बिया असणाऱ्या फुलांच्या फुगीर भागास मराठीत कमळकाकडी म्हणतात. कमळाच्या कंदास कमळकंद म्हणतात, तर संस्कृतमध्ये कंदास शालूक म्हणतात.
लीच्या खोडास लांब धाग्यांसारखी, हिरवी मुळे फुटून ती खाली लोंबत असतात. खोड बोटांएवढे जाड असून, त्यावरील साल पातळ, त्वचेसारखी असते, नंतर तिचे पापुद्रे निघतात. खोडांवर लहान-लहान छिंद्रे असतात.
चिवळ ही वनस्पती ओलसर, पाणथळ जागेत शेतात व बागेत तण म्हणून वाढते. चिवळ कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, खानदेश या ठिकाणी महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात वाढते.
पेंढर ही वनस्पती श्रीलंका, भारत, पाकिस्तान, म्यानमार या देशांतील जंगलात आढळते. भारतातील गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, तमिळनाडू, आसाम येथील जंगलांमध्ये प्रामुख्याने आढळते.
भोकर ही वनस्पती भारत, श्रीलंका, इजिप्त, चीन, तैवान, इंडोनेशिया, म्यानमार, फिलिपिन्स, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, मलेशिया, जपान या देशांत आढळते.
शेवळा ही वनस्पती केरळ, कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र, गुजरात या राज्यांतील जंगलात आढळते. महाराष्ट्रामध्ये शेवळा वनस्पती कोकण, पश्चिम महाराष्ट्र व अकोला येथील जंगलात आढळते.
पाथरी ही रोपवर्गीय वनस्पती सर्वत्र आढळते. ही वनस्पती भारतातील सर्व पठारी प्रदेशात सावलीत, रेताड जमिनीत उगवते. पाथरी सुमारे ६० ते १७० सें.मी. उंच वाढते.
करमळ किंवा करंबेळचे मध्यम आकाराचे देखणे वृक्ष भारत, श्रीलंका, नेपाळ या देशांत आढळतात. भारतात करमळीचे वृक्ष कोकण, मलबार परिसरात, तसेच आसाम, बिहार या राज्यांतही नैसर्गिकपणे जंगलात वाढलेले आढळतात.
बांबू ही वनस्पती गवत कुळातील असून, तिचे आयुष्य शंभर वर्षे आहे. बांबू ही वनस्पती तिच्या जीवनक्रमात शंभर वर्षानंतर एकदाच फुले-फळे देते व नंतर बांबू पूर्णपणे वाळून जातो.
माचोळ ही वनस्पती भारत, पाकिस्तान, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका, ट्युनेशिया या देशात आढळते. भारतात गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, ओरिसा या राज्यात आढळते.
आंबुशी या वनस्पतीला ‘आंबुटी’, ‘आंबोती’, ‘चांगेरी’ अशीही स्थानिक नावे आहेत. आंबुशीला इंग्रजीमध्ये इंडियन सॉरेल असे म्हणतात.
आघाडा ही वर्षायू रोपवर्गीय वनस्पती असून, पावसाळ्यात जंगलात, ओसाड, पडीक जमिनीवर, रस्त्यांच्या कडेने, शेतात सर्वत्र आढळते.
कानफुटी ही वेलवर्गीय वनस्पती असून, पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात आढळते. या वनस्पतीचे वेल महाराष्ट्रातील जंगले, शेत आणि ग्रामीण भागात आढळते. ही वर्षायू वेल आहे.
करटोलीचे वर्षायू वेल जंगलामध्ये झुडपांवर वाढलेले आढळतात. या वेलींना जमिनीत कंद असतात. कंद बहुवर्षायू असून, औषधात वापरतात.
पावसाळ्यात पडीक- ओसाड जमिनीवर, रस्त्यांच्या कडेस, शेतात, कचऱ्याच्या ढिगांवर, सर्वत्र तण म्हणून काटेमाठ ही वनस्पती वाढलेली आढळते.
उष्ण, कोरड्या, कमी पाऊस पडणाऱ्या प्रदेशात गोखरू ही जमिनीवर पसरत वाढणारी रोपवर्गीय वनस्पती वाढते.
चुका ही वनस्पती ओसाड जमिनीमध्ये वाढलेली दिसते. तसेच काही ठिकाणी शेतात, बागेत लावली जाते. ही रोपवर्गीय वनस्पती एक ते दीड फुटापर्यंत उंच वाढते.
चुका ही वनस्पती ओसाड जमिनीमध्ये वाढलेली दिसते. तसेच काही ठिकाणी शेतात, बागेत लावली जाते. ही रोपवर्गीय वनस्पती एक ते दीड फुटापर्यंत उंच वाढते.
टाकळा ही वर्षायू वनस्पती ‘‘सिसाल-पिनेसी’’ म्हणजेच आपट्याच्या कुळातील आहे. टाकळा ही रोपवर्गीय वनस्पती एक ते दोन फुटांपर्यंत उंच वाढते.
नळीची भाजी ही वनस्पती तळी व तलावांच्या शेजारी, काठांवर, पाणथळ, ओलसर जमिनीवर, दलदलीच्या ठिकाणी वाढलेली आढळते.
भारंगी ही वनस्पती "व्हर्बेनेसी' म्हणजेच निर्गुडीच्या कुळातील आहे. भारंगीचे बहुवार्षिक झुडूप तीन ते पाच फुटांपर्यंत उंच वाढते.
रानभाज्या आज नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. रानभाज्यांची माहिती सर्वसामान्य जनतेला आज माहिती राहिलेली नाही.
मायाळू हा बहुवर्षायू वेल असून, या वनस्पतीची बागेत, अंगणात, परसात तसेच कुंडीत लागवड करतात. मायाळू वनस्पती आशिया व आफ्रिका खंडातील उष्ण कटिबंधीय प्रदेशात आढळते.
महाराष्ट्रात ही वनस्पती कोकण, पश्चिम घाट, खानदेश, मराठवाडा, विदर्भ या पाचही ठिकाणी शेतात, जंगल परिसरात, रस्त्यांच्या कडेने, ओसाड पडीक जमिनीवर, गावांत, गावाबाहेर सर्वत्र वाढलेली आढळते.
वसू ही रोपवर्गीय वर्षायू जमिनीवर पसरत वाढणारी वनस्पती आहे. ही हुबेहूब घोळ तसेच पुनर्नवा या वनस्पतींसारखी दिसते.
हादगा या रानभाजी विषयीची माहिती येथे देण्यात आलेली आहे.
सजीव सृष्टीतील प्रत्येक घटक एकमेकांशी व मानवाशी संबंधित असल्याने, जैव विविधतेतील प्रत्येक घटकाचे संरक्षण व त्याचे संवर्धन होणे आवश्यक आहे.