অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

ई-कपास प्रकल्प

डॉ. सिद्धार्थ वासनिक, उज्ज्वल राजपूत
कापूस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत नवीन तंत्रज्ञानाचा प्रसार आणि उत्पादनवाढीसाठी सल्ला देण्यासाठी नागपूरच्या केंद्रीय कापूस संशोधन संस्थेतर्फे "टेक्‍नॉलॉजी मिशन ऑन कॉटन - मिनी मिशन - 1' या उपक्रमांतर्गत "ई-कपास' माहिती तंत्रज्ञान हा प्रकल्प देशातील 18 केंद्रांवर राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाद्वारा पीक परिस्थितीनुसार तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या मोबाईलवर स्थानिक भाषेत ध्वनिसंदेश (व्हाईस एसएमएस) मोफत पाठविण्यात येतात.

मोफत ध्वनिसंदेश सेवा ही योजना एप्रिल 2012 पासून सुरू झाली. या प्रकल्पात महाराष्ट्रासोबत अकरा राज्यांतील सुमारे एक लाख 25 हजार कापूस उत्पादकांनी ध्वनिसंदेशासाठी नोंदणी केली आहे. हे ध्वनिसंदेश स्थानिक भाषेत असल्यामुळे शेतकऱ्यांना उपयुक्त ठरले आहेत.

याबाबत मिळतो सल्ला

पीक लागवड तयारी, बियाण्यांची निवड, बीजप्रक्रिया, लागवडीची वेळ, पिकांतील अंतर, आंतरमशागत, रासायनिक खतांचा वापर, अन्नद्रव्यांचे प्रमाण, पाणी व्यवस्थापन, तण व्यवस्थापन, एकात्मिक कीड-रोग नियंत्रणाबाबत पीक परिस्थितीनुसार शेतकऱ्यांना संदेश पाठविण्यात येतात. यामुळे शेतकऱ्यांना योग्यवेळी सल्ला मिळतो आणि आर्थिक बचत होते.

या केंद्रांचा समावेश

1) केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर (महाराष्ट्र), 2) कापूस संशोधन केंद्र, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला (महाराष्ट्र), 3) वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी (महाराष्ट्र), 4) कापूस संशोधन प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी (महाराष्ट्र), 5) कापूस संशोधन केंद्र, कृषी विद्यापीठ, जुनागड (गुजरात), 6) कापूस संशोधन केंद्र, नवसारी कृषी विद्यापीठ, सुरत (गुजरात), 7) ओडिशा कृषी व तंत्रज्ञान विद्यापीठ, भवानीपट्टनम (ओडिशा), 8) विभागीय कृषी संशोधन केंद्र, राजमाता विजयाराजे सिंधीया कृषी विश्‍व विद्यालय, खंडवा (मध्य प्रदेश), 9) कृषी संशोधन केंद्र, स्वा. के. रा. कृषी विश्‍वविद्यालय, श्रीगंगानगर (राजस्थान), 10) कापूस संशोधन प्रकल्प, बासवाडा (राजस्थान), 11) चौधरी चरणसिंग हरयाणा कृषी विद्यापीठ, हिसार (हरियाना), 12) विभागीय केंद्र, के. का. सं. सं. सिरसा (हरियाना), 13) पंजाब कृषी विद्यापीठ, फरीदकोट (पंजाब), 14) आचार्य एन. जी. रंगा कृषी विद्यापीठ, गुंटूर (आंध्र प्रदेश), 15) विभागीय केंद्र, के. का. सं. सं. कोईम्बतुर (तमिळनाडू), 16) कृषी विद्यापीठ, धारवाड (कर्नाटक), 17) कृषी संशोधन केंद्र, कृषी विज्ञान विद्यापीठ, रायचूर (कर्नाटक), 18) तेलबिया संशोधन संचालनालय, राजेंद्रनगर, हैदराबाद (तेलंगाणा).


संपर्क - 9423680707, 9421836483, 9860557937 
डॉ. सिद्धार्थ वासनिक 
प्रमुख शास्त्रज्ञ व प्रमुख, "ई-कापूस' प्रकल्प, 
केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर. 
ई-मेल - ekapaswasnik@gmail.

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate