औरंगाबाद जिल्ह्यातील ते तीर्थक्षेत्र बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. औरंगाबादपासून सु. ३० किमी. वेरूळ गावाजवळ महिषाद्रीच्या पायथ्याशी येलगंगा नदीतीरी घृष्णेश्वराचे सुंदर मंदिर आहे.
ते लालसर घोटीव दगडांचे असून गाभाऱ्यात काळ्या पाषाणाचे शिवलिंग आहे. मंदिराच्या शिखरावर, छतावर आणि मंडपाच्या खांबांवर सुंदर नक्षी, सुरेख मूर्ती व चित्रे आहेत. मंदिराच्या प्रशस्त प्रांगणाभोवती उंच कोट असून जवळच शिवालयतीर्थ हे बांधीव प्रशस्त तळे आहे.
राष्ट्रकूट वंशातील कृष्णराजाने बांधलेल्या मूळ मंदिराचा आणि शिवालयतीर्थांचा १५९९ मध्ये वेरूळचे पाटील मालोजी भोसले यांनी जीर्णोद्धार केला, परंतु पुढे औरंगजेबाने त्याचा विध्वंस केला.
मल्हारराव होळकरांची पत्नी, गौतमाबाई हिने १७३० मध्ये सध्याचे मंदिर बांधले आणि अहिल्याबाईने १७६९ मध्ये शिवालयतीर्थ पुन्हा बांधले. प्रतिवर्षी शिवरात्रीला येथे मोठी यात्रा असते.
कांबळे, य. रा.
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 10/7/2020
दारनाथ: उत्तर प्रदेशाच्या मध्य कुमाऊँ भागातील अखिल...
नाशिक-पेठ रस्ता वा नाशिक-दिंडोरी रस्त्यावरूनही जात...
आळंदी : महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध तीर्थक्षेत्र. हे...
परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर शहराजवळ वसलेल्या नेमगिर...