जमिनीच्या प्रकारानुसार, खोलीनुसार आणि उंचसखल भूरचनेुळे प्रत्येक ठिकाणी कुरणामध्ये वेगळी गवते आढळतात. अतिवृष्टीच्या प्रदेशात धूपलेल्या डोंगरउतारावर बोंगरूड किंवा करड आणि या गवतांचे वर्चस्व दिसते. पवना किंवा शेडा गवत सुपीक जमीन पसंत करते आणि अतिवृष्टीच्या प्रदेशात आढळत नाही. मैदानी प्रदेशातील खोलगट भागात मारवेल आणि तांबीट किंवा तांबरूट या जातींचे आधिराज्य दिसते.
बर्याच ठिकाणी डोंगरउतारावरील गवत वणवा लागून दरवर्षी जळते किंवा नवी फूट व्हावी म्हणून मुद्दाम जाळले जाते. अशा ठिकाणी रोशा गवत जागेचा ताबा घेते. या गवतापासून उडाऊ, सुगंधी तेल काढतात. पण हे गवत गुरांना खाण्यालायक नसते. सौराष्ट्रात गवत जाळण्याची प्रथा नाही. त्यामुळे तिथे पवना गवताचे प्राबल्य आढळते. हे गवत गुरांना खाण्यास चांगले असते. अवाजवी चरण्याने आणि दरवर्षी जाळल्याने गवताची वाढ खुंटते. डोंगराळ जमिनीतील अन्नद्रव्ये धुपून जातात.
अधिक पावसाच्या प्रदेशात जमिनीची धूपही फार मोठ्या प्रमाणात होते. या भागात बोंगरूड गवत पसरते. चरण्याचे व धूप होण्याचे प्रमाण वाढतच राहिले तर बहुवर्षायू तृणे नाहीशी होतात. पावसाळ्यात फक्त वर्षायू गवते वाढतात. जाळल्यामुळे व प्रमाणाबाहेर चरण्यामुळे जमिनीवरील गवताचे आच्छादन सर्वत्र कमी होत आहे. ही प्रकि‘या थांबविण्यासाठी गवत जाळण्यावर पूर्णपणे बंदी घालावी. तसेच वणवा लागून गवत जळू नये यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी. कुरणाची स्थिती अतिशय खालावलेली असेल अशा ठिकाणी चार ते पाच वर्षे चरण्यास पूर्ण बंदी घालावी. सर्व क्षेत्राच्या कडेने कुंपण घालून ते चरण्यास बंद करावे इतरत्र कुरणाच्या 1/7 ते 1/10 भागावर कुंपण घालून तो भाग चरण्यासाठी वर्षभर बंद करावा. बी पडून गेल्यावर गवत कापून वैरण म्हणून विकता येईल. पुढच्या वर्षी दुसरा भाग निवडून त्याला पहिल्याप्रमाणे संरक्षण द्यावे. याप्रकारे सर्व रानात गवताचे पुरेसे पुनरुज्जीवन झाल्यावरच तिथे गुरांना चरू द्यावे. नंतरही ठराविक प्रमाणात, ठराविक सं‘येने, ठराविक काळात त्यांना चरू द्यावे.
उन्हाळ्यात जनावरांना रानात चरू देऊ नये कारण त्यावेळी त्यांना अन्न काहीच मिळत नाही पण तृणांची खोडे व भूमिगत कंद मात्र नष्ट होतात. ज्या ठिकाणी जमिनीवर (विशेषत: डोंगराळ भागात) गवते अजिबात नाहीत किंवा अगदी तुरळक आहेत अशा ठिकाणी जमीन न नांगरता विळ्याने किंवा कुदळीने वरच्यावर माती उकरून गवताचे बी पेरावे किंवा गवताचे ठोेंब मधून मधून लावावेत. डोंगरावरून खाली येणारे पाणी खूप विस्तृत क्षेत्रावर पसरेल, अशी व्यवस्था करावी. त्यामुळे गवताच्या वाढीला चालना मिळेल. बर्याच ठिकाणी गवताबरोबर शिंबी कुळातील वर्षायू व बहुवर्षायू वनस्पती आढळतात. यांची पाने गुरे खातात. या वनस्पती जमिनीचा कस व पोत सुधारण्याचे मौलिक कामही करतात. जिथे नसतील तिथे शेवरा, बरबाडा, पांढरफळी, उन्हाळी, रानशेवरी, बेचका यांसार‘या वनस्पती मधून मधून लावाव्यात. प्रत्येक खेड्याने आपल्या आसपासच्या सर्व पडीक, नापीक जमिनीवर कुरणे तयार करावीत. कुरणातून चार्याची वन्य गवते, शिंबी वनस्पती व वैरणवृक्ष असे मिश्रण असावे.
नदीकाठी, टेकड्यांवर, कालवा व पाटाच्या कडेने कुरणे तयार करता येतील. निवडलेल्या ठिकाणी जमीन नांगरून, ढेकळे फोडून , 15’’ खोलीपर्यंत माती भुसभुशीत करावी. लहानमोठे दगड काढून ते उताराच्या दिशेला लावावेत. त्यामुळे पाण्याची व मातीची धूप थांबेल. तसेच क्षेत्रात ओढे, नाले असतील तर त्यांच्यावर बांध घालावेत. कुरणाच्या सर्व बाजूने तारांचे किंवा काटेरी झुडूपांचे कुंपण घालावे. पावसाळा सुरू होण्याच्या सुारास गवताचे बी एकरी 7 ते १० किलो पेरावे. किंवा गवताचे ठोेंब 6’’ ु 6’’ अंतरावर लावावेत. अल्पकाळात सर्व जमीन गवताने झाकून जावी हा उद्देश असावा. बी लावण्याऐवजी गवताचे ठोेंब लावणे, आपल्या हवामानात बर्याच वेळा योग्य ठरते. जमीन किती खोल आहे, तिचा प्रकार आणि पावसाचे प्रमाण यावर कोणती गवते लावायची हे ठरवावे. त्याचबरोबर कुरणात ठराविक अंतरावर ( 5 ते 7 मीटर) तसेच कुंपणातून चार्याची झाडे लावता येतील. कुरणामध्ये प्रती हेक्टरी 104 ते १५० वैरण वृक्षांची लागवड करता येईल. झाडांच्या बाजूच्या व खालच्या फांद्या नियमित तोडल्यास गवताच्या वाढीवर कोणताही प्रतिकूल परिणाम होणार नाही. आहे त्या कुरणांचे पुनरुज्जीवन करून त्याचंी उत्पादनक्षमता वाढवता येईल.
मध्य भारतातील काही रुक्ष प्रदेशात झालेल्या संशोधन अभ्यासावरून आढळून आले की नैसर्गिक कुरणांची उत्पादनक्षमता साधारणपणे हेक्टरी 1 टनाहून कमी असते. पण केवळ गुरांना चरण्यासाठी क्षेत्र बंद केल्याने क्षेत्राची उत्पादनक्षमता तिपटीने (3टन हेक्टरी) वाढते. थोड्या प्रमाणात खते घालून व योग्य गवते लावल्यास उत्पादनक्षमता हेक्टरी 6 टनापर्यंत वाढू शकते. कुरणात गवताबरोबर चारा देणारी झाडे लावली तर गवते व तोडलेल्या फांद्या मिळून हेक्टरी 8 ते १० टन चार्याचे उत्पन्न मिळू शकते. झाडांचा अजून एक फायदा म्हणजे त्यांच्यापासून भर उन्हाळ्यात हिरवा चारा मिळू शकतो.
माहिती लेखन : वनराई संस्था
अंतिम सुधारित : 6/22/2020
येत्या काळात गाव स्तरावर पावसाच्या पाण्याचे व्यवस्...
बंधाऱ्यासाठी वापरत असलेले सिमेंट चांगले असावे. सहा...
पाणलोट क्षेत्र विकास करण्याकरिता पाणलोट क्षेत्राती...
नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी व दुर्गम भागातील शेतक...