অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

रसिकराज नेहरूं

नेहरूंसारख्या रसिकराज व्यक्तीच्या सुसंस्कृत जीवनात केलेला, सौंदर्यपूजेला व नैतिकतेला महत्त्व होते. निसर्गसौंदर्याबरोबरच त्यांना चित्रकला, शिल्पकृती, सुंदर इमारती यांची आवड होती. संगीताचीही आवड होती. आपल्या अनेक सवड काढून नृत्यांना व जलशांना उपस्थित राहत कलादर्शनाचा आनंद उपभोगीत असत. नेहरूंना अनेक इंग्रजी व उर्दू कविता तोंडपाठ होत्या. मौलाना आझाद हयात होते तोपर्यंत दिवसभराचे काम संपल्यानंतर एकत्र येत व काव्यरसात डुबून जात.

नेहरूच्या राजकीय जीवनाशीच फक्त परिचय आहे त्यांना नेहरूना राजकारणापलीकडे इतर काही जीवन आहे, आवडीनिवडी आहेत, छंद आहेत याची कल्पना येत नाही. परंतु नेहरूच्या जीवनात थोडसच का होईना पण इतर अनेक गोष्टींना अत्यंत महत्त्वाचे स्थान होते त्यापैकी रसिकता ही एक.

गुलाबाचे फूल

नेहरूंच्या रसिकतेचे पहिले उदाहरण म्हणून देता येईल की ते म्हणजे तुम्हा-आम्हा सर्वांना माहीत असलेले नेहरूंच्या कोटाच्या बटनहोल मधील कोमल व टवटवीत असे गुलाबाचे फूल. राजकीय संघर्षाच्या धकधकीत तो गुलाब नकळत पायदळी पडून चुरडला गेला नाही. स्वातंत्र्य लढ्याच्या धगधगत्या होमकुंडात तो होरपळला नाही. राजकीय पराजयाच्या धगीने तो सुकून गेला नाही. पंतप्रधान या नात्याने देशाच्या व जगाच्या अनेक चिंता नेहरूना सतत लागत असतानाही तो गुलाब कोमेजला नाही. नेहरूंच्या वार्धक्यातही तो निर्माल्य झाला नाही. तो रसिकतेचा गुलाब नेहरुच्या अंत:करणात अखेरपर्यंत बहरत राहिला व सुगंध दरवळत राहिला.

रंगभूमीचे अत्यंक आकर्षण

नेहरूंना रंगभूमीचे अत्यंक आकर्षण होते. मुंबईच्या ब्राह्मणसभेमध्ये मार्फत कालिदासाच्या शाकुंतला या संस्कृत नाटकाचा प्रयोग दिल्ली येथे होता. एका अंकापुरते उपस्थित राहण्याचे नेहरूंनी कबूल केले होते. परंतु कालिदासाच्या थोर प्रतिभेचा मूर्तीमंत अविष्कार प्रत्यक्ष पाहताच नेहरू इतके मंत्रमुग्ध झाले की संपूर्ण नाटक पाहत राहिले व नंतर प्रत्येक कलाकारास स्वहस्ते गुलाब पुष्पे देऊन गौरव केला. हा प्रसंग म्हणजे कलाप्रिय व रसिकराज नेहरू यांच्या अभिजात कलासक्तीचे उदाहरण होय.

राजकारणाच्या व्यापामधून जेव्हा क्षणभरही संधी व सवड मिळेल तेव्हा नेहरू अंत:करणातील रसिकतेच्या उमींना वाव करून देत असत. ते काश्मीरला जात तेव्हा तेथील निसर्गसौंदर्याने त्याचे भान हरपत असे काश्मीरमधील निसर्गरम्य वर्णने नेहरूनी आपल्या लिखाणात केली. आहेत. ख-या निसर्गसौंदर्य पूजकाची वृत्ती व दृष्टी स्थलकालातील असते. नेहरूही त्याला अपवाद नव्हते. निसर्ग सौंदर्याच्या सान्निध्यात त्यांचे मन प्रफुल्लीत व चैतन्यशील होत असे.

सौंदर्यपूजेला व नैतिकतेला महत्व

नेहरूसारख्या रसिकराज व्यक्तीच्या सुसंस्कृत जीवनात केलेला, सौंदर्यपूजेला व नैतिकतेला महत्व होते. निसर्गसौंदर्याबरोबरच त्यांना चित्रकला, शिल्पकृती, सुंदर इमारती यांची आवड होती. तसेच संगीताचीही आवड होती. आपल्या अनेक कार्यातून सवड काढून नृत्यांना व जलशांना उपस्थित राहत व कलादर्शनाचा आनंद उपभोगीत असत. नेहरूंना अनेक इंग्रजी व उर्दू कविता तोंडपाठ होत्या. मौलाना आझाद हयात होते तोपर्यंत दिवसभराचे काम संपल्यानंतर एकत्र येत व काव्यरसात डुबून जात.

सर्व कलांचे ते मनोमन भोक्ते होते. सर्व कलांचे त्यांना वेष परिधान केलेल्या स्त्री-पुरुषांचे नृत्य पाहताना त्यांचे मन हरखुन जात असे. एखादया वेळी त्‍यांच्‍याबरोबर नाचू लागत. होळीच्या वेळी हे पंतप्रधान रंग उडविण्यात व गुलाल उधळण्यात दंग होऊन जात.

नेहरूच्या रसिकतेचे वर्णन करावे तेवढे थोडेच आहे. सर्व कलांप्रमाणे त्यांना खेळांची आवड होती. संधी मिळताच कामातून सवड काढून ते बॅडमिंटन खेळत. मुंबईत, दिल्लीत असणा-या सामन्यांना ते उपस्थित राहत. क्रिकेटची त्यांना आवड होती. १९५१ सालात म्हणजे वयाच्या ६२ व्या वर्षी क्रिकेटच्या सामन्यात भाग घेऊन, बॅटिंग करताना दाखविलेली चपळाई पाहून सर्वजण थक्क झाले. एकदा तर इंग्लंड व भारत यांच्यामधील सामना प्रकृती बरी नसताना तासन्तास पहात बसले होते. याशिवाय काही कामानिमित्त घोड्यावरून जात व आपली घोड्यावरून रपेट मारण्याची हौस भागवून घेत असत. तसेच वेळ काढून आपली पोहण्याची मनिषा तृप्त करून घेत. नेहरूंना युरोपमधील आल्प्स व भारतातील हिमालय पर्वताच्या उतारावरील बफांवरून घसरगुंडी करण्याच्या खेळाचाही विलक्षण शौक होता. हा खेळ खेळताना दोनदा त्यांच्या जीववर बेतले होते; पण साहसी वृत्तीच्या नेहरूंना त्याची कधी पर्वा वाटली नाही. केंब्रिज येथील विदयापीठात शिकत असताना नौकांच्या शर्यतीतही भाग घेत असत.

या सर्व गोष्टींबरोबर नेहरूंना लहान मुलांच्या मेळाव्यात विलक्षण आनंद मिळत असे. तसेच विविध पशु-पक्ष्यांची व वाघ वगैरे भेटी पाठवित. स्वतःच्या घरी दोन रुबाबदार कुत्री पाळली होती. रोज स्वत:च्या हातांनी घास भरविल्याशिवाय नेहरूंच्‍या दैनंदिन कार्याक्रमाला सुरूवात होत नसे.

नेहरूंनी आपल्या मृत्यूपत्रात प्रकट केलेली उदात व हृदयद्रावक अंतिम इच्छा एखादया महाकवीला साजेशी आहे. त्‍यांचे सारे जीवनच काव्‍यमय वृत्‍तीने भरलेले होते.  नेहरूंची रसिकता केवळ विशिष्‍ट क्षेत्रापुरती मर्यादित नव्‍हती. रंग रूप गंध स्‍पर्श रूची ध्‍वनी शब्‍द विचार भावना इत्यादी विविध प्रकारचे सौंदर्य या जगामध्ये आहे त्या सर्वांचा

कलापर्यंत व खेळापर्यंत सर्व क्षेत्रामध्ये नेहरूचे सर्वव्यापी रसिकतेचे रम्य दर्शन होत असे. नेहरूंच्या व्यक्तिमत्वातून, वक्तृत्वातून, लिखाणातून नि त्यांच्या आचरणातून त्यांच्या रसिकतेचा अविष्कार होतो. नेहरूंच्या निधनामुळे केवळ एक राजकीय मुत्सद्दी, जागतिक शांततेचा अग्रणी नि एक विद्वानच नव्हे तर एक खराखुरा रसिकराज हरपला.

लेखिका : रोहिणी सदाशिव शिकें, सातारा

स्त्रोत : शिक्षण संक्रमण , जानेवारी २०१७

अंतिम सुधारित : 7/31/2023



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate