अंजन हा शिंबावंत वृक्ष लेग्युमिनोसी कुलातील असून याचे शास्त्रीय नावहार्डविकिया बायनॅटा आहे. या वृक्षाच्या फुलांची रचना बरीचशी लेग्युमिनोटी कुलामधील सीसॅल्पिनिऑइडी उपकुलातील वनस्पतींप्रमाणे आहे.
अडुळसा हे सदैव हिरवेगार असणारे, दोन ते तीन मीटर उंच वाढणारे झुडूप आहे.
इसबगोलाचे बी शीतल, शामक, मूत्रल (लघवी साफ करणारे) असून पचनसंस्था, मूत्रमार्ग यांच्या तक्रारींवर व आमांश, अतिसार, बद्धकोष्ठता इत्यादींवर वापरतात.
बारीक व मजबूत धागा काढतात; तो अंबाडीच्या धाग्याप्रमाणे उपयुक्त असतो.ही वेल कफोत्सारक, वांतिकारक व कृमिनाशक असते. पानांचा काढा मुलांना दम्यावर व पानांचा रस अतिसारावर देतात.
एरंड ही वर्षायू किंवा बहुवर्षायू वनस्पती युफोर्बिएसी कुलातील आहे. तिचे शास्त्रीय नाव रिसिनस कम्युनिस असे आहे. ही मूळची आफ्रिकेतील असून उष्ण प्रदेशातील बहुतेक देशांमध्ये आढळते.
या विभागात विविध औषधी पिकांविषयी - आवळा, अश्वगंधा, भुई आवळा, पत्थरफोड, इसबगोल, कलीहारी, पिंपळी, सफेद मुसली, सेना शतावरी इ. पिकांविषयी माहिती दिली आहे.
भारतात वनस्पतिजन्य औषधी व औषधी वनस्पतीच्या कच्च्या मालांची वार्षिक सुमारे ३००० कोटींचा उलाढाल आहे.
कदंबाचे खोड सरळ व १२-२१ मी. उंच असते. घेर १.८-४.५ मी. असतो. फांद्या लांब व जमिनीला समांतर पसरलेल्या असतात, हे या झाडाचे वैशिष्टय आहे.
कवठ हा मध्यम उंचीचा वृक्ष रूटेसी कुलातील असून फेरोनिया एलेफंटम या शास्त्रीय नावाने ओळखला जातो. सामान्यपणे इंग्रजीत या वृक्षाला कर्ड फ्रूट किंवा मंकी फ्रूट असे म्हणतात.
मुसळीची काळी मुळे शक्तिवर्धक, वीर्यवर्धक, मूत्रल (लघवी साफ करणारी) व उत्तेजक असून वातविकार, पित्तविकार, आमांश, संधिवात, उसण भरणे, कुत्र्याच्या चावण्याने (विषामुळे) आलेला जलद्वेष, रक्तस्त्राव इत्यादींवर उपयुक्त असतात.
लिलिएसी कुलातील या वनस्पतीचे शास्त्रीय नाव अॅलो वेरा असे आहे. तिला कुमारी असेही म्हणतात. या बहुवर्षायू लहान मांसल वनस्पतीचे मूलस्थान भूमध्यसामुद्रिक प्रदेश असून उष्ण कटिबंधात ती सर्वत्र पसरलेली आहे.
गवती चहाची लागवड वर्षभर करता येते. लागवडीसाठी मध्यम काळी, पोयट्याची जमीन निवडावी. लागवडीपूर्वी जमिनीत पुरेसे शेणखत मिसळावे.
किनारपट्टीतील उत्तम निचरा होणाऱ्या गाळाच्या, तसेच जांभ्या दगडापासून तयार झालेल्या लाल जमिनीमध्ये जायफळाची लागवड होऊ शकते. पोयट्याची आणि पालापाचोळा कुजून तयार झालेली जमीन चांगली मानवते.
नारळाच्या व सुपारीच्या बागेत जायफळाची लागवड चांगल्या प्रकारे करता येते.
नागकेशर हा अत्यंत देखणा, मध्यम उंचीचा सदाहरित वृक्ष आहे. या वृक्षाचे खोड एक ते दोन मीटरपर्यंत सरळ वाढते.
औषध निर्मिती, सौंदर्य प्रसाधने, साबण उद्योग, इंजिन तेल, इमारती बांधकाम इत्यादींसाठी नागकेशराच्या विविध भागांचा वापर केला जातो.
निर्गुडी ही वनस्पती लॅमिएसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव व्हायटेक्स निगुंडो आहे
पानवेल लागवडीसाठी सुपीक, उत्तम निचरा होणारी जमीन आवश्यक आहे. पानवेल लागवडीपूर्वी हिरवळीचे पीक घेतल्यास फायदेशीर ठरते.
आवळा तुरट, आंबट चवीचे, हिवाळ्यात येणारे हिरव्या रंगाचे बहुउपयोगी औषधी फळ आहे. जीवनसत्व “क” चे हे भांडार आहे.
आयुर्वेदिक आणि युनानी यांसारख्या भारतीय औषध प्रणालीचा वापर कित्येक देशांमध्ये वाढला आहे. त्यामुळे जागतिक बाजारपेठेत औषधी वनस्पतींना मागणी वाढली आहे.
बिब्बा हा मध्यम उंचीचा वृक्ष असून, पाच ते सात मीटरपर्यंत वाढतो.
या विभागात मधुपर्णी या औषधी वनस्पती पिकाविषयी माहिती दिली आहे. मधुमेहींसाठी हि एक खूप उपयोगी अशी औषधी वनस्पती आहे.
वैदिक काळापासून आपल्याकडे वनौषधींचा वापर होत आलेला आहे. तसेच, भारतातील ऋषिमुनींनी आयुर्वेद ही जगाला दिलेली देणगी आहे.
वाळा ही बहुवार्षिक गवतवर्गीय वनस्पती असून व्यापारीदृष्ट्या वाळा या वनस्पतीच्या मुळांतील सुगंधी तेलाला फार मोठी मागणी आहे.
हलकी गाळाची व दुमट जमीन ह्या पिकास चांगली असते. मागील वर्षातील खोडांची शेंडे सु. ३० सेंमी अंतराने लावतात; तत्पूर्वी प्रथम एकदा पाणी देऊन शेत नांगरतात व हिरवे खत देतात.
शतावरीची लागवड वर्षभर करता येते.लागवडीसाठी पोयट्याची वाळूमिश्रित जमीन निवडावी.
शतावरी ही वनस्पती भारतात सुमारे दोन हजार वर्षांपासून परिचित आहे. शतावरीच्या सेवनाने माणसाची कार्यशक्ती शतगुणित होते. ही वनस्पती औषधीदृष्ट्या महत्वाची आहे.
सुपारी लागवडीसाठी श्रीवर्धनी ही जात निवडावी. या जातीची सुपारी मोठी असून, तिच्यामध्ये पांढऱ्या गराचे प्रमाण जास्त असून, ही सुपारी मऊ आहे.