महाराष्ट्रात गेल्या पन्नास वर्षात साखर कारखानदारी बरोबरच उसाचे क्षेत्र, साखर उत्पादन यामध्ये भरीव वाढ झालेली दिसून येते. मात्र प्रती हेक्टरी ऊस उत्पादकतेमध्ये फारशी वाढ झाल्याचे दिसून येत नाही. आजही राज्याची सरासरी उत्पादकता एकरी ३५ टन एवढीच आहे. या परिस्थितीत उसाखालील क्षेत्र वाढविण्यापेक्षा उसाची प्रती हेक्टरी उत्पादकता वाढविणे अत्यंत गरजेचे आहे. महाराष्ट्रात उसाची लागवड सुरु, पुर्वहंगामी आणि आडसाली या तीन हंगामात केली जाते. या तीनही हंगामाची तुलना करता पूर्वहंगाम फायदेशीर असल्याचे दिसून येते .
उगवणीपासूनच पूर्वहंगाम उसास अनुकूल हवामान मिळते. त्यामुळे उगवण चांगली होऊन फुटवा दमदार येतो. खरीप हंगामामध्ये इतर पीक घेऊन किंवा पूरबुडीत क्षेत्रामध्ये पूर् ओसरल्यानंतर पूर्वहंगामी लागण करता येते. तसेच उन्हाळ्यामध्ये पाण्याचा ताण बसणा-या ठिकाणी पूर्वहंगामी ऊस ६ ते ७ महिन्यांचा झालेला असल्यामुळे हे पीक पाण्याचा ताण चांगल्या प्रकारे सहन करू शकते. तसेच कोड व रोग यांचा प्रादुर्भाव सुरु व खोडवा उसाच्या तुलनेत कमी राहतो. त्यामुळे पूर्वहंगामी उसाची उत्पादकता वाढविण्यासाठी जमिनीची निवड व पूर्वमशागतीपासून उसाच्या तोडणीपर्यंत पुढीलप्रमाणे योग्य ती काळजी व नियोजन करणे आवश्यक आहे.
उसासाठी मध्यम ते भारी मगदुराची व उत्तम निचन्याची जमीन असावी. अशा जमिनीची खोली ६0 ते १२0 सें.मी. असावी तसेच सेंद्रिय कर्बाचे प्रमाण O.५ टक्के पेक्षा जास्त असावे.
![]() | ![]() | ![]() |
---|
![]() | ![]() | ![]() |
---|
जमिनीची उन्हाळ्यात उभी व आडवी खोल नांगरट करावी. जमीन तापल्यानंतर ढेकळे फोडावीत. कुळवाच्या उभ्या-आडव्या पाळ्या घालून जमीन भुसभुशीत करावी व जमीन सपाट केल्यानंतर रिजरच्या साहाय्याने भारी जमिनीत १२0 ते १५0 सें.मी. व मध्यम जमिनीत १oo ते १२० सें.मी. अंतरावर स-या पाडाव्यात. पट्टा पद्धतीने लागवड करावयाची असल्यास मध्यम जमिनीसाठी २.५ ते ५.० फूट व भारी जमिनीसाठी ३ ते ६ फूट अशा जोडओळ पद्धतीचा अवलंब करावा. पट्टा पद्धतीचा आंतरपीक घेण्यासाठी व ठिबक सिंचन संच बसविण्यासाठी चांगला उपयोग होतो. यांत्रिक पद्धतीचा (पॉवर टिलर/लहान ट्रॅक्टर) वापर करावयाचा
असल्यास दोन सरीतील अंतर १२० ते १५० से.मी. (चार ते पाच फुटापर्यंत) ठेवावे.
पूर्वहंगामी उसाची लागवड करण्यासाठी फुले २६५, को. ८६0३२ (निरा) या मध्यम पक्वतेच्या आणि को. ९४o१२ (सावित्री), को. सी. ६७१, व्हीएसआय- ४३४ आणि याचवर्षी पूर्वप्रसारित करण्यात आलेला उसाचा नवीन वाण एमएस- १ooo१ या लवकर पक्व होणा-या सुधारित जातींची निवड करावी. वरील वाणाबरोबरच कोल्हापूर विभागासाठी को. ९२oo५ या वाणाचीही शिफारस करण्यात आलेली आहे.
पूर्वहंगामी उसाची लागवड १५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर या कालावधीतच करावी. ऊस लागवडीसाठी बेणे मळ्यातील बेणेच वापरावे. दर ३ ते ४ वर्षांनी ऊस बेणे बदलावे. उसाची लागवड एक डोळा किंवा दोन डोळ्यांची टिपरी वापरून करावी.
लागवड एक डोळा पद्धतीने करावयाची असल्यास दोन डोळ्यातील अंतर ३0 सें.मी. ठेवावे. शक्यतो कोरड्या पद्धतीने लागण करावी. डोळा वरच्या बाजूस ठेवून हलकेसे पाणी द्यावे. दोन डोळ्यांची टिपरी वापरावयाची असल्यास दोन टिपरीमधील अंतर १५ ते २० सें.मी. ठेवावे. यासाठी ओल्या पद्धतीने लागण केली तरी चालेल, मात्र टिपरी खोल दाबली जाणार नाहीत, याची काळजी घ्यावी. लागणीसाठी हेक्टरी दोन डोळ्यांची २५,000 टिपरी लागतील. एक डोळा पद्धतीने तयार केलेल्या रोपांची लागवड करावयाची असल्यास दोन रोपातील अंतर १.५ ते २ फूट ठेवावे व सरीतील अंतर ४ फूट ठेवावे. या पद्धतीने हेक्टरी १३,५०० ते १४,००० रोपे लागतील.
लागणीसाठी बेणे मळ्यात वाढविलेले ९ ते ११ महिने वयाचे निरोगी, रसरशीत आणि अनुवंशिकदृष्ट्या शुद्ध बेणे वापरल्यास ऊस उत्पादनात १५ ते २0 टक्के वाढ़ होते.
काणी रोगाचा बंदोबस्त करण्यासाठी तसेच कांडीवरील खवलेकोड व पिठ्याढेकूण यांच्या नियंत्रणासाठी १०० ग्रॅम कार्बन्डॅझिम व ३०० मि.ली. मॅलॅथिऑन किंवा डायमिथोएट १00 लीटर पाण्यात मिसळून बेणे १० मिनिटे बुडवावे. या प्रक्रियेनंतर ऑसिटोबॅक्टर १० किलो व स्फुरद विरघळविणारे जिवाणूखत १.२५ किलो १00 लीटर पाण्यात मिसळून तयार केलेल्या द्रावणात टिपरी ३० मिनिटे बुडवून नंतर लागवड करावी. जिवाणूखताच्या प्रक्रियेमुळे ५० टक्के नत्र व २५ टक्के स्फुरद खतांची बचत होते व उत्पादनात वाढ होते.
पूर्वहंगामी उसासाठी ५० ते ६० गाड्या चांगले कुजलेले शेणखत अगर कंपोस्टखत टाकून जमिनीत मिसळावे. यापैकी अर्धी मात्रा दुस-या नांगरटीपूर्वी द्यावी व उर्वरित मात्रा सरीमध्ये द्यावी. शेणखत अगर कंपोस्टखत उपलब्ध नसल्यास ऊस लागवडीपूर्वी ताग किंवा धैचा यासारखे हिरवळीचे पीक घेऊन जमिनीत गाडावे. उसासाठी रासायनिक खतांचे व्यवस्थापन पुढील तक्त्यामध्ये दिल्याप्रमाणे करावे. स्फुरद व पालाशयुक्त खते लागणीपूर्वी सरीत पेरून द्यावीत. नत्रयुक्त खतांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी नत्रयुक्त खते उसाच्या मुळाच्या सानिध्यात येतील अशा पद्धतीने द्यावीत. तसेच युरियाचा वापर करताना निंबोळी पेंडीचा ६: १ या प्रमाणात वापर करावा.
जमिनीचे माती परीक्षण करून घेतल्यानंतर सुक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता असणा-या जमिनीसाठी गरजेनुसार हेक्टरी २५ किलो फेरस सल्फेट, २० किलो झिंक सल्फेट, १० किलो मॅगनिज सल्फेट व ५ किलो बोरॅक्स चांगल्या कुजलेल्या शेणखतामध्ये (१o: १ प्रमाणात) ५ ते ६ दिवस मुरवून सरीत द्यावे.
अ.क्र. | खतमात्रा देण्याची वेळ | पूर्वहंगाम | ||
नत्र(युरिया) | स्फुरद (सिंगल सुपर फॉस्फेट ) | पालाश (म्युरेट ऑफ पोटँश | ||
१ | लागणीच्या वेळी | ३४(७४) | ८५(५३०) | ८५(१४०) |
२ | लागणीनंतर ६ ते ८ आठवड्यानी | १३६(२९५) | - | - |
३ | लागणीनंतर १२ ते ८१६ आठवड्यानी | ३४(७४) | - | - |
४ | मोठ्या बांधणीच्या वेळी | १३६(२९५) | ८५(५३०) | ८५(१४०) |
एकूण | ३४०(७३८) | १७०(१०६३) | १७०(२८२) |
पूर्वहंगामी उसामध्ये जमिनीच्या प्रकारानुसार रब्बी हंगामातील बटाटा,कांदा ,लसून,पानकोबी,वाटाणा,हरभरा इ. अंतरपिके घेता येतात.
उसामध्ये कांद्याच्या रोपांची लागण सरीच्या दोन्ही बाजूस १० ते १५ सें.मी. अंतरावर दुस-या पाण्याच्या वेळी करावी. मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव येथील प्रयोगावरून पूर्वहंगामी उसात बटाटा किंवा कांदा ही आंतरपिके फायदेशीर असल्याचे आढळून आले आहे. उसाची लागण करताना पट्टा पद्धतीने २.५ ते ५ किंवा ३ ते ६ फूट अशा जोडओळ पद्धतीने लागवड केल्यास पट्यामध्ये आंतरपीक आंतरपिकाच्या ओळीच्या संख्येनुसार व व्यापलेल्या क्षेत्रानुसार ठरवावे. तसेच आंतरपिकासाठी त्यांनी व्यापलेल्या क्षेत्रानुसार त्या-त्या पिकाची शिफारशीत रासायनिक खतांची मात्रा वेगळी द्यावी. ऊस पिकामध्ये ताग, र्धेचा यासारख्या हिरवळीच्या पिकांचा आंतरपीक म्हणून समावेश करता येतो व बाळबांधणीच्यावेळी हिरवळीची पिके सरीमध्ये गाडून बाळबांधणी करता येते. यामुळे जमिनीची सुपीकता टिकविण्यास मदत होते.
ऊस लागवडीनंतर ३ ते ४ दिवसांनी जमीन वापसावर असताना हेक्टरी ५ किलो अँट्रॅझीन किंवा मेट्रीब्युझिन हेक्टरी एक किलो ५०० लीटर पाण्यात मिसळून संपूर्ण जमिनीवर फवारणी करावी. ऊस उगवल्यानंतर हरळी किंवा लव्हाळा या तणांचा प्रादुर्भाव आढळून येतो. यासाठी १0 लीटर पाण्यात ८0 मि.ली. ग्लायफोसेट वापरावे. हे तणनाशक उसावर पडू देऊ नये. यासाठी प्लॅस्टिक हूड वापरून जमिनीलगत तणांवर फवारणी करावी. उसाच्या उगवणीनंतर आवश्यकतेनुसार तणांचा बंदोबस्त करावा. आंतरमशागतीमध्ये तणनियंत्रणाबरोबरच बाळबांधणी करणे अत्यंत महत्वाचे आहे. ऊस लागणीनंतर ३ महिन्यांनी कृषिराजसारख्या भर लागते, फुटव्यांची संख्या नियंत्रित होते व येणा-या फुटव्यांची वाढ जोमदार होते.
ऊस पीक ४ ते ४.५ महिन्याचे झाल्यानंतर पहारीच्या अवजाराने वरंबे फोडून व नंतर सायन कुळव चालवून आंतरमशागत करावी व रासायनिक खतांची मात्रा देऊन रिजरच्या साहाय्याने मोठी बांधणी करावी व पाणी देण्यासाठी स-या-वरंबे सावरुन घ्यावेत.
