍या प्रभावानुसार मेंदूतील मज्जापेशींच्या जोडणीत बदल घडतात.

सर्वसामान्य स्मृतिक्षमता

जन्मतः सर्वसामान्य स्मृतिक्षमता असणारी व्यक्ती दीर्घ प्रयत्नांनी एखादया विषयाची खोलवर माहिती आत्मसात करून दीर्घकालीक स्मृतिक्षमता विकसित करू शकते. स्मरणशक्तीच्या एका प्रकारात अत्यंत कुशल असणारी व्यक्ती इतर प्रकारात अत्यंत सर्वसामान्य असू शकते.

आपल्या मेंदूतील सर्व मज्जापेशी ह्या त्यांच्यातून बाहेर निघालेल्‍या तंतूसारख्‍या रचनेने एकमेकींशी जोडल्‍या गेलेल्‍या असतात. एक मज्जापेशी ही इतर दहा हजार मज्जापेशींशी 'जोडली' जाऊ शकते. मात्र मज्जापेशींचे तंतू प्रत्यक्षात जोडबिंदूवर स्‍पर्श करीत नाहीत मज्‍जापेशींच्‍या जोडबिंदूवर (Synapse) अतिसूक्ष्म रिकामी जागा (Gap) असते. या जोडबिंदूचा उपयोग मज्‍जापेशीत माहितीचे आदानप्रदान करण्यासाठी होतो. माहितीवाहक विद्युतरासायनिक संदेश हे जोडबिंदू ओलांडून पुढे जातात. मानवी मेंदूत एक ते एक हजार ट्रिलीयन (U.S.) जोडबिंदू असतात. (एक ट्रेलियन म्हणजे एकावर बारा शून्ये इतकी संख्या)

मज्जापेशींभोवतीच्या आवरणातून सोडियम, पोटॅशियम, क्लोराईड व कॅल्शियमच्या आयनांची हालचाल (Diffusion होवून त्याद्वारे विद्युतरासायनिक संदेश निर्माण होऊन त्याद्वारे मज्जापेशींत माहितीचे दळणवळण घडून येते मज्‍जापेशींच्‍या संदेशवाहनात ग्‍लुटामेट तसेच GABA ही दोन प्रमुख अमिनो आम्ले तसेच अॅसिटल सेरोटोनिन, मेलाटोनिन ही रसायनेदेखील सक्रीय भाग घेतात. मज्जापेशींत निर्माण होणारी ही रसायने (न्यूरोट्रान्समिटर्स) मज्जापेशींच्या जोडबिंदूवर सोडली जातात. ती संदेशाचे विवर्धन, नियमन (Modulation) घडवतात तसेच मज्जापेशींभोवतीच्या आवरणाची प्रवेशक्षमता (पार्यता) बदलवतात.

मज्जापेशींमधले जोडबिंदू'स्थिर (Static) नसतात. प्रत्येक वेळी नवे ज्ञान, अनुभव तसेच माहिती मेंदूत साठविताना मज्जापेशींतील जोडणीत बदल होऊन माहिती आठवण्याचा सराव जितका जास्त केला जातो तितके मज्जापेशींतले जोड मजबूत होत जातात. सरावाने माहिती आठवण्यातल्या चुका कमी होत जातात व माहिती आठवण्याचा वेग वाढतो.

मानव ज्या पद्धतीने स्मृती निर्माण करून ती मेंदूत ठेवतो ती पद्धत संगणकातल्या स्मृती प्रमाणे नसते. त्यामुळे मानवी मेंदूची तुलना संगणकाशी करणे योग्य ठरत नाही. पण तरीही मायक्रोचिप्प्स वापरून मानवी मेंदू इतक्या स्मृती क्षमतेचा संगणक तयार करायचा झाल्यास चार खोल्यांच्या आकाराचा महासंगणक निर्माण करावा लागेल व तो चालविण्यासाठी एक छोटे ऊर्जा केंद्रच उभारावे लागेल! त्याच्या स्मरण शक्तीची क्षमता एक ते एक हजार टेराबाईट इतकी असेल! आपल्या करण्यास कठीण आहे. त्यामुळे मानवाइतक्या क्षमतेचा यंत्रमानव अजूनही कुणाला बनवता आलेला नाही.

मानवी मेंदूची स्मृतिक्षमता अफाट आहे. पण करायला हवा तितका मेंदूचा वापर न केल्याने आपल्याला तिचा प्रत्यय येत नाही. आयुष्यभर उच्च प्रतीचे बौद्धक काम करणारी व्यक्तीदेखील स्वतःच्या मेंदूच्या अगदी अल्प (एक दशांशापेक्षाही कमी) स्मृतिक्षमतेचा वापर करते असे म्हटले जाते.

मेंदूचा आणि कौशल्यांचा सतत वापर केल्याने आपली स्मृती तसेच बुद्धमत्ता वाढत जाते. बुद्धमत्ता ही आनुवंशिक देणगी नाही.

मेंदूविकारतज्ज्ञ आणि मानसशास्त्रज्ञांच्या सशोधनानुसार कमी शैक्षणिक पातळीमुळे मेंदूचे वार्धक्य लवकर येते. सामान्‍यपणे अशा व्‍यक्‍तींच्‍या मूंदूची कार्यक्षमता फारशी वापरली जात नाही. तर उच्‍च शिक्षणामुळे मेंदूचे वार्धक्‍य काही मर्यादेत तरी दूर राहाते. कारण उच्च शिक्षित व्यक्तींच्या मेंदूतील मज्जापेशी व त्‍यांच्‍यातील जेाड मजबूत असतात त्‍यामुळे त्‍यांच्‍यातील वार्धक्याची प्रक्रिया लांबते.

अमायलॉईड

मेंदूतील मज्जापेशींभोवतालच्या आवरणात अमायलॉईड (Amyoid) नावाचे प्रथिन असते. अल्झायमर सारख्या मेंदूविकारात या प्रथिनाचे विभाजन विकृतपणे होते. त्यामुळे मज्जापेशींभोवती बीटा-अमायलॉईडचा चिकट थर साचतो. मज्जापेशींसाठी हा थर हानीकारक ठरतो. वृद्धपणी ज्या व्यक्तींचा मेंदू कार्यक्षम असतो, त्यांच्या मेंदूतील बीटाअमायलॉईडची पातळी कमी रहाते असे आढळलेले आहे.

वृद्धपणी स्मृती तसेच बौद्धक -हास होऊ नये यासाठी पुढील गोष्टींची मदत होऊ शकते.

१) धुम्रपान वगैरे व्यसने न करणे

२) उच्च शिक्षण

३) शारीरिक व बौद्धक क्रियाशीलता

४) निद्रानाश, उच्च रक्तदाब, रक्तातील उच्च हानीकारक कोलेस्‍टेरॉल, मधुमेह लठठपणा, नैराश्‍य यावर वेळीच उपचार.

वृद्धपणी बौद्धक क्रियाशीलता टिकवण्यासाठी बुध्‍दीबळ खेळणे कोडी सोडवणे, शैक्षणिक कार्यक्रमात सहभाग घेणे व्‍याख्‍यानांना उपस्थिती लावणे जिज्ञासू राहाणे, लिहिणे, वाचणे शक्‍य असेल तर शैक्षणिक परीक्षा देणे अशा गोष्‍टी करता येतात.

आपल्या स्नायूंची ताकद वापरली नाही तर कमी कमी होत जाते. त्यांना शैथिल्य येते. तसेच मेंदूचा वापर न वापर केल्याने मेंदूची कार्यक्षमता कमी होत जाते. मेंदूचा योग्‍य वापर केल्‍याने वार्धक्‍यातही काही मर्यादेत मेंदूचा -हास  थांबवता येतो हाच मेंदूविषयक नव्‍या संशोधनाचा निष्‍कर्ष आहे.

ेंदू विकार तज्ञ आणि मानसशास्‍त्राच्‍या संशोधनानुसार कमी शैक्षणिक पातळीमुळे मेंदूचे वार्धक्य लवकर येते. सामान्यपणे अशा व्यक्तींच्या मेंदूची कार्यक्षमता फारशी वापरली जात नाही. तर उच्च शिक्षणामुळे मेंदूचे वार्धक्य काही मर्यादेत तरी दूर रहाते. कारण उच्चशिक्षित व्यक्तींच्या मेंदूतील मज्जापेशी व त्यांच्यातील 'जोड' मजबूत असतात. त्यामुळे त्यांच्यातील वार्धक्याची प्रक्रिया लांबते.
आपल्या मेंदूचे कार्य मृत्यूपर्यंत अव्याहतपणे म्हणजे आपण अगदी झोपेत असताना देखील सुरुच असते. मेंदूव्‍दारे विचार करणे, आपल्‍या हालचालींचे नियंत्रण करणे इतकेच नव्हे तर पचन व श्वसन इ. शारीरिक क्रियादेखील पार पाडल्या जातात.
आपल्या स्मृतीला इतर अवयवांप्रमाणे भौतिक अस्तित्व नसते. मेंदूतील आठवण्याच्या प्रक्रियेला स्मृती असे म्हटले जाते. विचार करणे ही प्रक्रियादेखील मेंदूतील मज्जापेशींद्वारेच घडते पण ती नुसत्या आठवण्याच्या प्रक्रियेपेक्षा जास्‍त जटील किंवा गुंतागुंतीची असू शकते.  स्मृती ही आपल्या मेंदूतील विशिष्ट भागातच साठवली जात असावी असा समज होता. पण मेंदूविकार तज्ज्ञ (न्यूरॉलॉजिस्ट) तसेच संज्ञानात्मक मानसशास्त्रीय (कॉग्रिटिव्ह सायकॉलॉजी) संशोधनानुसार हा समज काही खरा नाही असे आता लक्षात आलेले आहे. स्मृती साठवण्याच्या प्रक्रियेत मेंदूचे सर्वच भाग सक्रीय असतात असे लक्षात आलेले आहे. मेंदूच्या एका भागाला इजा झाली तरी स्मृतीचा थोडा अनुभव इतर भागातही शिल्लक राहिलेला असतो. 
स्‍मृती ही मेंदूतील मज्‍जापेशींच्‍या प्रणालींच्‍या अनेक गटांद्वारे बनलेली असते. त्यातील प्रत्येक प्रणाली स्मृतीची निर्मिती, साठवण व पुन्हा आठवणे असे विविध कार्य करते. मेंदू जेव्हा माहितीवर प्रक्रिया करतो तेव्हा या सगळ्या प्रणाल्या मिळून एक विचार निर्माण करतात. 
स्मृती निर्मितीच्या प्रक्रियेत सर्वात प्रथम आपल्या ज्ञानेंद्रियांच्या (नाक, कान, जीभ, डोळे, त्वचा) द्वारे आपल्या मेंदूला ज्या संवेदनांचे आकलन होते, ती अल्पकालीक म्हणजे काही मिलीसेकंद (एक मिली सेकंद म्हणजे एक सेकंदाचा हजारावा भाग) टिकणारी स्मृती असते. 
त्यापेक्षा जास्त काळ टिकणारी स्मृती म्हणजे लघुकालीक स्मृती असते ती वीस ते तीस सेकंद टिकणारी असते. लघुकालिक स्मृती छोट्या तुकड्यात विभागून लक्षात लघुकालीक स्मृती महत्वाची असेल तर तिची दीर्घकालीक काँटॅक्स या भागांची मदत होते. दीर्घकालीक स्मृती आयुष्यभर टिकू शकते. दीर्घकालीक स्मृतीच्या निर्मितीसाठी काही तास, दिवस, महिने, वर्ष देखील लागू शकतात. मेंदूत दीर्घकालीक स्मृती साठविण्यासाठी अफाट क्षमता असते. एखाद्या संगणकाप्रमाणे मानवाच्या मेंदूची स्मृती क्षमता (स्टोरेज स्पेस) संपली असे कधीच घडत नाही! 
दीर्घकालीक स्मृतीचे उद्घोषित स्मृती व उद्घोषित नसणारी म्हणजे सूचक स्मृती असे दोन प्रमुख प्रकार असतात. 
उद्घोषित स्मृतीचे घटनास्मृती, शब्दार्थाची स्मृती, भविष्यकालीन घटनासंदर्भातली संभाव्य स्मृती, भूतकालीन स्‍मृती व्‍यक्‍तीच्‍या संदर्भातली स्‍मृती असे प्रकार असतात. दीर्घकालीक स्मृती ही मुद्दाम आठवावी लागते. तसेच ती विसरलीही जाऊ शकते. 
उद़घोषित नसणारी (Non declarative) म्‍हणजे सूचक स्मृती मात्र विसरली जात नाही. कारण एकदा सरावाने आत्मसात केलेली कला किंवा कौशल्य काही वर्षांनीसुद्धा शर्टाची बटणे लावणे इ. गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी फारसा विचार करावा लागत नाही. 
आपल्या दीर्घकालीक स्मृतीला (long term memory) ‘मज्जातंतूंनी अनेक मज्जापेशींशी (भागांशी) जोडलेले गुंतागुंतीचे जाळे असे म्‍हणता येईल उदाहरणार्थ मोटर सायकल चालवायची स्मृती असली तरी त्यात मेंदूतील अनेक क्षेत्रे भाग घेतात. ती कशी चालवायची म्हणजे सुरू कशी करायची, गियर कसा टाकायचा, ब्रेक कसा लावायचा या प्रक्रियेची स्मृती एका मज्जापेशी गटाकडून येते. मोटर सायकल दुसरीकडे कुठल्या मार्गाने न्यायची ह्याची स्मृती वेगळ्या मज्जापेशी गटाकडून येते. तर सुरक्षा नियमांची स्मृती तसेच एखादा भरधाव ट्रक फारच जवळून गेला तर जी भीतीची जाणीव होते त्या जाणिवेची स्मृती इ. स्मृती मेंदूतील भिन्न मज्जापेशीगटांकडून येतात. हे वेगवेगळे बौद्धक अनुभव असल्याची किंवा ते मेंदूतील भिन्न भागांकडून येत असल्याची आपल्याला जाणीवही होत नसते. मोटर सायकल चालवितानाच्या दृष्य, ध्वनी, शब्द, भावना इ. विषयक स्मृतीचा भाग पुन:पुन्हा वापरला जातो. दरवेळेस मोटर सायकल चालवताना जुनी स्मृती पुन्हा सक्रीय होते. त्यात नव्या अनुभवांची भरही पडते. 
आपला मेंदू हा कवटीत सुमारे सव्वा लीटर पाणी मावेल इतक्या लहानशा जागेत मावतो. त्याचे वजन सरासरी अवघे  दिड किलोग्रॅम इतके असते. इतक्‍याक्ष्‍या मेंदूत सरासरी शंभर अब्ज मज्जापेशी (न्यूरॉन्स) असतात तसेच त्यांना आधार व संरक्षण देणा-या संख्येने तितक्याच ग्लायल पेशी (Glial cells) असतात. मज्जापेशी म्हणजेच चेतापेशी हा आपल्या मज्‍जासंस्‍थेचा तसेच मेंदूचा मुलभूत घटक असतो. मज्‍जापेशी विदयुत रासायनिक संदेशाचे आदान प्रदान करतात.  
मेंदूतून पाठीच्या कण्यात जाणारा मज्जारज्जू देखील मज्जापेशींनी बनलेला असतो. मज्जारज्जूतून बाहेर पडून घटकांचा आपल्‍या शरीरभर पसरले्ल्‍या मज्‍जातंतूंच्‍या जाळयाव्‍दारे शारीरिक क्रियांचे मेंदूव्‍दारे नियंत्रण होते.  
मज्‍जापेशींचे शरीरातल्‍या इतर काही प्रकारच्‍या पेशींप्रमाणे विभाजन होवून त्‍यांची संख्‍या वाढत नाही. जन्‍मतः मेंदूत असणा-या मज्‍जापेशी आयुष्‍यभर सामान्‍यतः तितक्‍याच राहातात. वार्धक्‍य, प्राणवायूचा अभाव, रक्‍तप्रवाहातील अडथळा रक्‍त वाहीनी फूटणे, अपघाती इजा यामुळे मज्‍जापेशी अकार्यक्षम किंवा मृत होवून व्‍यक्‍तीत अशक्‍तपणा, बोलणे बंद होणे, अर्धांगवाहू असे विकार होवू शकतात. वयाच्‍या तिस-या वर्षापर्यंत त्‍यांच्‍या आकाराची 80 टक्‍के वाढ पूर्ण होते. जन्‍मतः अनुवंशिक घटकांच्‍या मेंदूच्या विकासात वाटा असला तरी जीन्स (Genes) द्वारे होणारे लहानपणीचे मेंदूच्या रचनेतले बदल अंतिम नसतात. लहान वयात पर्यावरणातील घटकाच्‍या प्रभावानुसार मेंदूतील मज्जापेशींच्या जोडणीत बदल घडतात. 
जन्मतः सर्वसामान्य स्मृतिक्षमता असणारी व्यक्ती दीर्घ प्रयत्नांनी एखादया विषयाची खोलवर माहिती आत्मसात करून दीर्घकालीक स्मृतिक्षमता विकसित करू शकते. स्मरणशक्तीच्या एका प्रकारात अत्यंत कुशल असणारी व्यक्ती इतर प्रकारात अत्यंत सर्वसामान्य असू शकते. 
आपल्या मेंदूतील सर्व मज्जापेशी ह्या त्यांच्यातून बाहेर निघालेल्‍या तंतूसारख्‍या रचनेने एकमेकींशी जोडल्‍या गेलेल्‍या असतात. एक मज्जापेशी ही इतर दहा हजार मज्जापेशींशी 'जोडली' जाऊ शकते. मात्र मज्जापेशींचे तंतू प्रत्यक्षात जोडबिंदूवर स्‍पर्श करीत नाहीत मज्‍जापेशींच्‍या जोडबिंदूवर (Synapse) अतिसूक्ष्म रिकामी जागा (Gap) असते. या जोडबिंदूचा उपयोग मज्‍जापेशीत माहितीचे आदानप्रदान करण्यासाठी होतो. माहितीवाहक विद्युतरासायनिक संदेश हे जोडबिंदू ओलांडून पुढे जातात. मानवी मेंदूत एक ते एक हजार ट्रिलीयन (U.S.) जोडबिंदू असतात. (एक ट्रेलियन म्हणजे एकावर बारा शून्ये इतकी संख्या) 
मज्जापेशींभोवतीच्या आवरणातून सोडियम, पोटॅशियम, क्लोराईड व कॅल्शियमच्या आयनांची हालचाल (Diffusion होवून त्याद्वारे विद्युतरासायनिक संदेश निर्माण होऊन त्याद्वारे मज्जापेशींत माहितीचे दळणवळण घडून येते मज्‍जापेशींच्‍या संदेशवाहनात ग्‍लुटामेट तसेच GABA ही दोन प्रमुख अमिनो आम्ले तसेच अॅसिटल सेरोटोनिन, मेलाटोनिन ही रसायनेदेखील सक्रीय भाग घेतात. मज्जापेशींत निर्माण होणारी ही रसायने (न्यूरोट्रान्समिटर्स) मज्जापेशींच्या जोडबिंदूवर सोडली जातात. ती संदेशाचे विवर्धन, नियमन (Modulation) घडवतात तसेच मज्जापेशींभोवतीच्या आवरणाची प्रवेशक्षमता (पार्यता) बदलवतात. 
मज्जापेशींमधले जोडबिंदू'स्थिर (Static) नसतात. प्रत्येक वेळी नवे ज्ञान, अनुभव तसेच माहिती मेंदूत साठविताना मज्जापेशींतील जोडणीत बदल होऊन माहिती आठवण्याचा सराव जितका जास्त केला जातो तितके मज्जापेशींतले जोड मजबूत होत जातात. सरावाने माहिती आठवण्यातल्या चुका कमी होत जातात व माहिती आठवण्याचा वेग वाढतो. 
मानव ज्या पद्धतीने स्मृती निर्माण करून ती मेंदूत ठेवतो ती पद्धत संगणकातल्या स्मृती प्रमाणे नसते. त्यामुळे मानवी मेंदूची तुलना संगणकाशी करणे योग्य ठरत नाही. पण तरीही मायक्रोचिप्प्स वापरून मानवी मेंदू इतक्या स्मृती क्षमतेचा संगणक तयार करायचा झाल्यास चार खोल्यांच्या आकाराचा महासंगणक निर्माण करावा लागेल व तो चालविण्यासाठी एक छोटे ऊर्जा केंद्रच उभारावे लागेल! त्याच्या स्मरण शक्तीची क्षमता एक ते एक हजार टेराबाईट इतकी असेल! आपल्या करण्यास कठीण आहे. त्यामुळे मानवाइतक्या क्षमतेचा यंत्रमानव अजूनही कुणाला बनवता आलेला नाही. 
मानवी मेंदूची स्मृतिक्षमता अफाट आहे. पण करायला हवा तितका मेंदूचा वापर न केल्याने आपल्याला तिचा प्रत्यय येत नाही. आयुष्यभर उच्च प्रतीचे बौद्धक काम करणारी व्यक्तीदेखील स्वतःच्या मेंदूच्या अगदी अल्प (एक दशांशापेक्षाही कमी) स्मृतिक्षमतेचा वापर करते असे म्हटले जाते. 
मेंदूचा आणि कौशल्यांचा सतत वापर केल्याने आपली स्मृती तसेच बुद्धमत्ता वाढत जाते. बुद्धमत्ता ही आनुवंशिक देणगी नाही.

स्त्रोत : शिक्षण संक्रमण

अंतिम सुधारित : 8/3/2020

© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate