उसासाठी ठिबक सिंचनातून खते देताना...
- ठिबकद्वारा पाण्यात विरघळणारी खते दिल्यास खतांचे नुकसान कमी होऊन पिकांच्या मुळाशेजारी अन्नद्रव्ये दिली जातात. नेहमी जमिनीत वाफसा स्थिती राहिल्यामुळे हवा, पाणी यांचे संतुलन राहून अन्नद्रव्यांचे शोषण चांगले होते. शिफारशीत खतमात्रेत 30 टक्के बचत करता येते.
- ऊस पिकाला शिफारशीच्या 70 टक्के नत्र, स्फुरद आणि पालाशची मात्रा साधारण 15 दिवसांनी 13 समान हप्त्यांत विभागून द्यावी म्हणजेच ऊस लागवडीपासून प्रत्येक 15 दिवसांनी साधारण 15 किलो युरिया आणि सहा किलो पांढरे म्युरेट ऑफ पोटॅश द्यावे. स्फुरद हा फॉस्फोरिक आम्लाच्या माध्यमातून प्रत्येक हप्त्यात सहा किलो प्रमाणात द्यावा. फॉस्फोरिक आम्ल उपलब्ध न झाल्यास सिंगल सुपर फॉस्फेट एकरी 200 किलो लागवडीअगोदर आणि 200 किलो मोठी बांधणी करताना जमिनीतून द्यावा.
- अनुदानीत खतांशिवाय बाजारात विद्राव्य खते उपलब्ध आहेत. उदा. सल्फेट ऑफ पोटॅश, पोटॅशियम नायट्रेट, युरिया, अमोनिअम नायट्रेट, अमोनियम फॉस्फेट, 19-19-19 इत्यादी.
- पाण्यात पूर्णपणे विरघळणारी ठिबकच्या तोट्या बंद होऊ नयेत म्हणून क्षाराचे प्रमाण कमी असणारी आणि पाण्याच्या प्रतीप्रमाणे कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे प्रमाण जास्त असल्यास अमोनिअम फॉस्फेटचा वापर करू नये. चुनखडीयुक्त जमिनीत कॅल्शियम अमोनिअम नायट्रेटचा वापर टाळावा. उपलब्ध विद्राव्य खते ठिबकमधून देण्यास जरी चांगली असली तरी होणारा खर्च आणि मिळणारे उत्पादन आणि मिळणारा फायदा यांचाही विचार होणे आवश्यक आहे.
- माती परीक्षणानुसार मुख्य अन्नद्रव्यांची कमतरता आढळत असेल तरच कमतरता असलेले सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खत कंपोस्ट खतात मिसळून जमिनीतून द्यावे. महाराष्ट्रात साधारण झिंक, लोह, बोरॉन इत्यादी सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता आढळून येते. झिंकची कमतरता असल्यास एकरी 8 किलो झिंक सल्फेट, लोहाची कमतरता असल्यास 10 किलो फेरस सल्फेट आणि बोरॉनची कमतरता असल्यास एकरी दोन किलो बोरॅक्सचा वापर करावा.
- अन्यथा, सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर उसावर द्रवरूप खतांची फवारणी करूनच द्यावा. त्याचा पिकांवर चांगला परिणाम होतो.
- चुनखडीयुक्त जमिनीत फेरस सल्फेट किंवा झिंक सल्फेटचा जमिनीतून दिल्यास त्याचा फारसा फायदा होत नाही. यासाठी मल्टिमायक्रोन्युट्रिएंट द्रवरूप खताची फवारणी अधिक फायद्याची दिसते.
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या
तार्यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.
© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.