रशियातील व्होल्गा नदीची प्रमुख उपनदी. लांबी सु.२,०२० किमी. उरल पर्वताच्या नैर्ऋत्येकडील उद्मुर्त प्रांतात उगम पावून, ती कझॅनच्या दक्षिणेला ७० किमी. वर व्होल्गा नदीला मिळते.
ह्या नदीला उजवीकडून ओब्व्हा, ईझ, व्ह्याट्का व डावीकडून व्हीशिर, चूसवाया आणि बेलाया ह्या नद्या मिळतात.
ईझखेरीज बाकी सर्व उपनद्या जलवाहतुकीला उपयोगी आहेत. ह्या नदीच्या काठी पर्म हे मोठे शहर वसले आहे. कामा नदीमार्गे लाकूड, कागद, लोहयुक्त धातू पेट्रोलियम,मीठ, सिमेंट यांची वाहतून होते.
लिमये, दि.ह.
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 6/30/2020