অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पाणलोट क्षेत्र आधारित मृद व जलसंधारणाचे विविध उपचार

पाणलोट क्षेत्र आधारित मृद व जलसंधारणाचे विविध उपचार

प्रस्तावना

शेती उत्पादनाठी प्रामुख्याने जमीन, पाणी व हवामान या महत्वाच्या नैसर्गेिक साधनसंपत्तीची अत्यंत आवश्यकता आहे. जमीन ही मूलभूत साधनसंपत्ती असून त्यावर आपली शेती व शेतीउत्पादन अवलंबून असल्यामुळे या भुधनाची काळजी व त्याचे व्यवस्थापन योग्यरितीने करणे अत्यंत महत्वाचे आहे. वाढ्ती लोकसंख्या विचारात घेता अन्नधान्याची गरज भागविणे अपरिहार्य व गरजेचे आहे. यासाठी भूधनाची योग्य निगा, व्यवस्थापन केले तर जमिनीवर पडणारे पाणी योग्यरितीने साठवून व त्याचा वापर करून पेिकाच्या वाढ़ीसाठी लागणा-या पाण्याची गरज भागवेिता येणे शक्य होईल.

अयोग्य व पडीक जमिनीवर घेण्यात येणारे उपचार

पर्यायाने अधिक उत्पादन मिळवेिता येईल. महाराष्ट्रात सन १९४२ साली जमीन सुधारणा कायदा अस्तित्वात आल्यानंतर विविध मृद व जलसंधारण उपचार सुरु करण्यात आले. त्यामध्ये जमिनीची धूप थांबविणे हा मुख्य हेतू गृहीत धरण्यात आला होता. सन १९८०-८१ पर्यंत एकेरी पध्दतीने, विखुरलेल्या स्वरूपात, ज्या ठिकाणी शेतक-यांची संमती मिळत होती, त्या ठिकाणी मृद संधारणाची कामे जमिनीची धुप थांबविण्यासाठी केली जात होती. परंतू महाराष्ट्रात दर ३ वर्षांनी येणारी टंचाई परिस्थिती चालूच असल्यामुळे जमिनीची धुप श्रांबविण्यापेक्षाही शेतामध्ये पाणी अडविणे ही सर्वात महत्वाची गरज निर्माण झाली. ही गरज भागविण्यासाठी मृद संधारणाची वेगवेगळी कामे एकाच क्षेत्रावर जमिनीच्या प्रकारानुसार घेण्यात यावीत, ही संकल्पना पुढे आली.

सन १९८२ साली सर्वकष पाणलोट क्षेत्र विकास ही योजना अस्तित्वात आली. सर्वसाधारणपणें या योजनेचा उद्देश 'पड़ल्लेल्या पावसाचें पाणीं जया ठिकाणी पडेल त्याच ठिकाणी ते श्रांबविले व जिंरविले पाहिजे' असा आहे. पाणी हे शेती उत्पादनाचा एक अविभाज्य घटक आहे. पावसाच्या पाण्याचे नियोजन करण्यास बराच वाव आहे. म्हणून हे पाणी जमिनीवरून वाहून न जाऊ देता, ते त्याच क्षेत्रामध्ये अडवून जमिनीमध्ये जास्तीतजास्त जिरविले पाहिजे किंवा पाणीसाठा करून त्याचा परत वापर केला पाहिजे.

त्यासाठी पाणलोट क्षेत्रामध्ये जर्मिनीचा लुतार, जर्मिनीचा प्रकार, जमिनीचा वापर व पाणी साठविण्याची भूगर्भातील क्षमता इत्यादी बाबींचा विचार करून पाणलोट विकास कार्यक्रमांतर्गत निवडलेल्या गावामध्ये जमिनीच्या उपयोगीतेनुसार 'माथा ते पायथा' या तत्वावर खालीलप्रमाणे मृद व जलसंधारणाचे विविध उपचार राबवेिले जातात. लागवडीस अयोग्य व पडीक जमिनीवर सलग समपातळी चर ह्या उपचार घेण्यात येतो. लागवडीस योग्य जमिनीवर ढाळीची बांधबंदिस्ती, कंपार्टमेंट बंडोंग, मजगी, पॅझे बंडींग हे उपचार घेतले जातात. ओघळ नियंत्रणाच्या उपचारामध्ये अनघड दगडाचे बांध (ळून बोल्डर स्ट्रक्चर), गॅर्बीयन स्ट्रक्चर, माती नालाबांध, सिमेंट क्राँक्रेट नालाबांध, वळणबंधारा, शेततळे, सिमेंट नालाबांधातील गाळ काढून खोलीकरण करणे इत्यादी कामे घेतली जातात. वरील उपचारांची थोडक्यात माहिती पुढीलप्रमाणे आहे.

