অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

महाराष्ट्र फुटबॉलमय

महाराष्ट्र फुटबॉलमय

भारत देश सांस्कृतिकदृष्ट्या जसा समृद्ध आहे, तसाच तो खेळामध्ये सुद्धा अग्रेसर आहे. हॉकी, क्रिकेट, टेनिस, बॅटमिंटन, बुद्धीबळ इत्यादी खेळांची आवड भारतामध्ये पूर्वीपासून रूजली आहे. या खेळांमध्ये अनेक खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधीत्व करून देशाची नवीन ओळख निर्माण केली आहे.

जगभरात अत्यंत लोकप्रिय ठरलेला फुटबॉल हा खेळ भारतात मात्र, प्रसिद्धी माध्यमातून लोकांपर्यंत फारसा पोहोचलेला नाही. जगभरात फुटबॉलसाठी वातावरण अत्यंत प्रेरक आहे. दर चार वर्षांनी होणाऱ्या या जागतिक फुटबॉल महासंघाची स्पर्धा ही विश्वस्तरावर एक लक्षवेधी स्पर्धा म्हणून ओळखली जाते. त्याचेच औचित्य साधून या वर्षी भारतामध्ये ‘फिफा अंडर 17’ ही विश्वचषक स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. याचे औचित्य साधून राज्याच्या क्रीडा व युवक कल्याण विभागातर्फे ‘महाराष्ट्र मिशन 1 मिलिअन’ हा प्रकल्प राबविण्यात येत आहे.

जागतिक फुटबॉल महासंघाची (फिफा ) 17 वर्षाखालील विश्वचषक स्पर्धा ही येत्या ऑक्टोबर महिन्यात भारतात होणार आहे. केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण भारतीय उपखंडामध्ये होणारी ही पहिलीच विश्वचषक स्पर्धा आहे. या स्पर्धेनिमित्त संपूर्ण देशात ऐतिहासिक क्रीडा क्रांती रुजविण्याचे काम होणार आहे. त्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय स्तरावरील महत्वाकांक्षी प्रकल्प मिशन 11 मिलिअन राबविण्यात आला आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रात वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिअशन (विफा ) आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने “महाराष्ट्र मिशन 1 मिलिअन” हा फुटबॉल या खेळात क्रांती घडविणारा उपक्रम महाराष्ट्रात साकार होणार आहे.

“महाराष्ट्र मिशन 1 मिलिअन”

महाराष्ट्रातील सुमारे 30 हजार शाळांमधून 10 लाखांहून अधिक मुला-मुलींपर्यंत फुटबॉल हा खेळ पोहोचविण्याचा निर्धार राज्याच्या क्रीडा विभागामार्फत केला आहे. यानिमित्ताने देशातील राज्यस्तरीय क्रीडा क्रांती घडविणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरणार आहे. महाराष्ट्रातील सर्व शाळा महाविद्यालये आणि विद्यापीठातून फुटबॉल फेस्टिवल साजरे करणार असून फुटबॉलविषयी जनजागृती केली जाणार आहे. तसेच 14 वर्षाखालील मुला-मुलींसाठी फुटबॉल स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. तसेच जिल्हास्तरावर प्रशिक्षण शिबिरे कार्यशाळा क्रीडा शेत्रातील करियर संदर्भात जनजागृती शिबीरे इत्यादी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्याचबरोबर आमदार आपल्या मतदारसंघात आमदार चषक स्पर्धा भरविणार आहेत.

ऐतिहासिक फुटबॉल मिशन

8 सप्टेंबर 2017 रोजी राज्यातील 10 लाख क्रीडापट्टू एकाचवेळी मैदानावर फुटबॉल खेळणार आहे. त्यानिमित्ताने अवघ्या महाराष्ट्राचे ऐतिहासिक क्रीडांगणात रुपांतर होणार आहे. क्रीडापटूबरोबरच स्थानिक लोकप्रतिनिधींसह सामान्य नागरिक सुद्धा मैदानात उतरून फुटबॉल खेळाचा प्रसार करण्याचा संदेश देशभर पोहोचविण्याचा प्रयत्न करणार आहे. राज्यातील क्रीडा व शिक्षण क्षेत्रातील हा सर्वात मोठा उपक्रम ठरणार आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील हजारो फुटबॉलप्रेमी या निमित्ताने एकत्र येणार आहेत. 17 वर्षाखालील भारतीय फुटबॉल संघात निवड झालेला कोल्हापूरचा अनिकेत जाधव याने भारतीय संघात अभिमानास्पद स्थान मिळविले आहे. फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या निमित्ताने महाराष्ट्र फुटबॉलविषयी एक वेगळीच परंपरा आणि लौकिक निर्माण करीत आहे.

“चला तर मग आनंदी आरोग्यासाठी फुटबॉल खेळूया; महाराष्ट्रात फुटबॉल क्रांती घडवूया आणि अवघा महाराष्ट्र फुटबॉलमय करूया”.

लेखक: प्रशांत भालेराव

माहिती स्रोत: महान्युज

अंतिम सुधारित : 3/23/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate