नत्र - झाडांची खालची पाने पिवळी होतात, मुळांची व झाडांची वाढ थांबते, फूट व फळे कमी येतात.
नैसर्गिक स्रोतांचा वापर करून पीक उत्पादनवाढ आणि त्याची गुणवत्ता सांभाळताना जमिनीचे आरोग्य टिकवून ठेवणे महत्त्वाचे आहे.
या विभागात गावाचा सुपीकता निर्देशांक कसा काढतात तसेच त्याचे काय फायदे आहेत यासंबधी माहिती दिली आहे.
फक्त रासायनिक खते वापरल्यास जमिनीचे आरोग्य चांगले राहत नाही, तसेच निव्वळ सेंद्रिय खतांमधून आवश्यक तेवढ्या प्रमाणात अन्नद्रव्यांचा पुरवठा होऊ शकत नाही.
पिकामध्ये प्रत सुधारण्याच्या दृष्टीने पालाश महत्त्वाचे आहे. फळांचा आकार वाढविणे, रंग आकर्षक करणे, टिकवणक्षमता वाढविण्यासाठी पालाश हा घटक महत्त्वाचा आहे.
माती हा अत्यंत महत्त्वाचा पण नेहमीच दुर्लक्षित राहिलेला स्त्रोत आहे. या घटकाकडे जगभरातील लोकांचे लक्ष वेधणे तसेच मातीच्या संवर्धनाची असलेली गरज याबाबत जनजागृती करणेसाठी 5 डिसेंबर हा 'जागतिक मृदा दिन' म्हणून साजरा करण्यात येतो.
या विभागात माती परीक्षण करण्यासाठी मातीचे नमुण्याची जागा कशी निवडावी, नमुने कसे घ्यावेत इ. संबधी माहिती दिली आहे.
मातीचा नमुना घेण्यासाठी वापरण्यात येणारी अवजारे उदा: फावडे, कुदळ, घमेले, खुरपी इत्यादी स्वच्छ असावीत.
गाळमातीचा वापर करताना फक्त हलक्या आणि कमी पाणी साठवणक्षमता असलेल्या जमिनीस प्राधान्य द्यावे.
सुत्रकृमी लांब धाग्यांप्रमाणे असून उघडया डोळयाने दिसू शकत नाही. सुत्रकृमींची लांबी 0.20 ते 1.10 मिलीमीटर असून व्यास 0.005 ते 0.01 मिलीमीटर असते.