.कुतुब मिनार दिल्ली मध्ये स्थित असुन ह्याची ऊंची २३७.८ फूट आहे. विटांपासुन बनलेला हा जगातील सर्वात ऊंच मिनार आहे. ह्याच्या बांधकामाची सुरुवात ईसवी सन ११९३ मध्ये कुतुबुद्दिन ऐबक ह्याने सुरु केली पण तो कुतुब मिनार चा फक्त पाया पुर्ण करू शकला.त्याचा ऊत्तराधिकारी ईल्तुतमिश ह्याने आणखिन ३ मजले चढविले. सर्वात शेवटचा पाचवा मजला फिरोझ शाह तुघलक ह्याने ईसवी सन १३८६ मध्ये पूर्ण केला. कुतुब मिनार वर सर्व बाजुंनी कुराणातिल वचने कोरलेली आहेत.
कुतुब मिनारच्या निर्मिती आधी ह्या परिसरात लाल कोट ही दिल्ली (त्यावेळी धिल्लीका) चे शेवटचे हिंदू राजे तोमर आणी चौहान ह्यांची राजधानी होती. ह्या परिसरात आधी २७ हिंदू आणी जैन मंदिरे होती.
ही मंदिरे उध्वस्त करून त्यांच्या दगड - विटांपासुन कुतुब मिनार ची निर्मिती केली गेली. कुतुब मिनारावर एका ठिकाणी "श्री विश्वकर्मा प्रसादे रचिता" असे कोरलेले आढळते. आजही ह्या मंदिरांचे भग्नावशेष ह्या परिसरात पहायला मिळतात. कुतुब मिनार ह्या मंदिरांच्या भग्नावशेषांवर आज ऊभा आहे.
छायाचित्रे पाहण्यासाठी खालील वेबसाईटवर क्लिक करा.
स्त्रोत - मायबोली
अंतिम सुधारित : 6/22/2020