पॅकेजिंगमध्ये वनस्पतिजन्य तेलांचा वापर केल्यास अन्नपदार्थांची साठवण अधिक काळापर्यंत करणे शक्य असल्याचे अमेरिकेतील संशोधकांना दिसून आले आहे. त्याचे निष्कर्ष "जर्नल ऑफ फूड सायन्स'मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे वनस्पतीच्या मुळे, पाने, बिया, फळे, साली यांसारख्या विविध भागांतून तैलिय द्रव उपलब्ध होतात. या सुगंधी आणि आरोग्यदायी तेलामध्ये सूक्ष्मजीवांच्या वाढीला विरोध करण्याची क्षमता असल्याचे अमेरिकेतील "इन्स्टिट्यूट ऑफ फूड टेक्नॉलॉजिस्ट' या "ना नफा' तत्त्वावरील संस्थेतील संशोधक फाकवत टोंगनुआनचॅन आणि सुट्टावत बेन्जाकुल यांनी केलेल्या अभ्यासात दिसून आले आहे. या तेलांचा वापर विविध प्रकारच्या पॅकेजिंग घटकांमध्ये केल्यास पदार्थांची साठवण अधिक काळ करणे शक्य होते. तैल
घटकांमुळे पॅकेजिंगमधील अन्नपदार्थांतून होणारे बाष्पीभवन रोखण्याचे गुणधर्म वाढतात. तसेच हे तेल पॅकेजिंगची ताकद वाढवितात. त्याचप्रमाणे पॅकेजिंगची तन्यता व पारदर्शकता कमी करतात. अर्थात, सूक्ष्मजीवांची वाढ रोखली गेल्याने पॅकेजिंगमधील अन्नपदार्थ व शेतीमालाचे नुकसान टाळले जाते.
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
तमिळनाडू आणि आंध्र प्रदेश ही राज्ये नारळ लागवड आणि...
गवती चहाची लागवड वर्षभर करता येते. लागवडीसाठी मध्य...
शरीरात ग्लुकोजप्रमाणेच स्निग्ध पदार्थापासून स्निग्...
मोहरी पेंड व माशांच्या उर्वरित अंशापासून अधिक दर्ज...