অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कृषी - केंद्र ई-गव्हर्नन्स प्रकल्प

डाक नेट (dacnet.nic.in)

शेतकरी हा केंद्रबिंदू मानून त्यास उपयुक्त अशी माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावी म्हणून केंद्र शासनाच्या शेती व शेतकरी कल्याण विभागाने ही पोर्टल सुविधा विकसित केली असून त्यामध्ये शेतकऱ्यांना उपयुक्त माहिती व विविध संकेतस्थळांच्या उदा. योजना, आयात निर्यातीसाठी कीड रोग मुक्त रोपे/ बियाणे, निविष्ठा, यांत्रिकीकरण, हवामान अंदाज अहवाल इ. जोडण्या (links) उपलब्ध आहेत.

सिडनेट (seednet.gov.in)

या संकेतस्थळावर पीकनिहाय /वाणनिहाय पायाभूत, प्रमाणित, सत्यप्रत बियाणे माहिती उपलब्ध आहे.

अॅगमार्कनेट (agmarknet.nic.in)

या संकेतस्थळावर बाजारपेठनिहाय कृषि मालाची आवक व दर याबाबतची माहिती उपलब्ध आहे.

शेती व शेतकरी कल्याण मंत्रालय संकेतस्थळ (agricoop.nic.in)

या संकेतस्थळावर केंद्र शासनाच्या कृषिविषयक योजना व शेतीविषयक धोरणे याबाबतची माहिती उपलब्ध आहे.

फार्मर पोर्टल (www.farmer.gov.in)

या पोर्टलवर शेतकरी समुदायासाठी उपरोक्त सर्व प्रकल्प व कृषि विभागातील इतर योजना एकाच ठिकाणी एकत्रितरित्या उपलब्ध केल्या आहेत. शेतकरी समुदायासाठी एकाच ठिकाणी सर्व माहिती उपलब्ध व्हावी हा या मागचा उद्देश आहे.

कृषि हवामान संकेतस्थळ (www.imdagrimet.gov.in)

या संकेतस्थळावर हवामानाचा अंदाज, प्रत्यक्ष पडलेला पाऊस व त्याची सरासरीशी तुलना याबाबतची देश, हवामान विभाग, राज्य व जिल्हानिहाय माहिती व तपशीलदर्शक नकाशे उपलब्ध आहे.

राष्ट्रीय कृषि ई-गव्हर्नन्स प्रकल्प (NeGPA)

NeGPA अंतर्गत केंद्र व राज्य स्तरावरील शेतीविषयक विविध कार्यक्रम व सेवासुविधा एकत्रित करून केंद्रीय कृषि पोर्टल (CAP) व राज्य कृषि पोर्टल (SAP) मार्फत एकत्रितरीत्या उपलब्ध करण्याचे नियोजन आहे. यामध्ये विविध माध्यमांचा वापर करुन निवडलेल्या १२ सेवा शेतकरी व भागधारक (Stakeholder) यांचेपर्यंत पोहचविल्या जाणार असून NIC कडून प्रत्येक सेवा उप-विभाग म्हणून विकसित केली जात आहे.पहिल्या टप्प्यात यामध्ये महाराष्ट्र राज्यासह सात राज्यात संगणक सुविधा (संगणक प्रिंटर्स, स्कॅनर्स,kiosk, laptop इ. ) उपलब्ध करून दिले असून राज्यामध्ये ६२४ कार्यालयांमध्ये पुरवठा झाला आहे.

स्त्रोत : http://www.krishi.maharashtra.gov.in/1145/Centrally-Developed-eGovernance-Projects

अंतिम सुधारित : 6/5/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate