अरल : आकारमानाने जगातील चौथ्या क्रमांकाचे सरोवर. हे रशियामध्ये उ. अक्षांश ४३° ३०' ते ४६° ५०' व पू. रेखांश ५८° ते ६२° यांदरम्यान आहे. अरबी व इराणी लोक त्यास ‘ख्वारिज्म समुद्र’ म्हणत; परंतु ‘अरालडेंघिझ’ (= बेटांचा समुद्र) या किरगीझ शब्दावरुन ‘अरल’ नाव रुढ झाले.
अॅझॉव्ह समुद्र : काळ्या समुद्राचा उत्तरेकडील रशियांतर्गत उथळ फाटा. प्राचीन नाव ‘पेलस मीओटिस’. याच्या आग्नेयेस क्रिमिया, उत्तरेस युक्रेन आणि पूर्वेस रशियाच्या उत्तर कॉकेशस भागातील रॉस्टॉव्ह व क्रॅस्नोदार हे प्रांत आहेत.
अॅमेझॉन : दक्षिण अमेरिकेतील प्रचंड नदी. लांबी सु. ६,३०० किमी.; जलवाहनक्षेत्र सु. ७०.५ लक्ष चौ.किमी.; लांबीला ही नदी फक्त नाइलच्याच खालोखाल असून जलवाहनक्षेत्र आणि समुद्रात नेलेले पाणी (सरासरी दर सेकंदास सु. १,१९,००० घ.मी., पावसाळ्यात सु. १,९८,००० घ.मी.) या दृष्टींनी ही जगातील सर्वश्रेष्ठ नदी समजली जाते.
अॅल्बर्ट सरोवर : मध्य आफ्रिकेतील सरोवर. याला ‘अॅल्बर्टन्यांझा’ असेही म्हणतात. मध्य आफ्रिकेतील सरोवरांच्या रांगेतील हे सर्वांत उत्तरेकडील सरोवर असून युगांडा व झाईरे यांच्या सीमारेषेवर आहे.
आँटॅरिओ सरोवर : उत्तर अमेरिका खंडातील पंचमहा सरोवरांपैकी सर्वांत लहान आणि पूर्वेकडील सरोवर. ८५ किमी. रुंद व ३१० किमी. लांबीच्या या अंडाकृती सरोवराचे पृष्ठक्षेत्रफळ १९,४७७ चौ.किमी. असून त्याशिवाय सरावराचे एकूण जलवाहनक्षेत्र ९०,१३० चौ.किमी. आहे.
आयोनियन बेटे : ग्रीसची पश्चिमेकडील बेटे. ३८० उ. व २०० पू.; क्षेत्रफळ सु. २,२६० चौ. किमी.; लोकसंख्या १,८३,६३३ (१९७१). या द्वीपसमूहात कॉर्फ्यू (केर्किरा), सेफालोनिया (केफालीनिया), झँटी (झाकिंथॉस), ल्यूकस, इथाका (इथाकी), कीथीरा, अँटीकीथीरा, पाक्सोस (पॉक्सॉय) व अँटीपाक्सोस ही बेटे आहेत.
इसिककूल : रशियाच्या किरगीझिया राज्यातील सरोवर. क्षेत्रफळ ६,२०० चौ. किमी. तिएनशान पर्वतश्रेणीच्या शाखांमध्ये समुद्रसपाटीपासून १,६०९ मी. उंचीवर वसलेले हे सरोवर जगातील पहाडी सरोवरांपैकी दक्षिण अमेरिकेतील तितिकाकाखालोखाल मोठे आहे.
ईअरी : उत्तर अमेरिकेतील सहाव्या क्रमांकाचे सरोवर. पृष्ठक्षेत्रफळ २५,६५२ चौ. किमी. अमेरिकतेली पंचमहासरोवरांपैकी हे एक असून मिशिगन, ओहायओ, पेनसिल्व्हेनिया, न्यूयॉर्क ही राज्ये व कॅनडाचा आँटॅरिओ प्रांत ह्यांनी हे वेढलेले आहे.
ईस्टर बेट : स्पॅनिश पास्क्वा व तद्देशीय रापा नूई या नावांनी प्रसिद्ध असलेले दक्षिण पॅसिफिकमधील चिलीचे बेट. २७० ०५’ द. १०९० २०’ प.; क्षेत्रफळ ११९ चौ. किमी. लोकसंख्या १,५९८ (१९७०). चिली किनाऱ्यापासून हे सु. ३,२०० किमी. वर पश्चिमेस असून नवाश्मयुगीन अवशेषांसाठी प्रसिद्ध आहे.
उत्तर समुद्र : यूरोपची खंडभूमी व ग्रेट ब्रिटन यांमधील समुद्र. याला पूर्वी जर्मन महासागर म्हणत. दक्षिणेस डोव्हरच्या सामुद्रधुनीपासून उत्तरेस शेटलंड बेटांच्या उत्तरेकडील समुद्रबूड जमिनीच्या सीमेपर्यंत याची लांबी १,१२५ किमी. आणि स्कॉटलंडपासून डेन्मार्कपर्यंत रुंदी ६७५ किमी. आहे.
आफ्रिकेच्या विषुववृत्तीय प्रदेशातील काँगो (झाईरे) नदीला उजव्या बाजूने मिळणारी प्रमुख उपनदी. लांबी वेले या शीर्षप्रवाहासह २,२५० किमी
एअर सरोवर : दक्षिण ऑस्ट्रेलियातील खाऱ्या’ पाण्याचे सरोवर २८० ३०' द. व १३७० १५' पू. लांबी २०८ किमी.; रुंदी ३२-६४ किमी. व क्षेत्रफळ सु. ९,०६५ चौ. किमी. एअर सरोवर अॅडिलेडच्या उत्तरेस ६०१ किमी. अंतरावर आहे.
विषुववृत्ताच्या दक्षिणेस, झाईरेच्या पूर्व सरहद्दीजवळील सरोवर. मध्य आफ्रिकेत निर्माण झालेल्या अंत:कृत दरीमधील हे अंडाकृती सरोवर ७६ किमी.
एड्रिअॅटिक समुद्र : भूमध्य समुद्राचा फाटा. हा इटली व बाल्कन द्वीपकल्प यांमध्ये असून याची लांबी सु. ८०० किमी., रुंदी १७५ किमी. व क्षेत्रफळ १,५५,४०० चौ. किमी. आहे. याची जास्तीतजास्त खोली सु. १४०० मी. असून उत्तरेकडे ती फक्त ९० मी. आहे. भूमध्य व एड्रिअॅटिक यांमधील ऑट्रँटो सामुद्रधुनी फक्त ७० किमी. रुंद आहे.
स्पेनमधील सर्वांत मोठी नदी. लांबी सु. ८००-९०० किमी.
एम्स : पश्चिम जर्मनीतील महत्त्वाची नदी. लांबी ३६८ किमी.; जलवाहनक्षेत्र ११,९१३ चौ. किमी. नदीचा उगम वायव्य जर्मनीतील टॉइटोबुर्क पर्वताच्या दक्षिण उतारावर होतो. वेस्टफेलिया व हॅनोव्हर प्रांतांतून वायव्य व उत्तरवाहिनी होऊन ही उत्तर समुद्रास मिळते.
एल्ब : जर्मनीतील र्हाईनच्या खालोखाल महत्त्वाची व यूरोपातील एक प्रमुख नदी. हिचा उगम चेकोस्लोव्हाकियात कर्कॉनॉशे पर्वतात असून ती उत्तर समुद्रास मिळते. लांबी कुक्सहाफेनपर्यंत सु. १,१३० किमी. व हँबर्गपर्यंत सु. १,०३३ किमी.; हँबर्गपासून सु. ८३ किमी. ब्रुन्सब्यूटेलकोख येथून कील कालवा सुरू होतो.
