महाराष्ट्र शासनाच्या ई-गव्हर्नन्स धोरण २०११ नुसार नागरिकांना जलद सुविधा उपलब्ध होणाच्या हेतूने आदिवासी विकास विभागाने अनुसूचित जमाती वैधता प्रमाणपत्र ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. सदर प्रमाण प्रणालीमुळे नागरिकांना जलद गतीने व पारदर्शी सुविधा मिळेलच पण त्याशिवाय या प्रणालीमुळे अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणीच्या कार्यक्षमतेमध्ये सुधारणाही होणार आहे.
०१ मे २०१६ पासून अनुसूचित जमाती करिता जात पडताळणीचे वेबपोर्टल बदलण्यात आले आहे. ते आदि'प्रमाण‘ प्रणाली या नावाने सुरु करण्यात आले आहे. पूर्वी TRTI Caste Validity च्या अधिकृत संकेत स्थळावरून अनुसूचित जमाती करिता जातपडताळणी अर्ज भरण्यात आले होते.
तरी ०१ मे २०१६ पासून नवीन संकेत स्थळाचा (आदि ‘प्रमाण‘ प्रणालीचा) वापर करून अनुसूचित जमाती करिता जात पडताळणी अर्ज सादर करण्यात यावा.
सदर अर्ज सादर करण्यासाठी आदि ‘प्रमाण‘ प्रणाली) या लिंकवर क्लिक करावे
प्रमाण प्रणाली वापराकररिता मार्गदर्गक पुस्तिका तयार करण्यात आलेली आहे. यामध्ये या प्रणालीची ठळक वैशिष्ठ्ये, नवीन नोदणी कशी करावी, पासवर्ड विसरला असल्यास तो कसा बदलावा, अर्ज कसा सादर करावा, कुठले कागदपत्र जोडावे, फोटो कसा टाकावा इत्यादीची माहिती दिलेली आहे. ती (मार्गदर्शक पुस्तिका) पाहण्यासाठी येथे क्लिक करावे -
स्त्रोत : आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र शासन
अंतिम सुधारित : 8/21/2020
उपलब्ध माहितीचे सूत्रबद्ध संकलन जीआयएसचे दुसरे न...
विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र मृत्यूचे प्रमाणपत्र वीज...
राज्यातील पोलीसांच्या कामात सुधारणा करण्याच्या उद्...
महाऑनलाईनमार्फत पुरवल्या जाणाऱ्या विविध नागरी सेवा...