ऊस लागवडीपासून मोठ्या बांधणीपर्यंत सर्वसाधारणपणे पाण्याच्या पाळ्या ८ सें.मी. खोलीच्या द्याव्यात. त्यानंतर १o सें.मी. खोलीच्या पाणी पाळ्या द्याव्यात. हंगामानुसार उन्हाळ्यात ८ ते १० दिवसांनी, पावसाळ्यात गरजेनुसार १४ ते १५ दिवसांनी व हिवाळ्यात १८ ते २० दिवसांनी पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. यापेक्षा अधिक पाण्याचा वापर करु नये. पाण्याच्या जास्त वापरामुळे जमीन क्षारयुक्त बनते व अतिरिक्त पाण्याचा निचरा होऊन पाण्याबरोबर अन्नद्रव्यांचाही -हास होतो. त्यामुळे रासायनिक खतांची कार्यक्षमता कमी होते. ठिबक संचाचा वापर करावयाचा ठिबक सिंचनामुळे ५० टक्के पाण्याची बचत होते. तसेच ठिबक संचाद्वारे खते दिल्यास खतांमध्ये २0 टक्क्यांपर्यंत बचत होऊन ऊस उत्पादनात १५ ते २0 टक्के वाढ होते.
कार्बन्डॅझिमच्या बेणे प्रक्रियेमुळे उसातील काणी रोगाचा बंदोबस्त होतो. आडसाली उसात खोडकिडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास हेक्टरी ५ फुले ट्रायकोकार्डची १० दिवसांच्या अंतराने आवश्यकतेनुसार २ ते ३ प्रसारणे करावीत. हुमणीच्या नियंत्रणासाठी क्लोरोपायरीफॉस हेक्टरी २.५ लीटर १oo0 लीटर पाण्यात मिसळून जमीन वापश्यावर असताना सरीतून द्यावे, तसेच पहिला पाऊस झाल्यानंतर निम, बाभूळ व बोर या झाडांवरील मुंगेरे सामुदायिकरीत्या सायंकाळच्यावेळी गोळा करून नष्ट करावेत.
कांडी किडीच्या नियंत्रणासाठी हेक्टरी ५ फुले ट्रायकोकार्ड मोठ्या बांधणीनंतर दर १५ दिवसांनी ऊस तोडणीपूर्वी एक महिन्यापर्यंत लावावीत. पोंग्यातील पिठ्याढेकूण या किडीच्या बंदोबस्तासाठी मिथिल डिमेटॉन २५ टक्के प्रवाही ३२ मि.ली. किंवा डायमिथोएट 30 टक्के प्रवाही २६ मि.ली. किंवा मॅलॅथिऑन ५० टक्के प्रवाही २0 मि.ली. यापैकी कोणतेही एक कीटकनाशक १० लीटर पाण्यात मिसळून फवारावे. लोकरी माव्याच्या नियंत्रणासाठी कोनोबाथा, मायक्रोमस, डिफा अशा मित्रकीटकांच्या प्रत्येकी १ooo अळ्या किंवा कोष प्रती हेक्टरी शेतात सोडाव्यात. मित्रकीटकांची उपलब्धता नसल्यास फोरेट १o टक्के दाणेदार हेक्टरी १५ ते २0 किलो या प्रमाणात ९ महिन्यापर्यंतच्या उसास वापरावे किंवा मिथील डिमेटॉन २५ टक्के प्रवाही किंवा डायमिथोएट 30 टक्के प्रवाही यापैकी कोणतेही एक कीटकनाशक प्रत्येकी १0 लीटर पाण्यात
१५ मि.ली. या प्रमाणात मिसळून आलटून पालटून आवश्यकतेनुसार २ ते ३ वेळा फवारावे.
पूर्वहंगामी उसाची तोडणी १४ ते १६ महिन्यानंतर करावी. सध्या प्रचलित फुले २६५, को ८६०३२ आणि पूर्वप्रसारित एमएस १000१ या जातींचा वापर केल्यास हेक्टरी २00 टनांपर्यंत ऊस उत्पादन सहज मिळते.
स्रोत - कृषी विभाग महाराष्ट्र शासन
अंतिम सुधारित : 10/7/2020
दीडशे शेतकऱ्यांकडून मालाचे संकलन दररोज 800 किलो ...
उसाचे भरघोस उत्पादन घेण्यासाठी उसाला संतुलित खताचा...
रोपे तयार करण्यासाठी एक मी. रुंद आणि रोपांच्या संख...
कोव्हीएसआय - 03102 या जातीचे को 86032 या तुल्य जात...