অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

जागतिक - बंदरे व आखात

जागतिक - बंदरे व आखात

  • अर्कांगेलिस्क
  • अर्कांगेलिस्क : रशियाच्या अर्कांगेलिस्क प्रांताची राजधानी व महत्त्वाचे बंदर. लोकसंख्या ३,४३,००० (१९७०). उत्तरेस श्वेत समुद्राला मिळणाऱ्‍या उत्तर द्वीना नदीच्या त्रिभुजप्रदेशात उजव्या तीरावर हे वसले असून समुद्रापासून ४० किमी. आत आहे.

  • अलेक्झांड्रिया
  • अलेक्झांड्रिया : ईजिप्तचे प्रमुख बंदर व उन्हाळी राजधानी. लोकसंख्या २०,३२,००० (१९७० अंदाज). ३१०१२' उ. अक्षांश, २९०५४' पू. रेखांश. हे कैरोच्या वायव्येस २०६ किमी., नाईलच्या एका फाट्याच्या मुखाशी, मार्यूत सरोवर आणि भूमध्य समुद्र यांमधील भूशिरावर वसलेले आहे. इ.स.पू. ३३२ मध्ये अलेक्झांडरने हे स्थापले.

  • अ‍ॅक्रा
  • अ‍ॅक्रा : घाना देशाची राजधानी व अटलांटिक महासागरावरील महत्त्वाचे बंदर. लोकसंख्या ६,६३,८८० (१९७०). ५°३१' उ. व ०°१२' प. गिनी आखातावरील पूर्वीच्या गोल्डकोस्ट भागातील हे ठिकाण. येथे सोळाव्या शतकात पोर्तुगीजांनी व्यापाराकरिता किल्ला बांधला. सतराव्या शतकात डच, डेनश, फ्रेंच व इंग्‍लिश लोकांनी आपापले किल्ले बांधून व्यापारी ठाणी वसविली.

  • अ‍ॅडिलेड
  • अ‍ॅडिलेड : ऑस्ट्रेलियातील चौथ्या क्रमांकाचे शहर व प्रमुख बंदर, साउथ ऑस्ट्रेलिया राज्याची राजधानी. लोकसंख्या ८,४२,६९३ (१९७१). पुलिनमय मैदानावर वसलेले अ‍ॅडिलेड पूर्वेकडून मौंट लॉफ्टी पर्वतश्रेणींनी व पश्चिमेकडून सेंट व्हिन्सेंट आखाताच्या वालुकामय किनाऱ्याने वेष्टिलेले आहे.

  • अ‍ॅमॉय
  • अ‍ॅमॉय : चीनच्या आग्नेयीकडील फूक्येन प्रांतातील महत्त्वाचे औद्योगिक व व्यापारी शहर व बंदर. पूर्वीचे नाव 'सूमिंग' व सध्याचे चिनी भाषेतली 'श्यामेन'. लोकसंख्या ३,०८,००० (१९६४). फॉर्मोसा सामुद्रधुनीमधील अ‍ॅमॉय उपसागरात, लुंग ज्यांग नदीच्या मुखापासून १६ किमी. अंतरावरील सु. ११६ चौ. किमी. क्षेत्रफळाच्या बेटावर हे शहर वसले आहे.

  • अ‍ॅस्ट्राखान
  • अ‍ॅस्ट्राखान : रशियातील अ‍ॅस्ट्राखान प्रांताची राजधानी व कॅस्पियन समुद्रावरील प्रमुख बंदर. लोकसंख्या ४,११,००० (१९७०). हे व्होल्गा नदीच्या दक्षिण तीरावर, तिच्या त्रिभुजप्रदेशाच्या शिरोभागी, मुखापासून ८८किमी. आत समुद्रसपाटीखाली सु. १५ मी. आहे.

  • आंतोफागास्ता
  • आंतोफागास्ता : चिलीमधील त्याच नावाच्या प्रांताचे मुख्य शहर व पॅसिफिक किनाऱ्यावरील चिलीचे महत्त्वाचे बंदर. लोकसंख्या सु. १,२५,०८१ (१९७०). शहराचे हवामान सम असले, तरी येथे पाऊस जवळजवळ नाहीच.

  • इंचॉन
  • दक्षिण कोरियाचे प्रसिद्ध बंदर व औद्योगिक केंद्र.

  • इराणचे आखात
  • इराणचे आखात : पर्शियन गल्फ. अरबी समुद्राचा इराण व अरबस्तान ह्यांमधील फाटा. क्षेत्रफळ १,४४,८४० चौ. किमी., एकूण किनारा ३,२१९ किमी. प्राचीन नाव सायनस पार्सिकस; फार्सी खलिज-इ-फार्स आणि अरबी खलिज-अल्-अजम.

  • इस्तंबूल
  • इस्तंबूल : कॉन्स्टँटिनोपल. तुर्कस्तानचे सर्वांत मोठे शहर आणि महत्वाचे बंदर. लोकसंख्या २३,१२,७५१ (१९७०). काळा समुद्र आणि मार्मारा समुद्र यांना जोडणाऱ्या बॉस्पोरसच्या सामुद्रधुनीने यूरोप आशियापासून विभक्त झाला आहे;परंतु इस्तंबूल सामुद्रधुनीच्या दोन्ही बाजूंस पसरल्याने त्याची दोन्ही खंडांत गणना होते.

  • एडनचे आखात
  • आफ्रिकेतील गार्डाफूई भूशिर व अरबस्तानातील दक्षिण येमेनचा किनारा यांदरम्यान हा फाटा आत शिरला असून तो तांबड्या समुद्राला बाब-एल्-मांदेब ह्या सामुद्रधुनीने जोडला आहे.

  • ओडेसा
  • ओडेसा : रशियाच्या युक्तेन सोव्हिएट प्रजासत्ताकाचे काळ्या समुद्रावरील महत्त्वाचे बंदर. लोकसंख्या ९,४१,००० (१९७२). हे कीएफच्या दक्षिणेस ४४० किमी. असून येथे कृषी अवजारे, वाहतूक, छपाई, अन्नप्रक्रिया; लेथ, याऱ्या यांची सामग्री, मोटारींचे सुटे भाग जुळविणे; तेलशुद्धीकरण; पीठ, साखर, फळे, कातडी, गोण्या, दोर इत्यादींवरील प्रक्रिया; सुपरफॉस्फेट, आयोडीन, लिनोलियम, पोलादी दोर, पादत्राणे, कपडे यांचे कारखाने आहेत.

  • कुरिया मुरिया
  • ओमानची अरबी समुद्रातील पाच खडकाळ बेटे. एकूण क्षेत्रफळ ७२ चौ. किमी.

  • कॅन
  • कॅन : फ्रान्सच्या आग्‍नेय भागातील बंदर.लोकसंख्या ६७,१५२ (१९६८).आल्प्स मॅरिटाइम प्रांतातील हे बंदर नीसच्या नैर्ऋत्येस२ ९किमी.असून फ्रेंच रिव्हिएरा मधील हवा खाण्याचे प्रसिद्ध ठिकाण आहे.

  • कॅसाब्लांका
  • कॅसाब्लांका : (अरबी अल्‌ बीदा) मोरोक्कोचे अटलांटिक किनाऱ्यावरील महत्वाचे बंदर व सर्वात मोठे शहर. लोकसंख्या १५,०६,३७३ (१९७१). राबात व मॅझागॅन ह्यांमधील लहानशा उपसागराच्या तोडांशी हे वसले आहे. तेराव्या शतकात हे मच्छीमारी खेडे होते.

  • केअर्न्झ
  • ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँड राज्याच्या ईशान्येस वसलेले बंदर. लोकसंख्या ३१,२५० (१९७२). हे ब्रिस्बेनच्या वायव्येस रेल्वेने १,३७७ किमी.

  • केप ऑफ गुड होप
  • आफ्रिकेच्या दक्षिणेचे सुप्रसिद्ध भूशिर. हे छोटेसे द्वीपकल्प टेबल मौंटनच्या दक्षिणेस असून, त्याच्या पूर्वेस फॉल्स बे आखात आहे.

  • कॉन्स्टांट्सा
  • कॉन्स्टांट्सा : रुमानियाचे काळ्या समुद्रावरील महत्त्वाचे बंदर. लोकसंख्या १,६१,६२७ (१९६८). हे बूखारेस्टच्या पूर्वेस २०० किमी., डॅन्यूब नदीच्या त्रिभुजप्रदेशाच्या दक्षिणेस ९६ किमी. आहे.

  • कोलंबो
  • कोलंबो : श्रीलंकेची (सीलोन) राजधानी, उत्कृष्ट कृत्रिम बंदर व गजबजलेले व्यापारी केंद्र. लोकसंख्या ५,६२,१६०(१९७१); उपनगरांसह ७,६३,०६४ (१९६३). हे पश्चिम किनाऱ्यावर केलानी नदीमुखाशी वसले आहे. येथील हवामान उष्ण व दमट असून कमाल व किमान तपमानात फरक थोडा आहे. येथे पाऊस सरासरी २३० सेंमी. पडतो. डिसेंबर ते फेब्रुवारी हवा आल्हाददायक असते.

  • चोलॉन
  • चोलॉन : दक्षिण व्हिएटनाममधील प्रमुख नदीबंदर. लोकसंख्या सु. ४ लक्ष (१९७२). हे महत्त्वाचे व्यापारी आणि निर्मितिउद्योग केंद्र डॉन्गनाय नदीवर सायगावच्या नैर्ऋत्येस सु. ५ किमी.वर वसलेले आहे. फ्रेंचांच्या अंमलाखाली (१८८३—१९५४) याची भरभराट झाली.

  • चौल
  • चौल : चेऊल. कुलाबा जिल्ह्याच्या अलिबाग तालुक्यातील एक ऐतिहासिक बंदर. लोकसंख्या ८,१५० (१९७१). शिलाहार राजांच्या राजधानीचे हे ठिकाण कुंडलिका नदीच्या मुखावर (रोहा खाडीवर), मुंबईच्या दक्षिणेस सु. ५६ किमी., अलिबाग—रेवदंडा मोटार रस्त्यावर आहे.

  • जाफना
  • जाफना : श्रीलंकेचे वायव्येकडील दुसऱ्या क्रमांकाचे शहर आणि बंदर. लोकसंख्या १,०७,६६३ (१९७१). हे जाफना द्विपकल्पात अनुराधपुरच्या उत्तरेस सु. १५५ किमी.वर वसले आहे. इ. स. पू. दोनशे वर्षे तमिळ लोक दक्षिण भारतातून येऊन येथे स्थायीक झाले व अद्यापिही ते या शहरात बहुसंख्येने आहेत.

  • जूनो
  • जूनो : अलास्काची राजधानी व बंदर. लोकसंख्या १३,५५६ (१९७०). १९७० मध्ये डग्लस बेट याच्याशी संयुक्त झाल्यामुळे हे अमेरिकेतील क्षेत्रफळाने सर्वांत मोठे ८,०५० चौ. किमी. शहर बनले.

  • झांझिबार शहर
  • झांझिबार शहर : टांझानियाच्या झांझिबार बेटाचे कारभाराचे ठाणे व व्यापारी बंदर. लोकसंख्या ६८,४९० (१९६७ अंदाज). बेटाच्या पश्चिम किनाऱ्यावरील हे नैसर्गिक, सुरक्षित व खोल बंदर असून येथून मुख्यतः लवंगा, खोबरे, खोबरेल तेल व कच्छ वनस्पतीची साल निर्यात होते.

  • झाइडर झी
  • झाइडर झी : ( दक्षिणेकडील समुद्र). नेदर्लंड्‌सच्या उत्तर किनाऱ्यावरून आत दक्षिणेकडे शिरलेले उत्तर समुद्राचे एक आखात. क्षेत्रफळ सु. ३,७०४ चौ.किमी. याच्या शाखा फ्रीझ्‌लँड, ओव्हराइसल, गेल्डरलँड, उत्रेक्त व नूर्ड हॉलंड ह्या नेदर्लंड्‌सच्या जिल्ह्यांत खोलवर शिरल्या आहेत.

  • टॅरँटो
  • टॅरँटो : प्राचीन–तारास, टरेन्टम. इटलीच्या आप्यूल्या विभागातील याच नावाच्या प्रांताचे मुख्य ठिकाण व इटलीचे एक उत्तम बंदर. लोकसंख्या २,३६,३६४ (१९७१). हे टॅरँटो आखाताच्या उत्तर फाट्यावर मुख्य भूमी आणि जवळचे एक बेट यांवर मिळून वसलेले असून बारीच्या दक्षिण आग्नेयीस ८० किमी. आहे.

  • ट्रीएस्ट
  • ट्रीएस्ट : इटलीच्या ईशान्य भागातील ट्रीएस्ट प्रांताची राजधानी व एड्रिअ‍ॅटिक समुद्रावरील बंदर. लोकसंख्या २,७२,४२३ (१९७३). हे व्हेनिसच्या ईशान्येस ११२ किमी. आहे.

  • ट्रेंटन
  • ट्रेंटन : अमेरिकेच्या न्यू जर्सी राज्याची राजधानी. लोकसंख्या १,०४,६३८ (१९७०); महानगरी २,७४,१४८. हे औद्योगिक महानगर कॅमडेनपासून ४८ किमी. डेलावेअर नदीच्या नोव्हनसीमेवरील चांगले बंदर आहे. कालवे व आगगाडी यांमुळे शहराची झपाट्याने वाढ झाली.

  • डंकर्क
  • डंकर्क : उत्तर फ्रान्सच्या नॉर प्रांतातील डोव्हर सामुद्रधुनींवरील महत्त्वाचे तिसऱ्या क्रमांकाचे बंदर व औद्योगिक शहर. ते कॅलेच्या ईशान्येस ३७ किमी. आणि लीलच्या वायव्येस सडकेने ७९ किमी. आहे. लोकसंख्या २७,५०४ (१९६८). लील, तूर्क्वीं, रूबे यांसारख्या औद्योगिक शहरांकरिता हेच सोयीचे बंदर आहे.

  • डायरेन
  • डायरेन : (दाल्येन). चीनमधील एक प्रसिद्ध बंदर. ते दक्षिण मँचुरियात लीआउडुंग द्वीपकल्पाच्या दक्षिण टोकावर पोर्ट आर्थरच्या ईशान्येस सु. ३८ किमी. वर वसले आहे. ह्या बंदराचा परिसर सुपीक व समृद्ध असून ह्या भागास चिनी भाषेत ‘लूटा’ म्हणतात.

    © C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
    English to Hindi Transliterate