অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

लाकूड कसे वाकवतात ?

लाकूड कसे वाकवतात ?

लाकडाचे काम करताना अनेकदा लाकडाला bend करावे लागते. bend करताना लाकूड तुटण्याचा धोका असतो. bend करण्यासाठी अनेक पद्धत आहे आपण एक एक पद्धत पाहू या.

1. Steam box method

या पद्धतीत लाकडाचा किवा इतर कोणत्याही मटेरीअलचा, चारी बाजूनी बंद असा एक box वापरला जातो ज्याला एक छिद्र असते ज्या मधून वाफ box च्या आतमध्ये सोडली जाते. 
box च्या दुसर्या बाजूला सुद्धा एक छिद्र असते ज्यातून आत मध्ये गेलेली अतिरिक्त वाफ बाहेर पडेल. जे लाकूड bend करायचे आहे त्याला त्या box मध्ये ठेऊन आत वाफ सोडली जाते. साधारणता एका इंचाच्या thickness साठी एक तास वाफ या हिशोबाने लाकडाला वाफ दिली जाते. वाफेमुळे लाकडाचे तंतू लवचिक होतात आणि लाकूड न तुटता वाकवता येते.
पुरेशा वेळेनंतर या लाकडाला हळूहळू bend केले जाते व जो आकार देयाचा आहे त्यावर घट्ट बसवले जाते लाकूड वाळले कि त्याला तो आकार कायमचा प्राप्त होतो.

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate