অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

‘सर्वांगीण ग्राम विकास प्रकल्पातून’ मुळेगावचा कायापालट

‘सर्वांगीण ग्राम विकास प्रकल्पातून’ मुळेगावचा कायापालट

“विकासाची गंगा आपल्याही दारी यावी या प्रतीक्षेत असणार्या इतर खेडेगावांसारखेच नाशीक जिल्ह्याच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातले मुळेगाव. वनराई संस्था आणि सी. टी. आर. कंपनी यांच्या माध्यमातून या गावात मूलभूत सोयीसुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात आला. जलसंवर्धनाची, मृद्संवर्धनाची कामे हाती घेण्यात आली. महिला बचतगटांना प्रोत्साहन देऊन स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यात आल्या. स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती होऊन रोजगारासाठी शहरी भागांकडे होणारे स्थलांतरही काही प्रमाणात कमी करणे शक्य झाले आहे...”

अंजनेरी डोंगराच्या पायथ्याशी वसलेले मुळेगाव. चारही बाजूंनी डोंगरांनी वेढलेले. साधारणतः तीन हजार इतकी लोकसंख्या असलेल्या या गावाची ओळख ‘आदिवासीबहुल’ गाव’ अशीच आहे. गावाचे क्षेत्रफळ सुमारे 2,200 हेक्टर असले, तरी प्रत्यक्षात एक हजार हेक्टर क्षेत्रावरच शेती केली जाते. अशा या गावात सन 2014 पासून ‘सी. टी. आर. कंपनीच्या’ आणि ‘वनराईच्या’ माध्यमातून ‘सर्वांगीण ग्राम विकास प्रकल्प’ राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाअंतर्गत जल-मृद्संधारण, कृषी विकास, आरोग्यविषयक सोयीसुविधा, समाजातील दुर्बल घटकांचा विकास आणि महिला सक्षमीकरण अशा मूलभूत घटकांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. एकूण पाच वर्षे कालमर्यादा असलेल्या या प्रकल्पाच्या माध्यमातून पुढील दोन वर्षांतही या अनुषंगाने अनेक उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

गावठाण आणि पाच वाड्या मिळून मुळेगावची ग्रामपंचायत बनलेली आहे. या ठिकाणी प्रकल्प राबविण्यापूर्वी या गावाची पाहणी करण्यात आली. त्या पाहणीमध्ये पुढील समस्या आढळून आल्या.

• जलसिंचनाखालील मर्यादित क्षेत्र - वालदेवी नदी, डोह्याचा नाला, विहिरी, बोअरवेल्स असे विविध जलस्रोत असूनदेखील केवळ 2.55 टक्के क्षेत्र ओलिताखाली होते.

• पीकपद्धती आणि कमी उत्पादन क्षमता - ओलिताखालील या क्षेत्रात टोमॅटो, वांगी, पावटा यांसारखी हंगामी पिके घेतली जात असत. उर्वरित कोरडवाहू क्षेत्रात भात, नागली, वरई आणि तूर ही पिके घेतली जात असत. या पिकांची एकूणच उत्पादकता कमी प्रमाणात होती. बागायती पिकांची लागवडदेखील अत्यल्प प्रमाणात केली जात असे.

• आरोग्यविषयक सोयीसुविधांचा अभाव - गावात वैयक्तिक शौचालयांचा आणि स्वच्छतेचा अभाव दिसून आला. सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठीची कोणतीही ठोस सुविधा उपलब्ध नव्हती. हे पाणी रस्त्यांवरच सोडून दिल्याने माश्यांचा व डासांचा उपद्रव होऊन संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव होत असे.

• राहणीमानाचा खालावलेला दर्जा - दारिद्य्रावस्थेत जगणार्यार लोकांची संख्या 60 टक्क्यांपेक्षा अधिक होती.

• पाणीटंचाई - हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात पाण्याची तीव्र टंचाई भासत होती.

• शेतीपूरक उद्योगांचे उत्पादन कमी - पशुपालनासारख्या शेतीपूरक उद्योगातून मिळणारे उत्पादनही कमी प्रमाणात होते.

मुळेगावातील पाहणीत आढळून आलेल्या या सर्व समस्या सोडवून गावाचा शाश्वत व सर्वांगीण विकास साधण्यासाठी पुढील कार्यक्रम राबविण्यात आले.

1. जल-मृद्संधारण आणि वृक्षलागवड

मुळेगावच्या एकूण क्षेत्राची विभागणी तीन पाणलोट क्षेत्रांत करण्यात आली आहे. या जमिनींना सिंचनासाठी पुरेसे पाणी उपलब्ध व्हावे म्हणून ‘जल-मृद्संधारणाचा’ उपक्रम हाती घेण्यात आला. त्याअंतर्गत 2014 ते 2016 या कालावधीत एकूण 40 हेक्टर क्षेत्रावर सलग समतल चर घेण्यात आले. तसेच दोन सिमेंट बंधारे, एक माती-नाला बांध, एक गॅबिअन बंधारा, दहा दगडी बांध आणि साखळी पद्धतीचे तीस वनराई बंधारे बांधण्यात आले. याशिवाय सिमेंटच्या तीन बंधार्यांंची आणि एका माती-नाला बांधाची दुरुस्ती करण्यात आली.

गावातील पडीक व डोंगराळ भाग वनीकरणाखाली यावा या उद्देशाने सप्टेंबर 2015 ते डिसेंबर 2016 या कालावधीत आंबा, पेरू, जांभूळ अशा स्थानिक जातींच्या आठ हजार रोपांची लागवड करण्यात आली. पावसाचे पाणी जमिनीत मुरून त्याचा फायदा सिंचनासाठी उपयुक्त असणार्याआ जलस्रोतांना व्हावा या उद्देशाने नऊ विहिरींच्या/बोअरवेल्सच्या पुनर्भरणाची कामे करण्यात आली. याचा फायदा येथील शेतकर्यांीना रब्बी हंगामातील उत्पादनासाठी झाला.

यंदा या भागात भरपूर पाऊस झाल्याने वालदेवी नदी, गावाच्या परिसरातून वाहणारे ओढे, नाले यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ होऊन पूर-परिस्थिती निर्माण झाली होती. याचा फटका या भागातील भाताला आणि खरीप हंगामातील पिकांना बसल्यानेे त्यांचे मोठे नुकसान झाले. परिणामी, गावातील उत्पन्नाची सर्व भिस्त ही रब्बी हंगामातील पीक-उत्पादनावरच राहिली.

खरीप हंगामातील पिकांसाठी आपत्ती ठरलेला हा पाऊस रब्बी हंगामातील पिकांसाठी मात्र इष्टापत्ती ठरला. जल व मृदा यांच्या संधारणाच्या कामांमुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरले. जमिनीतील पाण्याची पातळी दरवर्षीच्या तुलनेत उंचावली. सिंचनासाठी वापरात येणार्या  जलस्रोतांची पाणी साठवण्याची क्षमता दीड ते दोन महिन्यांनी वाढली. त्याचा उपयोग पावसानंतरच्या हंगामातील टोमॅटो, गहू, हरभरा, कारले, वांगी, भेंडी अशा पिकांसाठी होऊ शकला. गावातील सिंचनाखालील किमान क्षेत्रात सुमारे 30 टक्क्यांनी वाढ झाली. याचा सर्वाधिक फायदा टोमॅटो या नगदी पिकासाठी झाला. टोमॅटो उत्पादनात तब्बल 15 ते 20 टक्के अशी भरघोस वाढ झाली. पूर्वी पावसाचे पाणी अडवण्यासाठी बंधारे नव्हते. हे पाणी वाहून वाया जात असे. शिवारातील ओढे-नाले, विहिरी आणि बोअरवेल्स हे पाण्याचे स्रोत नोव्हेंबर महिन्यातच कोरडे पडत असत. परिणामी, कोरडवाहू क्षेत्रात तग धरू शकतील अशी पिके घेण्यावरच जास्त भर दिला जात असे. याबाबत बोलताना स्थानिक शेतकरी नामदेव भस्मे म्हणाले, “आमच्या शिवारात ‘वनराई’ संस्थेमार्फत साखळी पद्धतीनं ‘वनराई बंधारे’ बांधण्यात आले. त्यामुळे वाहून जाणारं पाणी अडलं. त्याचा वापर सिंचनासाठी होऊन आमच्या उत्पन्नामध्ये भरीव वाढ होऊ शकली.”

2. शेती आणि शेतीआधारित व्यवसायांना चालना

शेतकर्यांना शेतीसाठी लागणार्या् खातरीशीर निविष्ठा वेळेवर उपलब्ध व्हाव्यात, त्यांचे उत्पन्न वाढावे या दृष्टिकोनातून वनराईमार्फत 25 शेतकर्यांधना हरभरा आणि कुळीथ या बियाणांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमातून बी-बियाणे मिळाल्यामुळे शेतकर्यांेना सावकारांकडून कर्ज घेण्याची आवश्यकता उरली नाही.

घरगुती ओल्या कचर्यायचा आणि शेतातील काडीकचर्यातचा वापर करून गांडूळ खतनिर्मितीचे 19 प्रकल्प सुरू केले. त्यामुळे रासायनिक खतासाठीचा खर्च कमी होऊ शकला.

सिंचनासाठी मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध झाल्याने रब्बी हंगामामध्ये प्रामुख्याने गहू, हरभरा, टोमॅटो, वाल, कारले, कोबी, मिरची, वाटाणा, कुळीथ, फ्लॉवर, कोबी, काकडी अशी पिके घेतली जात आहेत. या पिकांच्या अधिक उत्पादन देणार्याक वाणांची माहिती शेतकर्यांाना व्हावी, तसेच पीककाढणी आणि काढणीपश्चात हाताळणी आदींबाबत योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी पाच ‘कृषीमेळाव्यां’चे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यांना गावातील बहुसंख्य शेतकर्यांेनी हजेरी लावली. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील कृषी अधिकार्यांळनी आणि कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांनी या मेळाव्यात मार्गदर्शन केले. त्याचा उपयोग प्रत्यक्ष शेती करताना झाला असून एकूण कृषी उत्पन्नात दहाबारा टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे अनेक शेतकर्यांानी सांगितले.

या प्रकल्पाअंतर्गत गावातील भोकरवाडी येथील ‘वालदेवी महिला बचतगटा’तील’ चौदा महिलांना शेळीपालनासाठी आणि बारा महिलांना कुक्कुटपालन व्यवसायासाठी आर्थिक साहाय्य करण्यात आले. या व्यवसायांसाठी लागणारे कौशल्य आणि मार्गदर्शनही पुरविण्यात आले. या उपक्रमातून स्वयंरोजगारास आणि महिला सक्षमीकरणास बळकटी मिळू शकली.

3. आरोग्य आणि स्वच्छता

गावातील वातावरण निरोगी राहावे, सार्वजनिक स्वच्छता वाढीस लागावी यांसाठी 130 वैयक्तिक शौचालयांचे बांधकाम करण्यात आले. त्यामुळे अस्वच्छतेतून होणार्याव आजारांचे प्रमाण रोखण्यात यश आले.

कचरा टाकण्यासाठी विशिष्ट जागा नसल्याने पूर्वी गावात कुठेही कचरा टाकला जात असे. ही समस्या टाळण्यासाठी बारा ठिकाणी ‘कचराकुंड्या’ बसविण्यात आल्या. गावातील कचरा ठरावीक ठिकाणी जमा होऊ लागल्याने कचर्यायचे व्यवस्थापन करणे शक्य झाले. वातावरण स्वच्छ आणि निरोगी राहण्यास मदत झाली.

गावातील सांडपाण्याची योग्य ती विल्हेवाट लावली जात नसल्याने सांडपाणी इतरत्र पसरत असे. याबाबत लोकांना जागृत करून या सांडपाण्याचा योग्य पुनर्वापर व्हावा यासाठी ‘परसबाग उपक्रम’ राबविण्यात आला. परसबाग-लागवडीसाठी आवश्यक ते बियाणे पुरविण्यात आले. घरगुती सांडपाण्याचा वापर परसबागेसाठी केल्याने रस्त्यावर जागोजागी साचून राहणार्याा पाण्याची समस्या मिटली. वर्षातील सात ते आठ महिने पुरेल इतका भाजीपाला परसबागेतून उपलब्ध होऊ लागला. भाजीपाला खरेदी करण्यासाठी होणार्याा खर्चात बचत होऊ लागली. आहारामध्ये घरगुती भाजीपाल्याचा समावेश झाल्याने पोषक आहार प्राप्त होऊन आरोग्यसंवर्धन होण्यास मदत झाली.

‘वनराई’ आणि ‘सी. टी. आर.’ कंपनीच्या पुढाकारातून मुळेगावामध्ये ‘सर्व रोगनिदान व उपचार शिबिरां’चे तीन वेळा आयोजन करण्यात आले. या शिबिरांद्वारे गावातील बहुसंख्य रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले. 50 टक्के रुग्ण पोटांशी संबंधित विकारांनी ग्रस्त असल्याचे आढळले असून, 15 टक्के रुग्ण विविध त्वचाविकारांनी आणि 35 टक्के रुग्ण इतर वेगवेगळ्या विकारांनी पीडित असल्याचे आढळून आले. या सर्व रुग्णांना आवश्यक ते उपचार करण्यात आले असून, या आरोग्य शिबिरांसाठी नाशीक येथील ‘डॉ. वसंतराव पवार मेडिकल कॉलेज अॅळण्ड रीसर्च सेंटर’ आणि डॉ. मुंगी यांचे सहकार्य लाभले.

साधारणतः 65 इतकी पटसंख्या असणार्यार जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षक यांना स्वच्छ पिण्याचे पाणी मिळावे या उद्देशाने शाळेमध्ये ‘जलशुद्धीकरण यंत्र’ बसविण्यात आले. त्यामुळे आरोग्याच्या 70 टक्के तक्रारी दूर झाल्या आहेत. तसेच शाळेमध्ये प्रथमोपचाराचे साहित्य पुरविण्यात आलेले आहे.

4. इतर विकासात्मक कामे

गावातील नागरिकांमध्ये सामाजिक सलोखा वाढविण्याच्या दृष्टिकोनातून ग्रामस्थांसाठी सार्वजनिक ठिकाण उपलब्ध असणे गरजेचे आहे ही बाब लक्षात घेऊन 2014 ते डिसेंबर 2016 या कालावधीत गावातील सार्वजनिक ठिकाणी सिमेंटची चौदा बाके बसविण्यात आली. लोकांमध्ये परस्परसंवाद वाढून गावाचा एकोपा टिकवून ठेवण्यासाठी त्या बाकांचा उपयोग होऊ शकला. त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांमध्ये 100 काठ्यांचे वाटप करण्यात आले. ज्यांचा उपयोग त्यांना चालण्यासाठी होऊ शकला. त्याचप्रमाणे दुभत्या जनावरांसाठी कृत्रिम रेतन रोपणाचे उपक्रम हाती घेण्यात आले. परिणामी, गावातील दुग्धोत्पादन वाढून दुग्ध-व्यवसाय करणार्याश शेतकर्यांरच्या उत्पन्नात वाढ झाली. बसस्थानकाची सुविधा उपलब्ध नव्हती. बसस्थानक उभारण्यात आले.

‘वनराई’ आणि ‘सी. टी. आर.’ कंपनी यांच्या माध्यमातून आगामी दोन वर्षांच्या काळात आणखी दोन सिमेंट बंधारे, तेरा वनराई बंधारे, दोन शेततळी, आठ गांडूळखत प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. त्याचबरोबर एका गॅबिअन बंधार्या चे बांधकाम आणि सिमेंटच्या एका बंधार्याबची दुरुस्ती करण्यात येणार आहे. तसेच पंधरा परसबागांच्या उभारणीसाठी मदत केली जाणार असून 50 वैयक्तिक शौचालये बांधण्यात येणार आहेत. याशिवाय 150 शेतकर्यांीना सुधारित बियाणांचे वाटप करण्यात येणार आहे. वृक्षारोपणावरही भर देण्यात येणार आहे. गावातील महिलांचे आणखी बचतगट तयार करून त्यांना अर्थसाहाय्य पुरवून महिला सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत, ज्यामुळे रोजगारासाठी शहरी भागांकडे होणारे स्थलांतरही काही प्रमाणात कमी होऊ शकेल. या प्रकल्पाच्या माध्यमातून एकूणच मुळेगावची समद्धीकडे वाटचाल सुरू झालेली आहे.

लेखक: प्रकाश जगताप (प्रकल्प-संचालक वनराई)

मांगीलाल महाले (नाशीक विभागप्रमुख)

सचिन डमाले (प्रकल्प-अधिकारी)

माहिती स्रोत: वनराई

अंतिम सुधारित : 6/5/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate