অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

‘बेगम अख्तर’ जन्मदिवस

‘बेगम अख्तर’ जन्मदिवस

भारतीय शास्त्रीय संगीतात गझल गायनात अनोख्या अंदाजाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणाऱ्या ‘बेगम अख्तर’ यांचा आज (७ॲाक्टोबर) जन्मदिवस. देशातील सर्वोत्तम नागरी पुरस्कार पद्मश्री व पद्मभूषण (1975) मरणोत्तर ज्यांना प्राप्त झाला, अशा गायिका म्हणजे ‘बेगम अख्तर’. गुगलने ‘बेगम अख्तर’ यांना 103 व्या जन्मदिनानिमित्त ‘विशेष डूडल बनवले आहे’. या महान गायिकेविषयी थोडक्यात...

आजच्या उत्तरप्रदेशमधील फैझाबादमध्ये त्यांचा 1914 ला जन्म झाला. बेगम अख्तर यांचे मूळ नाव अख्तरी बाई फैजाबादी. जीवनातल्या संघर्षाच्या दु:खाची लकेर त्यांच्या गायनात आपल्याला दिसते. वयाच्या सातव्या वर्षी त्यांनी संगीत शिक्षण सुरु केले. शालेय शिक्षणात त्यांना विशेष रस नव्हता. लखनऊ येथील बॅरिस्टर अहमद अब्बासी यांच्याशी विवाह झाल्यानंतर त्यांना ‘बेगम अख्तर’ हे नाव मिळाले. हिंदी चित्रपटसृष्टीत ‘एहसान’, ‘दानापानी’, ‘पन्नादाई’ या चित्रपटात अभिनय, पार्श्वगायन करुन त्यांनी आपल्या गायनाचा ठसा उमटविला.

1996 साली शाम बेनेगल यांनी ‘बेगम अख्तर’ यांच्या जीवनावर आधारीत ‘सरदारी बेगम’ हा चित्रपट बनवून त्यांच्या जीवनावर प्रकाशझोत टाकला. त्याला राष्ट्रीय पारितोषिक मिळाले. बेगम अख्तर यांनी कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात  ‘All India Radio’ साठीही गायन केले होते. गझल, दादरा, ठुमरी या गायन प्रकारात त्यांचे वर्चस्व होते. उत्तर हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात त्यांनी बहुमोल योगदान दिले.

बेगम अख्तर यांची गाणी

‘छा रही धरा जिया मोरा लहराया है’

‘दिवाना बनाना है, तो दिवाना बना दे’

‘कोयलिया मत कर पुकार’

गझल

‘ए मोहब्बत तेरे अंजाम पे रोना आया’

ही गझल सर्वाधिक लोकप्रिय आहे.

‘मल्लिका-ए-गझल’ या नावानं त्याची ख्याती होती. संगीत नाटक अकादमी पुरस्कारानेही त्यांना गौरवण्यात आले होते. बिहार मधील भूकंप पिडितांसाठी देणगी गोळा करण्यासाठी त्यांनी देशभर गायनाचे अनेक कार्यक्रम केले. त्यातून मिळालेली पूर्ण रक्कम शासनाच्या सहायता निधीस भेट दिली. अनेक दिग्गज त्यांच्या गायनाचे चाहते होते. त्यांच्या गायनाने प्रभावित होऊन सरोजिनी नायडू यांनी साडी भेट म्हणून दिल्याचे हकीकतही सांगितली जाते. 30 ऑक्टोबर 1974 रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. भारतीय शास्त्रीय संगीतात बेगम अख्तर यांचे अमुल्य असे योगदान आहे. ‘गुरुकुल’ शिक्षण पद्धतीचा त्यांनी पुरस्कार केला. त्यामुळे हा शिष्यगण भारतीय संगीत क्षेत्रात सक्रीय आहेत.

गुगलने ‘डूडल’मधून मध्ये बेगम अख्तर यांची आठवण करून दिली..त्यानिमित्त या महान गायिकेला विनम्र आदरांजली..!

लेखक: प्रसाद माळी

माहिती स्रोत: महान्युज

अंतिम सुधारित : 3/22/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate