अनेक बँकांमध्ये इंटरनेट बँकिंग सुरु करण्यासाठी अर्जाची व्यवस्था असते. काही बँका तुम्हाला परस्पर ऑनलाईन बँकिग सुरु करण्याची परवानगी देतात. मात्र जो पर्यंत तुम्ही स्वत: बँकेच्या एखाद्या शाखेवर जाऊन तुमच्या ओळखीची पडताळणी करत नाही तो पर्यंत बँक कोणतेही देवाण घेवाणीचे व्यवहार करत नाही. तुम्हाला तुमचं ओळखपत्र आणि बँकेचे काही कागदपत्र सोबत घेऊन जावे लागतात. तुम्ही अजून बँक खाते उघडले नसेल तर ते उघडताना तुम्ही इंटरनेटon बँकिंग विषयी विचारू शकता. अनेक बँका एकाच फी आकारणीमध्ये इंटरनेट बँकिंग, टेलिफोन, मोबाईल अशा सर्व सुविधा देतात. याचाच अर्थ असा की जेव्हा तुम्ही इंटरनेट बँकिंगची सेवा घेता तेंव्हा खास पासवर्डच्या माध्यमातून तुमच्या खात्यावरची बाकी रक्कम मोबाईलवर बघू शकता. शिवाय तुमची बिलंही फेडू शकता. या प्रकारे तुमच्याकडे इंटरनेट सेवा नसली तरी तुम्ही बँक किंवा एटीएम मध्ये न जाताही बँकेचे व्यवहार करू शकता.
थोडक्यात इंटरनेट बँकिंग सुरु करण्यासाठी तुमचे ज्या बँकेत खाते असेल त्या बँकेचे सर्व पुरावे ,कागद पत्र घेऊन जावे.तेथील बँक अधिकारी यांना इंटरनेट बँक व्यवहार विषयी चर्चा करून ते फॉर्म भरून घेतील त्या नंतर १० ते १५ दिवसांनी तुम्हाला पोस्टाद्वारे बँक खात्याचा आय डी ,पासवर्ड व रक्कम ट्रान्सफर करण्यासाठी कोड इ.माहिती पाठवली जाते.आलेले कोड व पासवर्ड ने तुम्ही तुमच्या बँक खात्यात प्रवेश केल्यानंतर तुम्ही स्व:ता पासवर्ड बदलून घ्यावा.
ब-याच बँका त्यांच्या इंटरनेट आणि टेलिफोन सेवेसाठी ठराविक मासिक रक्कम आकारतात. बँकेच्या इतर व्यवहारांसाठीही तुमच्याकडून पैसे घेतले जातात जरी ते एटीएम आणि बँकेच्या मानाने कमी असतात. पैशांच्या दळणवळणावर होणारा खर्च एटीएममुळे कमी होतो. वेळेत बिल भरल्यामुळे तुम्ही तुमचा वेळ आणि विलंबाची फी जी तुम्ही याआधी वेळेअभावी देत होता ती वाचवू शकता. इतर बँका त्यांच्या सेवेसाठी किती पैसे आकारतात ते पहा. त्यांची इंटरनेट फी कमी असेल तर यांचे इतर आकारणीही कमी आहे का ते पहा. जर तशा सोयी असतील तर या नव्या बँकेत तुम्ही खाते उघडू शकता. तुम्ही बँकेकडून आठवडयातून एकदा किंवा त्याहीपेक्षा कमी वेळा स्टेटमेंट मागून आकारणी आणखी कमी करू शकता. यामुळे तुमच्या खात्यात तुमची बिलं भरण्यासाठी पुरेसे पैसे आहेत हे तुम्हाला कळेल. मात्र ही बिलं अधिक असतील तर तुम्हाला बँकेलाही अधिक पैसे द्यावे लागतील.
बँकांतील व्यवहार ग्राहकांना मोबाइलच्या माध्यमातून करता येणाऱ्या सुविधेला मोबाइल बँकिंग किंवा एसएमएस बँकिंग म्हणतात. कारण या सुविधेमध्ये थेट कॉल न करता एसएमएसच्या सहाय्याने व्यवहार केले जातात. साधारणपणे बँका या सुविधेसाठी पैसे घेत नाहीत, एसएमएसचा खर्च मात्र पडतो. यामध्ये तुम्ही केलेला व्यवहार एसएमएसच्या माध्यमातून काही क्षणात ग्राहकाच्या मोबाइल स्क्रीनवर वाचता येतो. मोबाइल कंपन्यांच्या सहकार्यातून वेगवेगळ्या बँका ही सुविधा देतात, त्यामुळे बँकेचा ज्या कंपनीशी करार आहे, त्या मोबाइल कंपनीच्या माध्यमातूनच व्यवहार करता येतो. या माध्यमातून व्यवहारासाठी साधारणपणे बँकेत बचत, चालू वा फिक्स्ड डिपॉझिट प्रकारचे खाते असायला लागते.
ही सेवा देणाऱ्या बहुतेक बँका पुढील सेवा देतात :
इंटरनेट बँकिंग, मोबाइल बँकिंगच्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असतानाच आता बँकिंग जगताने नव्याने होऊ घातलेली टॅब्लेट क्रांती कॅश करण्याचा विचार केला आहे. त्यासाठी ‘टॅब बँकिंग’ ही नवी सेवा सुरू करून खासगी क्षेत्रात अग्रणी असलेल्या बँकांनी पहिले पाऊल टाकले आहे. या सुविधेमुळे ग्राहकांना आता खाते उघडण्यासाठी बँकांच्या शाखेत हेलपाटे न मारता घरच्या घरी किंवा कार्यालयातच ते उघडता येऊ शकेल. केवळ इतकेच नाही, तर आणखी चार नवीन सेवा बँकांनी उपलब्ध करून दिल्या आहेत.
ग्राहकांना अखंडित व आनंदपूर्ण अनुभव देण्यासाठी 5 एमपी कॅमेरा व जलद प्रोसेसर असलेला हाय-एंड कस्टमाइज्ड टॅब्लेट ही या उत्पादनाची वैशिष्ट्ये आहेत.बँक अधिकारी या टॅब्लेटमार्फत अर्ज भरण्यासाठी ग्राहकांना मदत करतात. यामध्ये बिल्ट-इन तपासणीची सोय आहे, ज्यामुळे अर्जातील सर्व तपशील बरोबर असल्याची आणि आवश्यक ती सर्व माहिती बरोबर घेतल्याची खात्री मिळते.
ग्राहकाचा फोटो घेण्यासाठी आणि त्याची केवायसी कागदपत्रे स्कॅन करण्यासाठी उपयोग. त्यामुळे प्रत्यक्ष दस्तऐवज सादर करण्याची गरज नाही. माहिती पूर्ण भरून झाली की, ती तातडीने बॅक-एंड यंत्रणेत अपलोड केली जाते आणि यामुळे बँक खाते उघडण्याची प्रक्रिया झटपट होण्यास मदत होते. बँकेच्या अधिका-यांना आमच्या इंटरनेट बँकिंग आणि मोबाइल बँकिंग माध्यमांविषयी व अन्य उत्पादनांविषयी ऑडिओ व्हिज्युअल प्रात्यक्षिक दाखवता येईल.
ग्राहकांच्या विविध प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी टॅब्लेटमध्ये विविध साधने व कॅल्क्युलेटर इन-बिल्ट आहेत. उदा. ज्या प्रकारे मासिक सरासरी बाकी मोजली जाते किंवा मुदत ठेवीचे व्याजदर कालावधीशी जोडले जातात वा ग्राहकांना ब्रँच लोकेटरविषयी सांगितले जाते.
बँकेने 24 * 7 इलेक्ट्रॉनिक शाखा दाखल केल्या आहेत, ज्या सर्व बँकिंग व्यवहारांसाठी वन-स्टॉप शॉप आहेत. ग्राहकांना त्यांच्या सोयीच्या वेळेनुसार, विविध ऑटोमेटेड उपकरणांच्या व किऑस्कच्या मदतीने स्वत:चे स्वत: व्यवहार करता येतील.
इलेक्ट्रॉनिक शाखा चेक डिपॉझिट मशीन, डेबिट कार्ड स्वाइप करून इंटरनेट बँकिंग सेवा वापरता येईल असे संवादात्मक किऑस्क, तातडीने पैसे जमा करणारे कॅश डिपॉझिट मशीन आणि आयसीआयसीआय बँकेच्या कस्टमर केअर कर्मचाºयासोबत चोवीस तास व्हिडिओ कॉन्फरन्सिंग अशा सुविधा देतात. सध्या 18 ठिकाणी 25 इलेक्ट्रॉनिक शाखा आहेत.
ग्राहकांना घरात बसून खाते उघडता येईल. फोटो काढण्यासाठी वा केवायसी कागदांच्या प्रती काढण्यासाठीही घराबाहेर जावे लागणार नाही. खाते उघडण्याची प्रक्रिया विनासायास असेल. ग्राहकांना प्रात्यक्षिक पाहता येईल. इंटरनेट व मोबाइल बँकिंग माध्यमांविषयी माहिती करून घेता येईल तसेच सर्व उत्पादने पाहून त्यातून योग्य त्या उत्पादनाची निवड करता येऊ शकेल. ज्या सर्व गोष्टी वेळ व ठिकाणाच्या सोयीनुसार करता येतील
माहिती संकलन : छाया निक्रड
अंतिम सुधारित : 8/25/2020
भारतीय राष्ट्रीय भुगतान महामंडळाने (National Payme...