অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

‘उर्दू लोकराज्य’ वाचन मेळावा

‘उर्दू लोकराज्य’ वाचन मेळावा

शासनाचे मुखपत्र असलेले उर्दू लोकराज्य मासिक हे विद्यार्थ्यांच्या करिअरला दिशा देण्यासाठी कसे उपयुक्त ठरते याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी नागपूर जिल्हा माहिती कार्यालयाने पुढाकार घेऊन उर्दू लोकराज्य वाचन मेळावा आयोजित केला. करिअरच्या उंबरठ्यावर असलेले विद्यार्थी आणि ‘उर्दू लोकराज्य’ असा दुहेरी संवाद साधणारा हा आगळावेगळा मेळावा होता. औपचारिक सोहळ्यात पाहुण्यांचे स्वागत विद्यार्थ्यांनी उर्दू स्वागत गीताने करून मंत्रमुग्ध केले.

सहसा महानगरपालिकेच्या शाळेत पालक आपल्या पाल्याला शिक्षण देण्यास अनुत्सुक असतात. पण एम.के. आझाद उर्दू शाळेची दुमजली इमारत तेथील शिक्षण, विद्यार्थ्यांची संख्या, शिस्त आणि खेळाचे मैदान बघितल्यानंतर कुणालाच विश्वास बसणार नाही, ही महानगरपालिकेची शाळा आहे. महानगरपालिकेच्या शाळेत शिक्षण घेऊन आपल्या यशाचे तुरे रोवणारे अनेकजण आहेत, या विद्यार्थ्यांमध्ये असेच काही होते....

लोकराज्य हे शासनाचे मुखपत्र आहे. उर्दू लोकराज्यमधील माहितीमुळे ज्ञानात भर पडते. शिवाय लोकराज्य उर्दू भाषेतच असल्याने वाचण्यास सोपे जाते. त्यामुळे उर्दू लोकराज्याचे नियमीत वाचन करावे. तसेच माहिती व तंत्रज्ञानाचा जास्तीत-जास्त वापर करताना भविष्यातील संधीचा वेध घेण्यासाठी उर्दू माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी लोकराज्य मासिक हे व्यासपीठ आहे, असे मान्यवरांनी यावेळी सांगितले.

‘उर्दू लोकराज्य’ मेळाव्यामुळे विद्यार्थ्यांना वर्तमान काळातील शासकीय धोरण, भविष्यकालीन योजना तसेच विद्यार्थ्यांना उपयोगी शैक्षणिक धोरणांबाबत माहिती मिळाली होती.

सध्या ‘मल्टिपल इंटेलिजन्स’ ही संकल्पना पुढे आली आहे. करिअर निवडताना आपली बुद्धीमत्ता नेमकी कोणत्या प्रकारची आहे. याची चाचणी करून करिअरच्या घोडदौडीत विद्यार्थी उतरत आहे. पण जीवनात यशस्वी होण्यासाठी योग्य करिअरची निवड खूप महत्त्वाची असते. योग्य वेळी आवश्यक माहिती मिळाल्यास योग्य दिशा मिळू शकते. विद्यार्थ्यांना करिअरविषयक माहितीबरोबरच शासनाचे महत्त्वाचे निर्णय, योजना, कार्यक्रम, उपक्रम, ध्येयधोरण याची माहिती ‘लोकराज्य’ च्या माध्यमातून मिळावी. याकरिता नागपूर येथील एम.के. आझाद उर्दू शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात ‘उर्दू लोकराज्य’ वाचक मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याच्या निमित्ताने या शाळेत जाण्याचा योग आला. शाळेच्या सभागृहात शुभ्र गणवेशातील विद्यार्थी रांगेत शिस्तबद्ध पद्धतीने येत होते. हे शाळेतील चित्र कुणालाही आपल्या शाळेची आठवण येणार असेच होते.

मेळाव्यात विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडावी म्हणून सामान्य ज्ञान स्पर्धा घेण्यात आली. विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी मुलांमध्ये चढाओढ सुरू झाली. कारण अचूक उत्तर दिल्यास ‘उर्दू लोकराज्य’ बक्षीस म्हणून मिळणार होते. याचा आनंद या विद्यार्थ्यांना अधिक होता. सभागृहाच्या एका बाजूला विविध ‘उर्दू लोकराज्य’चे प्रदर्शन लावण्यात आले होते. या स्टॉलवर जाऊन विद्यार्थी ‘उर्दू लोकराज्य’ कुतूहलाने न्याहाळत होते. अशी उर्दू लोकराज्यने मुलांना भूरळ पाडली होती. तर, ज्या विद्यार्थ्यांना लोकराज्य बक्षीस म्हणून मिळाले त्यांचा आनंद गगनात मावेना... असा हा उर्दू लोकराज्य मेळावा विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने भावला होता.

यावेळी शिक्षणाधिकारी श्रीमती संध्या मेडपल्लीवार, नगरसेवक जमाला अहमद, मुख्याध्यापक निखद रेहाना खान, जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर,अशोक कोल्हटकर, निजामुद्दीन आदी उपस्थित होते.

लेखिका: सारिका फुलाडी

माहिती स्रोत: महान्युज

अंतिम सुधारित : 7/1/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate