राज्यातील शेतक-यांना शेतीशी निगडीत अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. यामध्ये सिंचन व्यवस्थेचा अभाव, अल्प जमिनधारणा, मोठया प्रमाणावरील हलक्या प्रतीची जमिन, कमी उत्पादकता ही कारणे आहेत. हे लक्षात घेता राज्य शासनाने पर्यायी पिक पध्दती, सुक्ष्म सिंचन, कृषि प्रक्रिया व पणन हे कृषि धोरणाचे मुख्य उद्दिष्ट म्हणून स्विकारलेले आहे. आणि त्यासाठी सतत प्रयत्न केले जात आहेत. तसेच जागतिक व्यापार करारानंतर प्रत्येक स्तरावर शेती व्यापारक्षम करणे अपरिहार्य झालेले आहे.
राज्यातील सुमारे १ कोटी शेतक-यांपैकी ७० टक्के शेतकरी लघु व सिमांतक आहेत. या शेतक-यांना नविन तंत्रज्ञान वापरण्यासाठी प्रवृत्त करण्याचे मोठे आवाहन कृषि विभागापुढे आहे. यास्तव शासनाने अनेक नविन उपक्रम सुरु करण्याचे ठरविले आहे. यामध्ये केंद्र शासनात ज्याप्रमाणे छोटया शेतक-यांसाठी लघु कृषि व्यापार संघ स्थापन केलेला आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्र राज्यात देखील शासन निर्णय क्रमांक SFAC-2003/CR-91/14-A दिनांक १६ मार्च, २००५ अन्वये महाराष्ट्र राज्य छोटया शेतक-यांचा कृषि व्यापार संघाची स्थापना करण्यात आलेली आहे. सदर संघाची नोंदणी सोसायटी रजिस्ट्रेशन ऍक्ट १८६० मधील तरतुदीनुसार करण्यात आलेली असून प्रधान सचिव (कृषि) हे कृषि व्यापार संघाचेअध्यक्ष आहेत. कृषि व्यापार संघाचे पूर्ण वेळ कामकाज पहाण्यासाठी व्यवस्थापकीय संचालकांची नियुक्ती करण्यात आलेली असून संघाचे कार्यालय कृषि भवन, शिवाजी नगर, पुणे येथे स्थापन करण्यात आलेले आहे.
छोटया शेतक-यांच्या कृषि व्यापार संघाचे अध्यक्ष प्रधान सचिव (कृषि) असुन व संघाचे इतर सदस्य खालीलप्रमाणे आहेत.
अ. क्र. |
पदनाम |
पद |
१ |
सहसचिव, केंद्रिय अन्न प्रक्रिया उद्योग विभाग, दिल्ली |
सदस्य |
२ |
सचिव (उद्योग) |
सदस्य |
३ |
सचिव, सहकार व वस्त्रोद्योग विभाग (पणन, मुंबई) |
सदस्य |
४ |
विकास आयुक्त (उद्योग) संचालनालय |
सदस्य |
५ |
राज्यातील चार कृषि विद्यापीठांचे कुलगुरु व प्रतिनिधी |
सदस्य |
६ |
आयुक्त (कृषि) म. रा. पुणे |
सदस्य |
७ |
मुख्य कार्यकारी अधिकारी MAIDC |
सदस्य |
८ |
व्यवस्थापकीय संचालक MIDC |
सदस्य |
९ |
व्यवस्थापकीय संचालक, पणन मंडळ, म. रा. पुणे |
सदस्य |
१० |
सरव्यवस्थापक, नाबार्ड बँक व प्रतिनिधी |
सदस्य |
११ |
संचालक, अपेडा, नवि दिल्ली |
सदस्य |
१२ |
संचालक, NHB Gurgaon व प्रतिनिधी |
सदस्य |
१३ |
संचालक,EXIM Bank, Mumbai |
सदस्य |
१४ |
कृषि व्यापाराशी निगडीत दोन प्रगतीशील शेतकरी |
सदस्य |
१५ |
अन्न प्रक्रिया उद्योगाचे प्रतिनिधी |
सदस्य |
१६ |
छोटया शेतकर्यांचा संघ, दिल्ली यांचे प्रतिनिधी |
सदस्य |
१७ |
संचालक फलोत्पादन |
सदस्य |
१८ |
व्यवस्थापकी संचालक, म. रा. छो. शे. व्यापार संघ |
सदस्य सचिव |
छोटया शेतक-यांच्या कृषि व्यापार संघाच्या कामासाठी केंद्र व राज्य शासनाने प्रत्येकी ५०.०० लाख असे एकुण 1 कोटी रुपये Corpus Fund म्हणुन उपलब्ध करुन दिलेले असुन त्यावरील मिळणा-या व्याजावर संघाचे प्रशासकीय व इतर बाबींवरील खर्च भागविण्यात येतो.
छोटया शेतक-यांच्या कृषि व्यापार संघाची उदिदष्टये खालीलप्रमाणे आहेत.
महाराष्ट्र राज्य छोटया शेतक-यांचा कृषि व्यापार संघामार्फत व्हेंचर कॅपिटल सहाय्य योजना राबविण्यात येते.या योजनेअंतर्गत उद्यान विकास,पुष्प विकास,औषधी वनस्पती,सुगंधी द्रव्य उत्पादन,रेशीम उत्पादन,सेंद्रीय शेती,गांडुळ खत,मधुमक्षीका पालन व मत्स पालन या संदर्भातील प्रक्रिया उद्योग/प्रकल्पास सहाय्य केले जाते.व्हेंचर कॅपिटल योजनेअंतर्गत खालीलप्रमाणे अर्थसहाय्य केले जाते.
अर्थसहाय्य - कृषि उद्योग प्रकल्पाच्या एकूण खर्चाच्या १० टक्के. अथवा प्रकल्पातील उद्योजकाच्या भाग भांडवलाच्या २६ टक्के. या दोन्हीपैकी जी रक्कम कमी असेल तेव्हढे भागभांडवल मंजुर केले जाईल.
कमाल मर्यादा रु.७५ लाख.
प्रकल्प खर्च मर्यादा - या योजनेअंतर्गत अर्थसहाय्यासाठी प्रकल्पांची खर्च मर्यादा किमान रु.५० लाख निर्धारीत करण्यात आलेली आहे.उपरोक्त प्रकल्पास राष्ट्रीयकृत बँकेने कर्जमंजुरी दिलेली असावी.
प्रकल्प अहवाल सुविद्या
व्हेंचर कॅपिटल सहाय्य योजनेअंतर्गत सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करुन घेण्यासाठी रु.५ लाखापर्यंत अर्थसहाय्य देण्यात येते.सदर सुविद्येचा लाभ घेण्यासाठी कर्ज देणा-या राष्ट्रीयकृत बँकेचे शिफारसपत्र आवश्यक असुन प्रकल्प अहवाल एसएफएसी नवी दिल्ली यांनी ठरवुन दिलेल्या सल्लागाराकडुन तयार करुन देण्यात येतो.
प्रकल्प अहवाल तयार करणा-या सल्लागारांची यादी खालीलप्रमाणे आहे -
1 |
कृष्णा व्हॅली ऍडव्हान्सड ऍग्रीकल्चर फौंडेशन |
पी-३३,३४,३५ एमआयडीसी,कुपवाड भाग,सांगली. |
श्री.एन.जी.कामथ |
२ |
मिटकॉन |
कुबेरा चेंबर्स,१ ला मजला शिवाजीनगर,पुणे-५. |
श्री.अशोक बारगजे |
३ |
एन्टरप्रनरशिप |
व्हिलेज भट जवळ,वाया अहमदाबाद, |
मनोज मिश्रा |
४ |
सेंटल फुड |
सेंटल फुड टेक्नॉलॉजिकल रिसर्च इन्स्टीटयुट, |
टी.आर.प्रभु |
५ |
ज्राबार्ड |
छारा/नाबार्ड प्लॉट नं.सी-२४,जी ब्लॉक, |
एस.एम.सेवकंद मुख्य कार्यकारी अधिकारी |
या योजनेद्वारे पुढील व्यक्ती किंवा संस्था यांना अर्थसहाय्य मिळु शकते,
शेतकरी, उत्पादकगट,भागीदारी/मालकीचे उद्योग,स्वयंसहाय्यता गट,कंपनी,कृषि उद्योजक,व्यक्तिगत कृषि पदवीधर अथवा कृषि पदवीधरांचा गट.
एसएफएसी बरोबर करार केलेल्या राष्टीयकृत बँका
लघु कृषक व्यापार संघ,नवी दिल्ली यांनी खालील बँकांबरोबर सामंजस्य करार (Memorandum of Understanding) केलेला आहे.
याशिवाय इतरही राष्ट्रीयकृत बँकामार्फत कर्ज प्रकरण मंजुर केल्यास अशाही प्रकल्पांना व्हेंचर कॅपिटल सहाय्य उपलब्ध करुन दिले जाते.
व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य छोटया शेतक-यांचा कृषि व्यापार संघ,
कृषिभवन,शिवाजीनगर,पुणे-५.
दुरध्वनी व फॅक्स क्र.०२०-२५५३३४३०
वेबसाईट. http://mahaagri.gov.in
व्यवस्थापकीय संचालक,
लघु कृषक व्यापार संघ,
एनसीयुआय,ऑडीटोरियम बिल्डींग,
५ वा मजला,३,सिरी इन्स्टीटयुशनल एरिया,
ऑगस्ट क्रांती मार्ग, हाऊजखाज,नवी दिल्ली-११००१६.
दुरध्वनी क्र.०११-२६८६२३६५
फॅक्स क्र.०११-२६८६२३६७
वेबसाईट. www.sfacindia.com
स्त्रोत : - महाराष्ट्र राज्य छोट्या शेतकर्यांचा कृषी व्यापार संघ
अंतिम सुधारित : 7/19/2020
नगर जिल्ह्यातील बलभीम पठारे यांना पारंपरिक पीक पद्...
प्रगतिशील शेतकरी कुलदीप राजाराम राऊत यांनी विदर्भा...
कपाशीत सापळा पीक म्हणून वापर होणाऱ्या अंबाडी पिकाप...
पुणे येथील राजलक्ष्मी भोसले यांनी आपल्या 35 गुंठे ...