অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

ऑनलाईन सेवाभरती

प्रस्तावना

सर्व शासकीय कार्यालयांच्या आवश्यकता लक्षात घेत महाऑनलाईनने महा-रिक्रुटमेंट हे ऑनलाईन सेवाभरती पोर्टल विकसीत केले आहे. त्यामुळे त्यात शासकीय नोकरभरती प्रक्रियेतील सर्व टप्प्यांचा समावेश करण्यात आला आहे. सर्व प्रकारच्या थेट भरतीसाठीही ही ऑनलाईन भरती

महा-रिक्रुटमेंट ॲप्लिकेशनचे दोन भाग आहेत:

  • अ. ॲप्लिकेशन विभाग
  • ब. बॅकएंड प्रोसेसिंग विभाग

ॲप्लिकेशन

  • उमेदवार
  • प्रशासन
उमेदवार

फर्स्ट टाईम युजर प्रोफाईल एन्ट्री- महा-रिक्रुटमेंट पोर्टलवर नोंदणी करणाऱ्या आणि कोणत्याही पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराला सर्वप्रथम स्वत:चे प्रोफाईल तयार करावे लागेल.या प्रोफाईलमध्ये वैयक्तिक माहिती, पत्ता, इतर तपशील, काळ्यायादीतील समावेशाबाबत तपशील, शैक्षणिक पात्रता, अनुभवाचा तपशील, छायाचित्र आणि स्वाक्षरी या बाबींचा समावेश आहे. उमेदवाराला कितीही वेळा आपले प्रोफाईल अद्ययावत करता येईल.

जाहिरात निहाय आवेदन अर्ज - उमेदवाराच्या प्रोफाईलमध्ये असणारे तपशील या अर्जात स्वयंचलितरित्या नोंदविले जातील, त्यात कोणताही बदल करता येणार नाही. त्याव्यतिरिक्त जाहिरातीत विचारलेल्या तपशिलांची नोंद करून उमेदवाराला तो अर्ज सादर करावा लागेल.

शुल्क भरणा - शुल्क भरणा करण्यासाठी उमेदवाराला ३ पर्याय उपलब्ध आहेत.

  • ऑनलाईन पेमेंट (नेट बँकिंग, डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड)
  • सीएससीमध्ये शुल्क भरणा
  • स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कोणत्याही शाखेत चलान द्वारे शुल्क भरणा

माझे खाते (उमेदवाराचे खाते) - उमेदवाराच्या खात्यामध्ये पुढील सुविधा उपलब्ध आहेत.

  • प्रोफाईल पाहा /अद्ययावत करा
  • उमेदवाराने अर्ज केलेल्या जाहिराती
  • पावतीची प्रिंट घेणे
  • प्रवेशपत्र डाऊनलोड करणे
  • मुलाखतीचे पत्र डाऊनलोड करणे
  • निकाल पाहणे
  • अर्ज रद्द करणे
  • प्रशासनप्रशासन
जाहिरात विभाग

जाहिरातीच्या तपशीलाची नोंद करण्यासाठीचा अर्ज या मोड्युलमध्ये उपलब्ध आहे. या तपशिलात पुढील बाबींचा समावेश आहे.

  • कार्यासन
  • पदनाम
  • जाहिरात क्र.
  • अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख
  • अर्ज प्रक्रिया समाप्तीची तारीख
  • संबंधित तारखेला वय
  • संबंधित तारखेला अर्हता
  • पदभरतीचा प्रकार (थेट भरती)
  • जाहिरात (अटॅचमेंट)
  • स्थिती (सक्रिय/ निष्क्रीय)

बॅकएन्ड प्रोसेसींग विभाग

  • अर्ज तपशील पीडीएफ आणि .सीएसव्ही स्वरूपात जारी
  • प्रवेश पत्र जारी
  • मुलाखत वेळापत्रक तयार करणे
  • मुलाखतीसाठी पत्र
  • निकाल अपलोड
  • शिफारस पत्र जारी

प्राप्त अर्ज छाननीसाठी अर्जाचा तपशील पीडीएफ आणि .सीएसव्ही स्वरूपात जारी -
शुल्क भरणा पूर्ण झालेले सर्व अर्ज छाननीसाठी या विभागात उपलब्ध आहेत. .सीएसव्ही स्वरूपात प्राप्त अर्जांची माहिती एक्स्पोर्ट करण्याची तरतूदही यात आहे. विविध निकषांच्या आधारे संबंधित विभाग प्राप्त माहितीची छाननी करू शकतो. मंजूर अर्जांची संख्या यंत्रणेमध्ये अपलोड केली जाते आणि पुढील टप्प्यावर हेच अर्ज विचारात घेतले जातात.

प्रवेशपत्र जारी - या मोड्युलचे सब-मोड्युल पुढीलप्रमाणे -

  • लेखी परीक्षेसाठी केंद्राची निवड
  • केंद्र वितरणासाठी केंद्र आणि जिल्हा यांची सांगड घालणे
  • उप केंद्र क्षमता तपशिलासह केंद्र आणि उप केंद्र यांची सांगड घालणे
  • परीक्षा वेळापत्रकाची नोंद आणि प्राधिकृत स्वाक्षरीकर्ता तपशील
  • सूचनांचा नमुना
  • प्रवेशपत्र पडताळणी आणि जारी करणे
  • केंद्र आणि उप केंद्रानुसार उपस्थिती पत्रक जारी करणे

जारी केलेली प्रवेशपत्रे उमेदवाराच्या माझे खाते विभागात उपलब्ध आहेत, ती डाऊनलोड तसेच प्रिंट करता येतील.

मुलाखत वेळापत्रक जारी करणे - निर्देशित ठिकाणी मुलाखतीचे स्थान, मुलाखतीची तारीख, संबंधित ठिकाणी आणि संबंधित दिवशी मुलाखतीसाठी उपलब्ध तज्ञ नामिकांची संख्या याची नोंद विभागामार्फत केली जाते. एकापेक्षा जास्त दिवशी मुलाखती असतील तर त्या सर्व दिवसांसाठी वरील तपशिलांची नोंद विभागामार्फत केली जाते. त्याचप्रमाणे एकापेक्षा जास्त ठिकाणी मुलाखती असल्यास विभाग त्यानुसार तपशिलांची नोंद करतो.

मुलाखत पत्रे जारी करणे - विविध पदांसाठी मुलाखतीची पत्रे पाठविण्याची सुविधाही उपलब्ध आहे. त्यासाठी पत्रांच्या उपलब्ध नमुन्यांमध्ये बदल करता येतात. मुलाखतीच्या वेळापत्रकामधून आवश्यक तपशील प्राप्त केले जातात आणि मुलाखत पत्रात योग्य ठिकाणी त्यांची नोंद केली जाते. अशा पद्धतीने जारी केलेली ही पत्रे उमेदवाराच्या खात्यातही उपलब्ध आहेत. पदाचे नाव, मुलाखतीची तारीख, मुलाखत क्रमांक आणि ठिकाण या तपशिलाचा समावेश असणारा एसएमएस उमेदवाराला पाठविला जातो.

मुलाखत प्रक्रियेसाठी खालील अहवाल जारी केले जातात.

पॅनेल नुसार मुलाखत हजेरीपट जारी करणे

मुलाखतीच्या वेळी उमेदवाराच्या उपस्थितीची नोंद करण्यासाठी संबंधित सुरक्षा रक्षकाकडे हा हजेरीपट दिला जावा. जारी मुलाखत पत्रांच्या संख्येइतक्या संख्येची नोंद या पत्रकात झाली पाहिजे.

टोकन क्रमांक जारी करणारे हजेरीपत्रक (नामिकेनुसार)

टोकन क्रमांक जारी करण्यासाठी खालील यादीतील कोणताही एक निकष वापरला जातो.

  • नोंदणी आयडी /अर्ज आयडी (चढता क्रम/उतरता क्रम)
  • आडनाव (चढता क्रम/उतरता क्रम)
  • नाव (चढता क्रम/उतरता क्रम)
  • जन्मतारीख (चढता क्रम/उतरता क्रम)
  • परीक्षा हजेरी क्र. (चढता क्रम/उतरता क्रम)

मुलाखत क्र. जारी करताना वापरलेला निकष टोकन क्र. जारी करण्यासाठी पुन्हा वापरता येणार नाही.

या हजेरी पत्रकामध्ये अनु. क्र., मुलाखत क्र., टोकन क्र. आणि उमेदवाराचे नाव या बाबींचा समावेश होतो.

मुलाखत गुणपत्रिका (नामिकेनुसार)

या अहवालात छापील मुलाखत गुणपत्रिकेमध्ये केवळ टोकन क्र. प्रिंट केले जातात.

सारांश प्रोफाईल २

आवेदन अर्जात भरलेल्या माहितीचा गोषवारा या अहवालात नमूद केला जातो.

निकाल अपलोड करणे

संबंधित विभाग लेखी परीक्षा /शिफारस केलेल्या/ शिफारस न केलेल्या उमेदवारांचा निकाल नियोजित स्वरूपात एक्सेलच्या माध्यमातून प्रदान करतो. एक्सेल स्वरूपातील हे कागदपत्र यंत्रणएमध्ये अपलोड करण्याची तरतूद आहे. निकाल यंत्रणेमध्ये अपलोड केला जातो आणि उमेदवाराला तो आपल्या खात्यामध्ये पाहता येतो.

ऑनलाईन अर्ज सादर करणाऱ्या अर्जदारांना सहाय्य करण्यासाठी महाऑनलाईनने दूरध्वनीद्वारे कॉल सेंटर सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

प्रश्नपत्रिका तयार करण्याचे अथवा उत्तरपत्रिका तपासण्याचे काम महाऑनलाईन करत नाही.

 

स्त्रोत : महाऑनलाईन

अंतिम सुधारित : 6/5/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate