माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अन्वये माहिती मिळविण्यासाठी विनंती

तुम्ही माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अन्वये कोणत्या ही सार्वजनिक आस्थापनांकडून (सरकारी संस्था किंवा सरकारी अनुदानप्राप्त संस्था) माहिती मिळवू शकता.

यासाठी लागणारा अर्ज हस्तलिखित असू शकतो किंवा टाईप केलेला असू शकतो.

अर्ज इंग्रजी, हिंदी किंवा संबंधित राज्याच्या अधिकृत भाषेत असावा.

तुमच्या अर्जात खालील माहिती पुरवा:

सहाय्यक लोकमाहिती अधिकारी/लोकमाहिती अधिकारी (पीआयओ) यांचे नाव व पत्ता

विषय: माहितीचा अधिकार अधिनियम २००५, सेक्शन ६ (१) अन्वये माहिती मिळविण्यासाठी अर्ज

तुम्हाला त्या संस्थेकडून/प्राधिकरणाकडून हवी असलेली विशिष्ट माहिती

अर्जदाराचे नांव

वडिलांचे/पतीचे नांव

वर्ग: अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/इतर मागासवर्गीय, इ.

अर्ज फी

तुम्ही दारिद्र्यरेषेखालील कुटुंबापैकी आहात का? हो/नाही

पत्रव्यवहाराचा पत्ता (मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी आवश्यक नाहीत)

तारीख आणि स्थळ

अर्जदाराची सही

सोबत जोडलेल्या कागदपत्रांची यादी

अर्ज करण्यापूर्वी सहाय्यक लोकमाहिती अधिकारी/लोकमाहिती अधिकारी यांचे नाव व पत्ता, उल्लेख केलेली फी व फी देण्याची पद्धत पुन्हा एकदा तपासून पहा.

माहितीच्या अधिकाराखाली माहिती मिळविण्यासाठी फी आकारण्याची तरतूद कायद्यात आहे मात्र अनुसूचित जाती/जमाती आणि दारिद्र्यरेषेखालील व्यक्तींकडून फी आकारण्यात येत नाही.

ज्यांना फीमाफी हवी असेल त्यांनी अर्जासोबत अनुसूचित जाती/जमाती/दारिद्र्यरेषेखाली असल्याचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.

अर्ज स्वतः जाऊन/पोस्टाने किंवा ई-मेलद्वारे दाखल करता येतो. जर तुम्ही अर्ज पोस्टाने पाठवत असाल तर नेहमी रजिस्टर पोस्टाचाच वापर करा. खाजगी कोरियर सेवा वापरणे सदैव टाळा.

तुमच्या संदर्भासाठी अर्जाच्या (मुख्य अर्ज, फी भरल्याचा पुरावा, सोबत जोडलेली कागदपत्रे, पोस्टाने अर्ज पाठवल्याचा पुरावा, इ.) दोन (2) छायांकित प्रती तयार करा व सुरक्षितपणे ठेवा.

जर तुम्ही अर्ज स्वहस्ते दाखल करणार असाल, तर एक पोचपावती तयार करा व त्यावर संबंधित कार्यालयाचा तारखेनिशी सही-शिक्का घ्या. जर अर्ज रजिस्टर पोस्टाने पाठवणार असाल तर ही पोचपावती अर्जासोबत जोडा आणि पोस्टाची अर्ज पाठवल्याची पावती व्यवस्थित जपून ठेवा.

लोकमाहिती अधिकार्याला अर्ज मिळाल्यापासूनच्या दिवसापासून अर्जावर कार्यवाही करून माहिती पुरवण्याची मुदत मोजतात.

खालील बाबीही लक्षात ठेवा

क्र.

परिस्थिती

माहिती पुरवण्यासाठी कालावधी

1

सर्वसामान्य परिस्थितींमध्ये माहिती पुरवणे

३० दिवस

2

एखाद्या व्यक्तीच्या स्वातंत्र्याशी किंवा जीवनाशी संबंधित विषयावर माहिती पुरवणे

४८ तास

3

जर अर्ज सहाय्यक लोकमाहिती अधिकार्यामार्फत (एपीआयओ) स्वीकारण्यात आला असेल तर

वरील दोन्ही परिस्थितींच्या कालमर्यादेमध्ये ५ दिवस आणखी जोडावेत.