शेतकऱ्यांसाठी शेतीपूरक व्यवसाय करण्याकरिता शेती कौशल्य वृद्धी संदर्भातील प्रशिक्षण देऊन शेतीबरोबरच इतर व्यवसायाच्या सहाय्याने त्यांच्या वार्षिक उत्पन्नात भरीव वाढ होऊन त्यांचे राहणीमान उंचावण्याचे या योजनेचे उद्दिष्ट आहे. अधिक माहितीसाठी पुढील लिंक वर क्लिक करावे.
शेतीपूरक व्यवसायासाठी कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम सन २०१४-२०१५ मार्गदर्शक सूचना
राज्यात शेतकऱ्यांची कमी होणारी जमीन धारणा, शेतीसाठी भांडवल पुरवठा करण्यात येणाऱ्या मर्यादा, तांत्रिकीकरणासाठी अपुरा वाव तसंच जमिनीची कमी होत असलेली उत्पादकता आणि कृषी विस्ताराच्या मर्यादा या सर्व गोष्टींचा विचार करुन समुह शेतीला चालना देण्यात यावी या विचारानं ही योजना तयार करण्यात आली आहे. या योजनेचा उत्पादनवाढीला फायदा होईल.
योजनेची उद्दीष्ट्ये
1) शेतकऱ्यांना बाजारपेठेतील स्पर्धात्मक वातावरणात टिकण्यासाठी संघटन करुन उत्पादन आणि विक्री व्यवस्था निर्माण करणे.
2) शेतीची उत्पादकता वाढवणं.
योजनेचा लाभ-
1) शेतीचं आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या समुहापर्यंत पोहोचवण्यात येईल.
2) शेतकऱ्यांचे वयक्तीक प्रश्न सोडवण्यालाही चालना मिळणार आहे.
3) हवामान, पिक उत्पादन, तंत्रज्ञान किड आणि रोग नियंत्रण या संदर्भातली माहीती शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईलवरुन देण्यात येईल.
अधिक माहितीसाठी पुढील लिंक वर क्लिक करावे.
शेतकऱ्यांच्या समूह / गट शेतीस चालना देण्याची योजना सन २०१४-२०१५
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
संदर्भ : कृषी विभाग महाराष्ट्र शासन
अंतिम सुधारित : 7/4/2020
सदर योजना महाराष्ट्र राज्यात सन २००४-०५ पासून राबव...
भारत हा कृषी प्रधान देश आहे. यासाठी कृषी विकासासाठ...
गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्येक ग्रामपंचायत...
अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी (वन हक्कम ...