पानवेल लागवडीसाठी सुपीक, उत्तम निचरा होणारी जमीन आवश्यक आहे. पानवेल लागवडीपूर्वी हिरवळीचे पीक घेतल्यास फायदेशीर ठरते. लागवडीपूर्वी जमिनीची योग्य मशागत करून पुरेसे चांगले कुजलेले शेणखत मिसळावे. पानमळा लागवडीच्या क्षेत्राचे नियोजन करून पानवेलीच्या सावली आणि आधारासाठी शेवरी, शेवगा, हादगा यांची लागवड जून, जुलै महिन्यांत पहिल्या आठवड्यात करावी. राज्यात बहुतेक ठिकाणी कपुरी जातीची लागवड केली जाते. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने "कृष्णा पान' ही जात विकसित केली आहे. या जातीची पाने आकाराने जाड व मोठी, पानांचा टिकाऊपणा चांगला, पानांचा आकार लंबगोलाकार असतो. याशिवाय कालीपत्ती, मिठापान, मघई, बनारसी, देशावरी आणि बांगलावर्गीय जातींची लागवड काही भागांत केली जाते.
पानवेलीची लागवड बेण्यापासून केली जाते. साधारणपणे चार वर्षे वयाच्या वेलीच्या शेंड्याकडील 45 सें.मी. लांबीचे चार पेराचे व पाच पाने असलेले रसरशीत फाटीदार जोमदार बेणे निवडावे. आधारासाठी लावलेल्या शेवगा, हदगा या झाडांची उंची दोन ते अडीच फूट झाल्यानंतर पावसाची रिमझिम चालू असताना ऑगस्ट महिन्यात वेलीची लागवड करावी. शेवरीच्या बुंध्याशी वाफ्याच्या बाजूस 25 ते 30 सें.मी. लांब आठ ते 10 सें.मी. रुंद आणि दहा सें.मी. खोल चर तयार करावा. यात शेणखत टाकावे. बेण्याचा शेंडा वर ठेवून अर्ध्यापेक्षा जास्त भाग चरात ठेवून व माती घालून पायाने दाबावे. दोन वेलींतील अंतर 60 सें.मी. ठेवावे. कांड्यावरील मुळे जमिनीकडील बाजूस येतील याची काळजी घ्यावी. पानमळ्याच्या चारही बाजूंस ताट्या बांधून निवारा करावा. पानवेलीचे बांधणी, आंतरमशागत, मातीची भर देणे आवश्यक आहे.
संपर्क -माहिती संदर्भ : अॅग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
अळूच्या लागवडीसाठी भरपूर सेंद्रिय पदार्थ असणारी, म...
सध्याच्या काळात मीठा बहराच्या अंजीर फळांच्या वाढीक...
तूर -तुरीचे घरचे बियाणे असल्यास पेरण्यापूर्वी उगवण...
मनीषा व देवनाथ जाधव या दांपत्याने तुती लागवड आणि र...