ढाळीचे बांधबंदिस्ती

महाराष्ट्र राज्यातील हमखास पावसाच्या प्रदेशात ४ टक्के लुतारापर्यंतच्या जमिनीवर छाळीचे बांधबंदिस्तीची कामे घेण्यात येतात. यामध्ये जमिनीच्या उतारानुसार 0.८५ ते १.२0 चौ.मी. छेदाचे व १५ ते २१o मी. लांबीचे बांध घालण्यात येतात. ठ्ठाळींच्या बांधामध्ये पाणी साठवावयाचे नसते. बांधास 0.२ टक्के उतार दिला जातो. त्यामुळे बांधावरील क्षेत्रात गोळा झालेले पाणी बांधाच्या वरच्या बाजूने सावकाश बाहेर काढले जाईल. त्यामुळे जमिनीची धूप होणार नाही.

कंपार्टमेंट बंडाँग (शेत ब्रांधबंदिस्ती)

सदर उपचार अवर्षणप्रवण क्षेत्रामध्ये घेण्यात येतो. कंपार्टमेंट बंडींगमुळे शेतातले पाणी शेतातच अडविले जाते व जमिनीची धूप अतिशय प्रभावीरित्या थांबविली जाते. बांधामुळे शेताची सुपिकता टिकून राहते व अशा क्षेत्रातील दर हेक्टरी उत्पादन वाढ होण्यास मदत होते. यामध्ये जमिनीच्या प्रकारानुसार (हुलकी, मध्यम व भारी) 0.८0 तें १.२0 चीं.मी. छेदाचें बांध घालण्यात येतात. बांधामुळे 0.30 मी. उंचीपर्यंत पाणीसाठा करून अतिरिक्त पाणी सांडव्यामधून बाहेर काढले जाते.

मजगी (भात खाचरे बांधबंदिस्ती)

महाराष्ट्र राज्यात पश्चिम घाट भागात व विदभात धान पिकासाठी बांधबंदिस्ती प्रामुख्याने करावी लागते. ८ टक्के लुतारापर्यंतच्या जमिनीवर १o ते २0 मी. अंतरावर छोठी छोटी खाचरे तयार करण्यासाठी नेिम्मी खोदाई व नेिमी भराई करून बांध घातला जातो व खाचरास उलटा लुतार देण्यात येतो. या खाचरामध्ये पावसाचे पाणी अडवून जादा पाणी सोडून देता येते. या कामासाठी सर्वसाधारणपणे हेक्टरी खर्च जास्त येतो परंतू कांही ठिकाणचे नापिक क्षेत्र पिकाखाली येत असल्यामुळे उत्पादनामध्ये वाढ होऊ शकते. या भागात भातखाचरे केली जातात तो भाग डोंगराळ, अत्यंत कमी उत्पादनाचा असल्यामुळे भातशेती एवढे एकच उत्पन्नाचे साधन असल्यामुळे ही योजना अत्यंत उपयुक्त व किफायतशीर ठरली आहे.

जुन्या भात खाचरांची बांधदुरुस्ती

पश्चिम महाराष्ट्र. कोकण व विंदर्भात मोठ्या प्रमाणात मजगीची कामे करण्यात आलेली आहेत. राज्यात सातत्याने होणारी अतिवृष्टी व इतर बाबींमुळे भातखाचराच्या बांधाचे व भातखाचराचे धूपीमुळे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. बांध ह्या मजगी / भातखाचराचा अत्यंत महत्वाचा भाग आहे. बांध अंशत: अथवा पूर्णपणे फुटल्याने, ढासळल्याने खाचरामध्ये पूर्ण पिकाच्या उत्पादनावर परिणाम होतो. त्यामुळे अशा भातशेतीच्या बांधदुरुस्तीची कामे करण्यात येतात. परिणामी खाचरामध्ये पाणी साठून उत्पादन वाढीस मदत होते.

सलग समपातळी चार

लागवडीस अयोग्य व पर्डीक असलेल्या क्षेत्रामध्ये प्रामुख्याने मृद आणि जलसंधारण करण्यासाठी या कार्यक्रमाचे नियोजन केलेले आहे. या क्षेत्रात पडणारे पावसाचे पाणी अडवून ते जर्मनीमध्ये जिरवण्यासाठी जमिनीच्या उतारास आडवे असे ६0 सें.मी. रुंद आणि ३0 से.मी. खोल चर समपातळीमध्ये खोदण्यात येत होते. तथापेि अशा क्षेत्रामध्ये मोकाट जनावरे फिरकल्याने हे चर लवकर बूनतात, तसेच पाण्याबरोबर वाहून येणा-या गाळाने लवकर भरतात. त्यामुळे कालांतराने चरामध्ये पाणी साठवून ठेवण्याची क्षमता नाहीसी होते. त्यामुळे शेतचराची खोली 0.३० मी. ऐवजी o.४५ मी. करण्यास दिनांक १६ जूलै २oo७ च्या शासन निष्णर्याव्दारे शासनाने मान्यता दिलेली आहे. चरामधील खोदून काढलेली माती चराच्या उताराकडील बाजूस चरालगत रचून त्याचा बांध घालण्यात येतो. या बांधावर विविध प्रकारच्या योग्य अशा झाडाझुड्यांचे बियाणे पावसाळयाच्या सुरुवातीस पेरण्यात येते. त्यामुळे समपातळी सलग चरालगत झाडोप्यांचे पट्टे निर्माण होतात. मृद आणि जलसंधारणासाठी या झाडो-यांचा खुपच उपयोग होतो. तसेच क्षेत्रामधील ओघळी आणि नाल्यावर जागोंजागीं योग्य लिंकाणीं उपलब्ध असलेल्या अनघड़

खोल सलग समपातळी चार

सलग समपातळी चराची खोली कमी असल्याने ते गाळाने लवकर बुजतात व पर्यायाने त्यामध्ये आवश्यक जलसंधारण होत नाही. त्यामुळे 0 ते ८ छक्के ऊताराच्या पडिक जमिनीवर १ मी. रुंद व १ मी. खोल आकाराचे प्रतेि हेक्टरी २४g मी. लांबीचे खोल सलग समपातळी चर खोदण्यात येतात. अशा चरामुळे डोंगर उतारावरुन वाहून जाणारे पावसाचे पाणी चरामध्ये साठवून चांगल्या प्रकारे मृद व जलसंधारण होते. जमिनीची धूप थांबण्यास मदत होते. तसेच पाझर तलाव, नालाबांध इ. मध्ये गाळ साचण्यास प्रतिबंध होती.

डोंगर उतारावर समपातळीत दगडी ब्रांध घालणे

लागवडीस अयोग्य असलेल्या पडीक व अवनत जमिनीवर मृद व जलसंधारणासाठी सलग समपातळी चर खोदण्यात येतात परंतु ज्या क्षेत्रामध्ये कठीण भूस्तरामुळे असे चर खोदणे शक्य होत नाही, अशा पडीक जर्मिनीच्या डोंगर उतारावर समपातळीत दगडी बांध घालण्यात येतात. बांधाचा पाया 0.७५ मी. माथा 0.४५ मी. व उंची 0.६g मी. तसेच बांधाची लांबी जमिनीच्या उतारानुसार ७४o ते ८७o मी. ठेवण्यात येते. ज्या ठिकाणी पुरेसा दगड उपलब्ध आहे. अशा डोंगर व ठेकड्यावरील वर्कस जमेिनीत लुतारास समपातळीत दगडी बांध घालण्याची योजना राबविण्यात येते. या उपचारामुळे जमिनीची होणारी धुप थांबविणे, वाहून जाणारे पावसाचे पाणी जमिनीत मुखून भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविणे हे उद्देश साध्य होवून त्याखालील क्षेत्रामध्ये घेण्यात येणा-या पेिकांच्या उत्पादनात वाळू होण्यास मदत होते.

अनघड दगडाचे ब्रांध

ओघळींच्या वरच्या भागात ओघळ नियंत्रणाचा उपचार म्हणून अनघड दगडाचे बांध घातले जातात. अशा बांधामुळे ओघळीमधुन वाहणा-या पाण्याचा वेग कमी करून पाण्याबरोबर वाहून जाणारी माती अडवेिली जाते. या कामाकरीता जवळपास उपलब्ध असलेल्या अनघड़ दगड़ाचा उपयोग करून कमीं खचात बांध घातला जातो.

गॅब्रीयन स्ट्रक्चर

कांही भागात सांडव्यासाठी योग्य जागा मिळणे शक्य होत नसल्याने मातीचे बांध घालता येत नाहीत, तर पक्रा पाया मिळत नाही म्हणून सिमेंटबांध घालता येत नाही अशा ठिकाणी गॅबीयन स्ट्रक्चर ह्या नाला उपचार घेतला जातो. हे काम सोपे व कमी खर्चाचे आहे. त्यामुळे अपधावेचा वेग कमी होवून जमिनीची धूप थांबविण्यास व भूगर्भात पाणी मुरण्यास मदत होते. गॅबीयन स्ट्रक्चर म्हणजे अनघड दगडामध्ये जाळीच्या गुंडाळ्यात नाला पात्रात आडवा घातलेला बांध होय.

माती नालाबांध

नाल्यावर योग्य ठिकाणी माती नालाबांध घालून पाणी साठा करण्यात येतो. नाला तळाचा उतार ३ टक्केपर्यंत असलेल्या व ५gg हे. पर्यंत पाणलोट क्षेत्र असलेल्या नाल्यावर माती नालाबांक्षाची कामे घेण्यात येतात. मातींच्या बांधामध्ये सर्वसाधारणपणे जास्तीतजास्त ३.g. मी. उंचीपर्यंत पाणीसाठा केला जातो. त्यात पाणी साठण्याची क्षमता ही सरासरी ६ ते ८ हजार घ.मी. (टी.सी.एम.) केली जाते. यामुळे भूगर्भातील पाण्याच्या साठ्यात वाढ होऊन जवळपासच्या विहिरींच्या पाण्याच्या पातळीत वाढ होते.

सिमेंट नालाब्रांध

या ठिकाणी नाल्याची रुंदी कमी असते व नाल्यास स्पष्ट खोली व काठ असतात व या ठिंकाणी मातींचा क्राँक्रेटचे नालाबांध घालून नाल्यामध्ये पाणीसाठा केला जातो. नाला तळाचा उतार ३ टक्केपर्यन्त असलेल्या व १ogo हे पर्यन्त पाणलोट क्षेत्र असलेल्या नाल्यावर सिमेंट काँक्रेट नालाबांधाची कामे घेण्यात येतात. अशा बंधान्यामध्ये पाणी साठण्याचीं क्षमता सरासरी ८ तें १0 हजार घ.मी. (टी.सी.एम.) केली जाते. यामुळे भूगर्भातील पाण्याच्या साठ्यात वाढ होवून जवळपासच्या विहिरींच्या पाण्याच्या पातळीत वाढ होते.

वळणबंधारा

ज्या पाणलोट क्षेत्रामध्ये ओढयाला सर्वसाधारणपणे डिसेंबरपर्यंत पाणी टिकते व ओढ्यामध्ये सर्वसाधारणपणे १५o लेि./ सेकंद पाणी वाहते, अशा नाल्यावर सिमेंटचे १.१o मी. उंचीचे पक्के बांध धालून बांधास एक किंवा दोन दारे ठेवून हे पाणी समपातळीमध्ये शेजारच्या शेतात वळविले जाते. या उपचारास वळण बंधारा असे म्हणतात. ओढ्यांना पाणी २४ तास वाहत असेल तर, रात्रदिवस या पाण्याचा प्रवाही सिंचनासाठी उपयोग केला जातो. त्यामुळे पीक उत्पादनात वाढ होवून शेतक-यांचा फायदा होतो. अशा प्रकारची कामे ही कोकण विभाग, विदर्भ, नियमित पावसाच्या प्रदेशामध्ये फार उपयोगी पडणारी आहेत.

सिमेंट नालाबांधातील गाळ काढून खोलीकरण करणे

नाला खोलीकरण या योजनेचा मुख्य हेतूभूपृष्ठीय पाणी साठवण नसून भूजल पुनर्भरण हा आहे. जे सिमेंट नालाबांध गाळाने भरलेले आहे व ज्यांची पाणी साठवणक्षमता कमी झालेली आहे, अशा सिमेंट नालाबांधातील गाळ काढून खोलीकरण करण्यात येते. हे काम करताना बांधातील गाळ काढून मूळ नाला तळापासून ३ मी. किंवा कठीण भूस्तरापर्यंत यापैकी जे अगोदर घडेल तेवढ्या खोलीचे खोलीकरण करण्यात येते. खोलीकरणामुळे उपलब्ध होणा-या पाणीसाठ्यामुळे पुनर्भरणासाठी अतिरिक्त पाणी व अवधी मिळाल्याने परिसरातील भूजल पातळीत वाढ होते तसेच गावामधील पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत बळकट होते.

शेततळे

सर्वसाधारणपणे जमिनीचा उतार ३ टक्केपर्यंत असेल अशा ठिकाणी शेताच्या सखल भागात शेतातळी घेण्यात येतात. सर्वसाधारणपणे १५ × १५ × ३ मी. ते ३o x ३o x ३ मी. पर्यंत आकाराची शेतातळी घेण्यास मान्यता आहे. शेततळयासाठी लागणारी जमिन शेतक-याने स्वखुशीने व विनामूल्य द्यावयाची असून शेततळयाची दुरूस्ती व देखभाल स्वतः शेतक-याने करावयाची आहे. सर्व प्रकारच्या पाटबंधारे प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात शेतातळी घेता येत नाहीत. राज्यातील सततच्या टंचाई परिस्थितीचा विचार करता पावसात पडलेला खंड व पाण्याच्या टंचाईमुळे पिकांचे नुकसान होऊ नये, याकरिता राज्यातील पर्जन्यावर आधारित कोरडवाहू शेतीची पाणलोट व जलसंधारण माध्यमातून जलसिंचनाची उपलब्धता वाढविणे तसेच संरक्षित व शाश्वत सिंचनाची सुविधा निर्माण करण्याच्या उद्देशाने शासन निर्णय दिनांक १७ फेब्रुवारी २०१६ अन्वये ' मागेल त्याला

जुन्या बोडीचे नुतनीकरण/दुरुस्ती

विदर्भातील पूर्वेकडील जिल्ह्यात पूर्वापार पध्दतीने भातशेतीच्या जमिनीच्या वरच्या भागात मातीचे बांध करुन छोटे-छोटे जलाशय तयार करतात व त्यात पाणी साठवितात. साठविलेले पाणी आवश्यकतेनुसार जलाशयाच्या खालच्या भागातील भातशेतीला देतात. या छोटया तलावास विदर्भात बोडी असे म्हणतात. या बोडीमध्ये काही ठिकाणी पाण्याच्या उपलब्धतेनुसार लहान प्रमाणात मत्स्यव्यवसाय देखील करतात. पूर्वापार बांधलेल्या बोर्डीची फूटतूट झाल्याने तसेच त्यात गाळ साठलेला असल्याने या जुन्या बोर्डीचे खोलीकरण व नुतनीकरण करण्यात येते. पावसाअभावी भातपिकास पाण्याचा ताण पडल्यास उत्पादनात मोठया प्रमाणात घट होते, अशावेळी बोर्डीतून संरक्षित पाणी दिल्यास भातपिकाचे नुकसान टाळले जाते.

 

संपर्क क्र. 0२o-२६0५५३२२

स्त्रोत - कृषी विभाग महाराष्ट्र शासन

अंतिम सुधारित : 8/22/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate