लसूण लागवडीसाठी मध्यम प्रतीची चांगल्या निचऱ्याची जमीन निवडावी. लागवडीपूर्वी जमिनीची चांगली मशागत करून हेक्टरी 20 टन शेणखत मिसळावे.
लागवडीसाठी गोदावरी, श्वेता, यमुना सफेद, ऍग्रिफाऊंड व्हाइट, फुले बसवंत या जातींची निवड करावी.
लागवड ऑक्टोबर - नोव्हेंबर महिन्यात केली जाते.
लागवड 15 x 10 सें.मी अंतराने करावी. लागवडीसाठी सहा क्विंटल बियाणे प्रति हेक्टरी लागते. लागवडीपूर्वी प्रति हेक्टरी 50 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश द्यावे.
लागवडीनंतर एक महिन्याच्या अंतराने 50 किलो नत्राची मात्रा द्यावी. या पिकावर कोळी, फुलकिडीचा प्रादुर्भाव दिसून येतो. वेळीच किडीचा प्रादुर्भाव ओळखून कीडनियंत्रण करावे. काहीवेळा करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसतो. यासाठी रोगाची लक्षणे ओळखून शिफारशीत बुरशीनाशकांची फवारणी करावी. योग्य व्यवस्थापन असेल तर हेक्टरी नऊ ते दहा टन लसणाचे उत्पादन मिळते.
संपर्क - 02426-243861
कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र,महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी
माहिती संदर्भ : अॅग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
काळी मिरीची काढणी कधी करावी याबाबतची माहिती येथे द...
आले पीक लागवडीपूर्वी पूर्वमशागत करताना जमीन भुसभुश...
कणगर लागवडीसाठी पाण्याचा निचरा होणारी, भुसभुशीत व ...
या विभागात आले या मसाला पिकाविषयी माहिती दिली आहे....