ऑरेंज नदी : दक्षिण आफ्रिकेतील पश्चिमवाहिनी नदी. लांबी सु. २,०९२ किमी. लेसोथो (बासूटोलँड) मध्ये ड्रेकन्सबर्गच्या माँटो सूर्स (सु. ३,३०० मी.) शिखराजवळ उगम पावून त्या राज्यातून पुढे दक्षिण आफ्रिका संघराज्याच्या ऑरेंज फ्री स्टेटच्या दक्षिण सरहद्दीवरून आणि केप ऑफ गुड होप प्रांताच्या मध्य व वायव्य भागांतून जाते; पुढे दक्षिण आफ्रिका संघराज्य व नैर्ऋत्य आफ्रिका यांच्या सरहद्दीवरून जाऊन अटलांटिक महासागराच्या अलेक्झांडर उपसागरास मिळते.
ऑरेंज नदी : दक्षिण आफ्रिकेतील पश्चिमवाहिनी नदी. लांबी सु. २,०९२ किमी. लेसोथो (बासूटोलँड) मध्ये ड्रेकन्सबर्गच्या माँटो सूर्स (सु. ३,३०० मी.) शिखराजवळ उगम पावून त्या राज्यातून पुढे दक्षिण आफ्रिका संघराज्याच्या ऑरेंज फ्री स्टेटच्या दक्षिण सरहद्दीवरून आणि केप ऑफ गुड होप प्रांताच्या मध्य व वायव्य भागांतून जाते
ओडर : मध्य यूरोपातील एक प्रमुख नदी. लांबी सु. ९०० किमी. ही चेकोस्लोव्हाकियाच्या ओडर पर्वतात उगम पावून सामान्यतः ईशान्येकडे वाहत जाते. आग्नेय सुडेटन व पश्चिम कार्पेथियन पर्वतांमधील मोरॅव्हियन गेट या सखल खिंडीतून ती पोलंडमध्ये जाते. रात्सीबूश. कॉझल, ऑपॉल, ब्झेक, व्ह्रोट्स्लाफ (ब्रेस्लौ), कॉश्चिन वगैरे गावांवरून जाऊन ती फ्रँकफुर्ट येथे उत्तरवाहिनी होते. मग दलदलीच्या भागातून खाडी-भागात गेल्यावर तिचे दोन फाटे होतात. पश्चिम फाटा म्हणजे बर्लिन-श्टेटीन कालवा होय.
ओनेगा सरोवर : यूरोपातील दुसऱ्या क्रमांकाचे सरोवर. क्षेत्रफळ ९,८८० चौ. किमी.; किनारा १,४०० किमी.; खोली सु. १२० मी.; २४० किमी. लांबीचे व ८० किमी. रुंदीचे हे सरोवर श्वेतसमुद्र व लॅडोगा सरोवर यांच्या दरम्यान असून त्याचा उत्तरभाग रशियाच्या कारेलिया राज्यात व दक्षिणभाग रशियाच्या व्होलग्डा विभागात आहे.
ओब : (ओबी). पश्चिम सायबीरियातील प्रमुख नदी. बीया व काटून या अल्ताई पर्वतावरून येणाऱ्या नद्यांच्या व्यीस्क येथील संगमापासून समुद्रापर्यंतच्या सु. ३,६६० किमी. लांबीच्या नदीस ओब म्हणतात. काटूनसह लांबी ३,९९० किमी.; इर्तिश या प्रमुख उपनदीसह लांबी ७,५३८ किमी. जलबाहनक्षेत्र सु. २९,४०,६०० चौ. किमी. त्यापैकी सू. १५% क्षेत्र अंतर्गत जलवाहनाचे आहे. व्यीस्कपासून बर्नऊलपर्यंत ओब वाळूच्या व दगडगोट्यांच्या बांधांच्या प्रदेशातून अनेक प्रवाहांनी वाहते.
ओरिनोको नदी : दक्षिण अमेरिकेतील तिसऱ्या क्रमांकाची नदी. लांबी २,०४९ किमी.; पाणलोटक्षेत्र ९ लक्ष चौ. किमी. पेक्षा अधिक. व्हेनेझुएलाच्या दक्षिणेकडील पारीमा पर्वतात १,०७४ मी. उंचीवर हिचा उगम होतो. सुरुवातीस ही पश्चिमवाहिनी असून सुरूवातीच्या ५० किमी. अंतरात ती ३०० मी. खाली येते. त्यामुळे तेथे अनेक द्रुतवाह आणि धबधबे आहेत.
कर्णफुली नदी : बांगला देशमधील महत्त्वाची नदी. लांबी सु. २३७ किमी. बांगला देश आणि ब्रह्मदेश ह्यांच्यामधील भारताच्या मिझोराम राज्याच्या जिल्ह्यातील, बांगला देश सरहद्दीजवळील पश्चिम लुशाई टेकड्यांत हिचा उगम होतो.
काँगो नदी (झाईरे नदी) : विषुववृत्त दोनदा ओलांडणारी आफ्रिकेतील प्रचंड नदी. आफ्रिकेत ही लांबीला (सु. 4,371 किमी.) नाईलच्या खालोखाल व समुद्रात वाहून नेण्याच्या एकूण पाण्याबाबत जगात फक्त अॅमेझॉनच्या खालोखाल आहे.
काबूल नदी : अफगाणिस्तानातील महत्त्वाची नदी. एकूण लांबी सु. ६९६ किमी.; जलवाहन क्षेत्र ५१,८०० चौ. किमी.;कोफेसा, कुहू, कुभा ह्या प्राचीन नावांनी ही प्रसिद्ध होती. काबूल शहराच्या ९६ किमी. पश्चिमेकडील हिंदुकुशच्या संगलाख पर्वतश्रेणीमध्ये ३,२९१ मी. उंचीवर ही उगम पावते.
कामानदी : रशियातील व्होल्गा नदीची प्रमुख उपनदी. लांबी सु.२,०२० किमी. उरल पर्वताच्या नैर्ऋत्येकडील उद्मुर्त प्रांतात उगम पावून, ती कझॅनच्या दक्षिणेला ७० किमी. वर व्होल्गा नदीला मिळते.
कासाई : मध्य आफ्रिकेतील कॉंगो (झाईरे) नदीची महत्वाची उपनदीत्र. लांबी सु.२,१५० किमी. जलवाहनक्षेत्र ९,०६,५०० चौ. किमी. अंगोलामधील बेंग्वेला पठाराच्या १,१०० मी. उंचीच्या डोंगराळ प्रदेशात कासाईचा उगम होतो. तेथून ती सु.४०० किमी. पूर्वेकडे वाहते व मग उत्तरवाहिनी होते.
कील कालवा : उतर समुद्र व बाल्टिक समुद्र यांना जोडणारा पश्चिम जर्मनीच्या श्लेस्विग-होलस्टाइन प्रांतातील कालवा. लांबी ९८.७ किमी., रूंदी ९५.९मी. व खोली ११ मी. सुएझपेक्षा लहान व पनामापेक्षा मोठा आहे. जर्मनीच्या लष्करी महत्त्वाकांक्षेतून हा १८८७—९५ मध्ये बांधला गेला. तत्पूर्वी स्कागनची वादळे आणि डॅनिश टोलनाकी चुकविण्याकरिता या प्रदेशात चौदाव्या शतकापासूनच छोटे कालवे बांधण्यात आले होते.
रशियाच्या ट्रान्स कॉकेशिया भागातील सर्वांत मोठी नदी. लांबी १,५१५ किमी.; जलवाहनक्षेत्र १,८७,९९० चौ. किमी.